शेळी हा एक पाळीव प्राणी आहे, जो दूध आणि मांससाठी पाळला जातो. शेळी गवत खाते.याशिवाय फायबर, चामडे,खत व केस याचे देखील उत्पन्न बकरीपासून मिळते. शेळी जगात पाळीव आणि वन्य प्रकारांमध्ये आढळतात आणि असा अंदाज आहे की जगभरातील पाळीव शेळ्या दक्षिण-पश्चिम आशिया आणि पूर्व युरोपमधील वन्य बोकडांचे वंशज आहेत.मानवाने निवडक प्रजननामुळे शेळ्यांना स्थान आणि वापरानुसार वेगवेगळ्या जातींमध्ये बनवले आहे आणि आज जगात सुमारे 300 जाती आढळल्या आहेत.
शेळ्यांच्या जवळपास 20 जाती भारतात आढळतात. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या म्हणण्यानुसार 2011 मध्ये जगात एकूण 924 दशलक्ष शेळ्या होत्या.
- जमुनापरी - हे इटावा, मथुरा इत्यादी ठिकाणी आढळते. हे दूध आणि मांस दोन्ही हेतूंसाठी पाळली जाते, ही शेळ्यांची सर्वात मोठी प्रजाती आहे. त्याचा रंग पांढरा असून शरीरावर तपकिरी डाग दिसतात.कान खूप लांब असतात. त्यांचे शिंगे 8-9 सें.मी. लांब आणि अरुंद असतात. जामुनापारी शेळ्यांचे दुधाचे उत्पादन दररोज 2-2.5 लिटरपर्यंत होते.
- बरबरी- ही बकरी एटा, अलिगढ आणि आग्रा जिल्ह्यात आढळते. हे मांस उत्पादनासाठी वापरले जाते, हि शेळी आकाराने लहान आहे. त्यांच्या रंगात फरक आहे. कान ट्यूबसारखे वाकलेले आहेत. पांढर्या शरीरावर जास्तकरून भुरे डाग व भुऱ्या शरीरावर पांढरे डाग आढलतात. हि जात दिल्ली व आसपासच्या परिसरात उपायुक्त ठरते.
- बीटल - ही जात दूध उत्पादनासाठी योग्य आहे. हे गुरदासपूर जवळ पंजाबमध्ये आढळते, त्याचे शरीर आकारात मोठे असते आणि पांढर्या किंवा तपकिरी डाग काळ्या रंगाच्या शरीरावर आढळतात, केस लहान आणि चमकदार असतात. कान लांब लटकलेले व डोक्याकडे वाकलेले असतात
- उस्मानाबादी- ही जात महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात आढळते. ह्या शेळीचे मांस साठी देखील संगोपन केले जाते. शेळ्यांचा रंग काळा असतो. हि बकरी वर्षातून दोनदा पिलांना जन्म देते. सहसा ही बकरी जुळ्या पिलांना जन्म देते. 20 ते 25 सेमी लांब कान असतात.
- सुरती- ही जात सूरत (गुजरात) मध्ये आढळते. हे दुभत्या जातीचे बकरी आहे. त्याचा रंग बहुधा पांढरा असतो. कान मध्यम आकाराचे, वाकलेले असतात. शिंगे लहान आणि वक्र आहेत. हे लांब अंतर चालन्यास असमर्थ असते.
Share your comments