1. पशुधन

पशु पालकांसाठी महत्त्वाचे:मुरघास बनवण्याचे उत्कृष्ट तंत्र व चांगला मुरघास ओळखण्याची पद्धत

• मुरघास तंत्रज्ञान म्हणजे काय? मुरघास (सायलेज)म्हणजे मुरलेला घास भरपूर अन्नद्रव्य असलेल्या वैरणी फुलोऱ्यात किंवा दाणे भरण्याच्या स्थितीत असताना हवाबंद जागेत विशिष्ट पद्धतीने मुरवून टिकवतात त्यासमुरघास तंत्रज्ञान म्हणतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
making method of murghaas

making method of murghaas

  • मुरघास तंत्रज्ञान म्हणजे काय?

 मुरघास  (सायलेज)म्हणजे मुरलेला घास भरपूर अन्नद्रव्य असलेल्या वैरणी फुलोऱ्यात किंवा दाणे भरण्याच्या स्थितीतअसताना हवाबंद जागेत विशिष्ट पद्धतीने मुरवून टिकवतात त्यास मुरघास तंत्रज्ञान म्हणतात.

  • मुरघास निर्मितीतील उत्कृष्ट तंत्र :-
  • मुरघासासाठी मका, ज्वारी, बाजरी,हायब्रीड नेपियर, गिनीगवत प्रक्रियायुक्त उसाचे वाडे, गजराज, पॅरा गवत, कुरणातील हिरवे गवत,रताळ्याच्या वेली, ताग केळीची पाने, भाजीपाल्यांची पाने,ओट इत्यादी तसेच एकदल वर्गीय पासून उत्तम मुरघास बनतो.
  • मका आणि ज्वारी तेल जीवनसत्वे मुरघास प्रक्रियेत टिकून राहतात.
  • हिरव्या वैरणीची कुट्टी चांगल्या दर्जाच्या कुट्टी मशीन ने करावी कुटीचीलांबी 1-3 से.मी. असावी.
  • हिरव्या वैरणीचा नेहमी जाड बुध्या च्यानिवडाव्यात कारण खोडात भरपूरशर्कराकर्बोदके असतात.
  • रोगयुक्त तसेच लष्करी आळीचा प्रादुर्भाव असलेल्या मकाकिंवा इतर चारा मुरघासासाठी शक्यतो टाळावा.
  • वैरणीची कापणी मका व ज्वारीचे दाणे दूधात असताना तसेच गवत/ द्विदल गवताला कळ्या असताना.
  • चाऱ्याला फुलोरा आला असताना कापणी करावी कारण त्यावेळी त्या चाऱ्यात जास्तीत जास्त जीवनसत्व व अन्नघटक असतात.
  • वैरण कापताना शक्यतो जमिनीपासून अर्धा फूट वरून कापावी त्यामुळे बुरशी वाढण्याचे प्रमाण रोखता येते.
  • मुरघास करताना साखरेचे/गुळाचे/ मळीचे/ मिठाचे पाणी टाकण्याची तशी गरज नसते परंतु चाऱ्याची परत खालावलेली असेल तर योग्य प्रमाणात वापरावे. चाऱ्यातील ॲसिड त्यामुळे मुरघासालाबुरशी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • चारा कापल्यानंतर ओलाव्याचे प्रमाण जास्त असेल तर थोडा वेळचारा सावलीत सुकू द्यावा.
  • दवबिंदू असताना चारा कधीही कापू नये त्यामुळे ओलाव्याचे प्रमाण वाढते.
  • कुट्टी केल्यानंतर चारा वाळूदेऊ नयेत कारण त्यातील जीवनसत्त्वे नाहीशी होतात. म्हणून लगेच तो बंकर किंवा बॅगमध्ये हवाबंद करावा.
  • मुरघासामध्ये गव्हाचा, तुरीचा कोंडा टाकून मुरघासाची प्रत वाढवता येते.
  • मुरघास बनवण्याची प्रक्रिया 20-40 दिवसात पूर्ण होते तरीही मुरघास 45-50 दिवस हवा बंद राहील याची खबरदारी घ्यावी.
  • बंकर बनवताना त्याची लांबी, उंची त्याची क्षमता गोठ्यापासूनचेअंतर इत्यादी बाबी लक्षात घ्याव्यात.
  • बंकरला उतार 1 फुटाचा असावा कारण दबलेल्या चार्‍यातून निघालेले पाणी पुढे निघून येते. आणि तळ्याचा मुरघास खराब होत नाही.
  • मुरघास शक्यतो बंकर मधेच  करावा कारण सारा भरण्यास दाबल्यास, काढण्यास व देखरेखीसाठी सोपा जातो.
  • मुरघासाची बंकर ताडपत्रीनेबंदकरावे व ताडपत्री ला उतार द्यावा जेणेकरून पावसाचे पाणी निघून जाईल.
  • ट्रॅक्टरने मुरघास तुडवताना ट्रॅक्टर चे टायर चिखलाने भरलेले नसावेत.
  • हवा आतजाऊ नये म्हणून तोंडाला शेड मातीचा लेप द्यावा. जेणेकरून भेगा पडणार नाहीत तसेच त्याच्यावर वजनदार विटा ठेवाव्यात.
  • मुरघास तयार झाल्यानंतर त्याची सॅम्पल लॅबला चेक करून घ्यावेत.
  • मुरघासाची बनकर उघडल्यानंतर 45-60 दिवसात वापर करावा व नंतर झाकून ठेवावा.
  • मुरघासाला आगीपासून संरक्षित करावे.
  • जनावरांना मुरघास किती प्रमाणात द्यावा?
  • जनावरांना चारा देताना त्यांच्या वजनानुसार कमी जास्त प्रमाणात द्यावा.
  • गाई (देशी)-12-14 किलो.
  • गाई(होलस्टीन फ्रेशियन)-20-25 किल.
  • म्हैस -15-20 किलो.
  • शेळ्या (40 45 किलो वजन)-1-1.5 किलो प्रती शेळी.
  • मेंढ्या (40 45 किलो वजन)-1-1.5 किलो प्रती मेंढी.
  • सुरुवातीला मुरघास जास्त प्रमाणात न देता हळूहळू तो वाढवत न्यावा.
  • ज्या जनावरांना आपण मुरघास देत आहोत त्या जनावरांना दररोज पन्नास ग्रॅम खा.सोडा द्यावा.त्यामुळे पोट दुखी होत नाही.
  • मुरघासातील कमी-जास्त आम्लाच्या प्रमाणामुळे जनावरांना ऍसिडिटी होते.
  • चांगला मुरघास कसा ओळखाल :-

मुरघासाचादर्जा त्याच्या रंगावरुन वासावरून,चवीवरून,स्पर्शावरून ओळखता येते.

  • रंग:- चांगल्या मुरघासाच्या रंग तिखट हिरवट-पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचा असतो.
  • वास:-चांगल्या प्रतीचा मुरघासाचा आंबट गोड वास येतो. सडका कुबट सहन न होणारा वास खराब मुरघासाचे निदर्शक आहे.
  • चव :- मुरघासाची चव आंबट असेल तर तो चांगल्या दर्जाचा मानला जातो.
  • बुरशी :-काळसर, पांढऱ्या रंगाची बुरशीची वाढ तेव्हाच होते जेव्हा भरतेवेळी bbवगव्ह्ह. प्रमाण जास्त असेल तसेच मुरघास व्यवस्थित दाबला गेला नसेल तेव्हा होतो.
  • सामू :- चांगल्या मुरघासाचासामू 3.5-4.5असावा.
  • टीप :- दुधाळ जनावरांना धारा काढल्यानंतर मूरघास द्यावा त्यामुळे मुरघासाचावास दुधातमिसळत नाही.

 बुरशी युक्त मुरघास जनावरांना मुळीच देऊ नये त्यामुळे जनावरांची पचनशक्ती बिघडते परिणामी न पिण्यायोग्य दूध तयार होते.

English Summary: the benificial technique of making murghaas and method of identy superioer qulity of murghaas Published on: 01 March 2022, 02:51 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters