शेळी पालन कमी खर्चात व कमी जागेत करता येण्यासारखा फायदेशीर व्यवसाय आहे.शेळीपालन फायदेशीर होण्यासाठीत्यांचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असते. जर आपण काही बाबींची व्यवस्थित दखल घेतलीशेळीपालनाच्या माध्यमातून चांगला नफा कमावता येऊ शकतो. या लेखात आपण शेळीपालनातील काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणार आहोत.
शेळीपालनातील छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी…
शेळीपालनामध्ये शेळीपालन आपण का करीत आहोत? याबाबतचे निश्चित उद्दिष्ट ठेवणे हे फार महत्त्वाचे असते.त्यासाठी वेगळ्या प्रकारचे उद्दिष्ट असू शकतात जसे की,आपल्यागोठ्यात असलेल्या बोकडाची फक्त पैदाशीसाठी विक्री अशा प्रकारचे उद्दिष्ट काहीजण ठेवतात.तसेचज्या शाळांना बाजारपेठेमध्ये जास्त मागणी असते अशा शेळ्यांच्या जातींची निवड करून काटेकोर नियोजनानेव्यवसाय सुरू करावा लागतो. अगदी शेळीपालन व्यवसायाचे सुरुवातीला जर स्थानिक जाती घेऊन चालू केलेल्या शेळीपालन आपेक्षाअशा प्रकारांमध्ये जास्त गुंतवणूक असते.जरी आपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीच्या असलीपरंतु अशा जातीच्या बोकडाशी संकर करून सुधारित बोकडांचे पैदास होऊ शकते. त्याचा फायदा असा होतो की कमी दिवसात चांगल्या वजनाचे बोकड तयार होऊ शकते.
शेळीपालनातील महत्वाचे सूत्रे……
1-कायम शेळ्यांच्या नवीन नवीन जातींचा अभ्यास करावा.बाजारपेठेतील मागणीचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्या गोठ्यामध्ये दरवर्षी वेगळ्या जातीचा नर आणून त्यांची पैदास करावी.
2-वेतावर आलेल्या शेळीला एक महिना आणि शेळी व्यायल्यानंतर एक महिना एक वेगळा कप्पा तयार करून तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था करावी.त्याचा फायदा असा होतो की शेळीचे दूध देण्याची क्षमता वाढते.तसेच नवजात करडू आणि शेळी यामधील प्रेमाचे नाते अधिक घट्ट होते.त्यामुळे नवजात पिल्ले सशक्त व निरोगी राहतात.
3- शेळ्यांचे आरोग्य तपासणीही नियमित पाहणी करावी.शिफारस केल्याप्रमाणे लसीकरण करून घ्यावे.
4- दर तीन महिन्यानंतर एक महिना वयाच्या पुढील पिले व शेळ्यांना जंत नाशकांचा वापर करावा.
-शेळीपालनामध्ये काटेकोरपणे शेळ्यांचे व्यवस्थापन करावे.तसेच त्यांची निगा व स्वच्छता ठेवण्यामध्ये कसूर करू नये.लागणार्या सगळ्या जमाखर्चाची व्यवस्थितपणे नोंद ठेवून गोठ्यातील शेळ्यांचा जन्म,मृत्यू तसेच शेळ्यांच्या विक्रीची नोंद ठेवावी.
6-शेळ्यांना पाणी पाजण्याचे जागा स्वच्छ असावी.तसेच पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा असावा.पाणी साठविण्याच्या टाक्या तसेच पाणी पाजण्याची भांडीनियमितपणे स्वच्छ कराव्यात.
6- शेळीपालनातील एक चांगला व जास्तीचा नफा मिळवण्याची पद्धत म्हणजेजर शेळ्या अर्धा वाटा पद्धतीने सांभाळला दिल्यास त्या माध्यमातून विनाखर्च उत्पन्न सुरू होते.अशा पद्धतीने पंचवीस वेळा शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन फारच फायद्याचे आणिजास्त नफा मिळवून देणारे ठरते.
- शेळ्यांचे मलमूत्र आणि थंडी यापासून खतनिर्मितीसाठीदहा बाय अडीच फुटाचा दोन टाक्यांचा वापर करावा.त्याद्वारे तयार झालेले गांडूळ खत व मलमूत्र द्वारे तयार झालेले खत शेतामध्ये वापरता येते.
8- शेळ्यांना आहारामध्ये कोवळी पाने, कोवळ्या फांद्या व शेंगा खायला द्यावा कारण शेळ्या झाडपालाफार आवडीने खातात.
9- 15 किलो वजनाच्या पुढे करडांना 100 ग्रॅम कडबा कुट्टी तसेच वाळलेला चारा द्यावा व तो पुढील प्रति पाच किलो वजनास 50 ग्रॅम या दराने वाढवावा.
Share your comments