1. पशुधन

गीर गायीपासून करू शकता मोठी कमाई, एका वेळेला देते 6-14 लिटर दूध

भारतातील ग्रामीण भागातील शेतकरी शेती व पशुपालनासाठी गाय, म्हैस इत्यादी दुभती जनावरे पाळली जातात. पशुपालन करताना सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जातीची निवड करणे, म्हणजे कोणत्या जातीने त्यांनी पशुपालन निवडले पाहिजे जेणेकरून त्यातून अधिक उत्पादन मिळू शकेल.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
गीर गाईच्या जातीची वैशिष्ट्ये

गीर गाईच्या जातीची वैशिष्ट्ये

भारतातील ग्रामीण भागातील शेतकरी शेती व पशुपालनासाठी गाय, म्हैस इत्यादी दुभती जनावरे पाळली जातात. पशुपालन करताना सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जातीची निवड करणे, म्हणजे कोणत्या जातीने त्यांनी पशुपालन निवडले पाहिजे जेणेकरून त्यातून अधिक उत्पादन मिळू शकेल. यासाठी पशुपालकांना गाय किंवा म्हशीसारख्या दुभत्या जनावरांच्या उत्तम जातीविषयी माहिती असणे फार महत्वाचे आहे. म्हणून आज आपण गीर गाईबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

गीर गाईचा परिचय

गीर ही भारतीय वंशाची गाय आहे. सौराष्ट्र (गुजरात) मधील गीर जंगलात गायीची गीर जात आढळते. म्हणून या गाईला गीर हे नाव पडलं असावं. या गायी 12-15 वर्षे जगतात आणि आयुष्यभरात त्या 6-10 वासरांना जन्म देतात. ही गाय चांगल्या दुधाच्या उत्पादकतेसाठी ओळखली जाते. गुजरातशिवाय, राजस्थान आणि महाराष्ट्रातही या गीर जातीच्या गायी आढळतात.

गीर गायीचे वैशिष्ट्ये

गीर जातीच्या गायीचा रंग पांढरा, गडद लाल किंवा चॉकलेटी तपकिरी रंगाचे असतात किंवा काहीवेळा चमकदार लाल रंगाचे असतात. कान लांब आणि खाली लटकलेले असतात. गीर गाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे बहिर्गोल कपाळ आहे जे त्याना उष्णतेपासून वाचवते. गीर गाय मध्यम ते मोठ्या आकारात आढळतात. मादी गीर गायचे सरासरी वजन 385 किलो व उंची 130 सेंमी असते तर नर गीरचे सरासरी वजन 545 किलो व उंची 135 सेंमी असते. त्यांच्या शरीराची त्वचा खूप मुलायम आणि लवचिक असते. शिंगे मागे वाकलेली राहतात.  ही गाय चांगल्या रोग प्रतिकारशक्तीसाठी देखील ओळखली जाते.

हेही वाचा : कमी खर्चात सर्वात जास्त दूध देणारी गाय थारपारकर

गीर गाईपासून मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण

ही गाय दिवसाला 12-14 लिटर दूध देते. गीर गाईच्या दुधात 4.5 टक्के चरबी असते. एका लॅकटेशन पिरियडमध्ये गीर गाय सरासरी 1590 किग्रा दुधाचे उत्पादन देते. गीर गाय ही प्रत्येक प्रकारच्या हवामाणात राहू शकते .आणि गरम ठिकाणीही सहज जगू शकतात.

 

गीर गाईपासून होणारा फायदा

गीर गाईचे दूध रोग प्रतिकारशक्तीसाठी उत्कृष्ट मानले जाते.  गीर गायीच्या दुधापासून तयार केलेले तूप उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय आणि मूत्रपिंडाच्या आजारामध्ये अमृतसारखे कार्य करते. गीर गाईच्या दुधात व्हिटॅमिन A-2 असते.  म्हणूनच त्याचे दूध मुलांसाठी खूप उपयुक्त मानले जाते. तसेच, या गाईच्या जातीच्या मूत्रात 388 प्रकारचे रोगप्रतिकार घटक आढळतात, जे बर्‍याच रोगांमध्ये फायदेशीर मानले जाते.

गीर गायीची किंमत

गीर गायीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर गीर जातीच्या गायीची किंमत 90 हजार ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत आहे. गायीची किंमत दुधाच्या प्रमानावर आणि गुणवत्तेच्या आधारे ठरवले जाते. दुधाची गुणवत्ता गायीला दिल्या जाणाऱ्या पोषण आहारावर अवलंबून असते.

हेही वाचा : हिरवा चारा: दुभत्या पशुसाठी एक वरदान

गीर गाईचे पालन व देखरेख

मुसळधार पाऊस, कडक उन्ह, हिमवर्षाव, थंडी आणि परजीवीपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी शेडची किंवा गोठ्याची आवश्यकता असते. यासाठी, स्वच्छ हवा आणि पाण्याचा प्रवेश असलेला शेड निवडा. गोठ्याची जागा प्राण्यांच्या संख्येनुसार मोठी आणि मोकळी असावी जेणेकरुन ते सहजपणे राहू आणि खाऊ शकतील. प्राण्यांच्या कचर्‍याची एक्झॉस्ट पाईप 30-40 सेमी रुंदीची आणि 5-7 सेमी खोलीची असावी.

गीर गाईला दिला जाणारा आहार

या जातीच्या गायींना आवश्यकतेनुसार खुराक द्यावा. गीर गाई जातीच्या आहारामध्ये पौष्टिक घटक असणे फार महत्वाचे आहे, कारण गाईपासून मिळणार्‍या दुधाची गुणवत्ता त्दिलेल्या पोषण आहाराच्या पौष्टिक मूल्यावर अवलंबून असते.  म्हणूनच, चारा निवडताना, त्याच्या पौष्टिक मूल्यांकडे लक्ष दिले पाहिजे. गायीच्या आहारामध्ये आवश्यक प्रमाणात ऊर्जा, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे असणे आवश्यक आहे.

 

  • गायीला देण्यात येणाऱ्या खुराकमध्ये मका, कॉर्न, बार्ली, ज्वारी, बाजरी, चणे, गहू, ओट्स, कोंडा, तांदूळ पॉलिश, कॉर्न हसकी, पोळ्या, कडधान्य, कोरडे धान्य, शेंगदाणे, मोहरी, कडू, तीळ, इत्यादीचा समावेश असणे आवश्यक आहे.

गीर गाईच्या आहारासंबंधी पशुवैद्यकीयांचे मत

गिर गायीला दिल्या जाणाऱ्या आहाराबद्दल डॉक्टर म्हणतात की गाईच्या दुधावर खाण्यापिण्याचा परिणाम होतो. गायीला कडबा आणि हिरवा चारा, अश्वगंधा, शतावरी,काळी मिरी, अश्वगंधा, सतावर, गहू, सुंठ, दिले तर दुधाची गुणवत्ता व प्रमाण दोन्ही वाढते व गाईचे आरोग्यही चांगले राहते.

 

English Summary: The biggest earner can from Gir cows, gives 6-14 liters of milk at a time Published on: 16 July 2021, 11:33 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters