दूध व्यवसायामध्ये म्हैस पालनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतात जवळजवळ एकूण उत्पादनापैकी ५५ टक्के वाटा हा म्हशीच्या दुधाचा आहे. वाढीव उत्पादनासाठी जातिवंत म्हशी पाळणे फार गरजेचे आहे. त्यामुळे पशुपालकांना म्हैशींसंबंधी असलेली बारीक-सारीक माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्हीसुद्धा डेअरी व्यवसायाशी संबंधित आहात किंवा म्हशीचे पालन करू इच्छिता तर तुम्हाला पाच गोष्टी कायम लक्षात ठेवावे लागतील. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रतीचे दूध उत्पादन मिळेल व त्यापासून चांगला नफा सुद्धा कमावता येईल. त्यासाठी खालील गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.
म्हैस पालन करताना त्या जातिवंत असणे गरजेचे आहे. म्हशींना योग्य प्रकारचा संतुलित आणि पोषक आहार देणे गरजेचे आहे. म्हशींसाठी गोठ्याची रचना करताना त्या आरामदायक अशी असावी. रोग नियंत्रणासाठी प्रभावीपणे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हैस प्रजननाच्या बाबतीत उत्तम असावी. पालनातील म्हशी जातिवंत असाव्यात. पशुपालकांना म्हशींची निवड करताना उच्च दर्जाच्या व जातिवंत आहेत याची खात्री करावी. जर म्हशी जातिवंत नसतील तर त्याचा परिणाम प्रत्यक्ष दूध उत्पादनावर होतो. म्हणून जातिवंत दर्जाच्या म्हशी निवडाव्यात. जसे की मुऱ्हा, जाफराबादी, म्हैसाना, भदावरी, पंढरपुरी इत्यादी जातीच्या म्हशी चांगल्या दर्जाच्या असतात. त्यातल्या त्यात मुरा जातीची म्हैस दूध उत्पादनासाठी अतिशय चांगली मानली जाते. या म्हशीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण ही जास्त असते. त्यामुळे या म्हशीची किंमतही जास्त असते. या जातीच्या म्हशीचे वैशिष्ट्य म्हणजे ती कुठल्याही वातावरणात तग धरू शकते, तसेच तिची देखभाल करणेही सोपे असते. या म्हशी सामान्यतः पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये जास्त पाळल्या जातात. या जातीच्या म्हशींची शिंगे मागच्या बाजूने वळलेले असतात. या जातीची म्हैस गावरान जातीच्या म्हशींपेक्षा दुप्पट दूध देतात. दररोज जास्तीत जास्त १५ ते २० लिटरपर्यंत दूध मिळू शकते. या म्हशींच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे.
संतुलित आहार असणे आवश्यक
जातिवंत म्हशी असण्याबरोबर त्यांना खायला संतुलित आहार असणे हेही महत्त्वाचे असते. जर म्हशींसाठी असलेले खाद्य उत्तम दर्जाचे असेल तर त्यापासून मिळणारे दूध उत्पादन ही जास्त मिळते. हिरवा व कोरडा चारा समप्रमाणात विभागून देणे म्हणजे अभ्यास करून संतुलित आहार असतो. त्याचा उपयोग खाद्यामध्ये जर केला तर वाढीव उत्पादन मिळू शकते.
चांगल्या प्रजनन क्षमतेच्या म्हशी असणे आवश्यक
दरवर्षी म्हैस गाभण राहणे आवश्यक असते. जर प्रत्येक वर्षी म्हैस गाभण राहत नसेल तर तिला पशुवैद्यकाकडून उपचार करून घेणे फायद्याचे असते. एवढेच नाही तर म्हशीचे वजन जवळ-जवळ ३५० किलोग्रॅमच्या जवळ असावे.
Share your comments