बाबासाहेब सरगर हे मु. पो. वाघोली ता. शेवगाव, जि. अहमदनगर येथील रहिवाशी असून त्यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत झालेले आहे. ते शेतीला जोडधंदा म्हणून गेली अनेक वर्षे वडिलोपार्जित दुग्धव्यवसाय करतात. त्यांच्या कुशाबा डेअरी फार्ममध्ये सात ते आठ दुभत्या गाई आणि तीन ते चार कालवडी आहेत. लहान मोठे मिळून त्यांच्याकडे १२ ते १३ एवढे पशुधन आहे. दुग्धव्यवसायातील आधुनिक माहिती व तंत्रज्ञानासाठी ते दररोज धेनू ॲपचा वापर करतात.
धेनू ॲप हे शेतकरी व पशुपालक बांधवांना मंच (प्रश्न-उत्तरे) ज्ञान, बाजार, व्यवस्थापनासह विविध सेवा मोफत उपलब्ध करून देत असल्याने लाखों शेतकरी व पशुपालकांचा प्रगतीचा विश्वास ठरला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी व पशुपालक या धेनू ॲपशी जोडला गेला असल्याने अगदी चटकीसरशी माहितीची देवाण-घेवाण करणे या ॲपद्वारे करणे सोईचे झाले आहे. हा ॲप शेतकरी व पशुपालक हितार्थ काम करत असल्यामुळे हा आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा महामार्ग बनला आहे.
सध्या दुधाला चांगले दर असल्याने सगळीकडेच जनावरांचे भाव गगनाला भिडले आहेत त्यातच पशुपालकांच्या पशुधनाला हवा तो जर भाव मिळाला तर प्रत्येक शेतकरी आपला फायदा करून घेण्याची संधी सोडतच नाहीत. त्यातीलच बाबासाहेब सरगर हे एक आधुनिक पशुपालक आहेत. त्यांनी संपत आलेला हिवाळा आणि वाढत चाललेला उन्हाचा पारा लक्षात घेता गोठ्यातील जनावरांची संख्या जास्त वाढल्यामुळे उन्हाळ्यात चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण होऊ नये यासाठी गोठ्यातील जनावरांची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त जनावरे विकण्याचा निर्णय घेतला.
बाबासाहेब सरगर हे दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानासाठी दररोज धेनू ॲपचा वापर करत होते परंतु त्यांनी त्यातील पशु बाजार या विभागाचा कधी लाभ घेतला नव्हता. त्यांनी धेनू ॲपमधील पशु बाजार या विभागात जनावराचा फोटो, किंमत व दूध उत्पादनाच्या पूर्ण रेकॉर्डसहित जनावराची पोस्ट अपलोड केली असता ही पोस्ट काही क्षणातच प्रत्येक गाव खेड्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. धेनू ॲप हे जिओलोकेशन वरती काम करत असल्यामुळे प्रथमतः आपल्या जवळ विक्रीला असणारे जनावरे जवळच्याच शेतकऱ्यांना दिसतात त्यानंतर इतर शेतकऱ्यांना दिसतात.
श्री. सरगर यांच्या जनावराची किंमतही योग्य आणि जनावरही देखणं असल्यामुळे त्यांना जवळच्या इच्छुक पशुपालकांचे फोन येणे सुरू झाले. त्यातीलच एक जवळच्याच वडुली गावचे आधुनिक शेतकरी श्री. राजेंद्र शेळके यांनी लगेचच सरगर यांना संपर्क साधून किंमत व जनावराबाबत विचारपूस केली आणि धेनू ॲपमध्ये ४५ हजार रुपयाला विक्रीस टाकलेली गाय ४२ हजार रुपयांना शेळके यांना सुपूर्द करण्यात आली.
लाखों नवयुवक तरुण व शेतकरी बांधव दुग्धव्यवसायामध्ये दररोज धेनू ॲपचा वापर करून यशस्वीरित्या वाटचाल करून प्रगती साधत आहेत. तरी आपणही धेनू ॲपच्या या आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित न राहता दुग्धव्यवसायातील आधुनिक माहिती व तंत्रज्ञानासाठी तसेच जनावरांच्या खरेदी- विक्रीसाठी व जनावरांच्या डिजिटली व्यवस्थापनासाठी दररोज धेनू ॲपचा वापर करावा असे प्रतिपादन श्री. सरगऱ् यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले.
पशु बाजाराची ठळक वैशिठ्ये-
१) पशु बाजारमध्ये सहज आपण गाय, म्हैस, शेळी, मेंढी इत्यादी प्राण्यांची खरेदी-विक्री करू शकता.
२) पशु बाजारमध्ये आपल्या परिसरात विक्रीस असणाऱ्या प्राण्यांच्या फोटोसह वय, रंग, अपेक्षीत किंमत, तुमच्यापासुन ते अंतर किती (कि. मी) आहे तसेच त्याचे स्थानही तुम्ही पाहू शकता.
३) आपण पशु बाजारमध्ये वर्गीकरणानुसार जनावराचे स्थान, प्रकार, लिंग, जात, दैनिक दूध उत्पादन (लि), विताची संख्या, गर्भधारणा कालावधी (महिने) इत्यादी गोष्टींची माहिती घेऊ शकता.
४) जास्त लोकप्रिय मागणीची जनावरे आपण पशु बाजार मध्ये पाहू शकता तसेच त्यानुसारही खरेदी करू शकता.
५) पशु बाजारमध्ये आपण घरबसल्या जनावरे विकू शकता त्यासाठी आपल्याला जनावर कोठेही ने-आण करण्याची गरज भासत नाही.
६) पशु बाजारमधील आपल्याला जनावर आवडले असल्यास त्या ठिकाणीजाऊन जनावराची थेट खरेदी देखील करू शकता.
७) पशु बाजार मधील प्राणी आवडल्यास आपण त्या विक्रेत्याला फोन करून विक्रीबाबत किंवा प्राण्यांबाबत अधिक माहिती घेऊ शकता.
८) पशु बाजारमध्ये विक्रीला असलेल्या किंवा विक्री झालेल्या जनावरांची माहिती आपणाला घरबसल्या मिळते.
९) सामान्य जनावरांच्या बाजारामध्ये जनावरांबद्दल सखोल माहिती मिळत नाही किंवा त्यांच्याकडे पूर्वीचे रेकॉर्ड नसते त्यामुळे धेनू ॲपमधील पशू बाजार मधून जनावर खरेदी केल्यास रेकॉर्डसहित सर्व माहिती मिळते.
१०) सामान्य बाजारामध्ये गाईचे दूध काढून तिचे दूध उत्पादन किती आहे हे तपासणे खूप अवघड जाते.
११) बाजारामध्ये विक्रीस आणलेल्या जनावरांना इतर जनावरांपासून संसर्गजन्य आजार होण्याची जास्त शक्यता असते.
१२) जनावरांच्या आठवडीबाजारामध्ये चोरीचे सुद्धा जनावर असण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त अडचणी निर्माण होऊ शकतात.
१३) पशु बाजारमध्ये थेट ग्राहकाचा विक्रेत्यांशी संपर्क झाल्यामुळे दलालीचा प्रश्नच उरत नाही उलट जनावर चांगल्या किंमतीला विकले जाऊ शकते.
१४) पशु बाजारच्या माध्यमातून जनावरे खरेदी करताना थेट मालकाच्या गोठ्यावरील त्या जनावराच्या आहाराचे, चाऱ्याचे, गोठ्याचे व्यवस्थापना संदर्भातील बाबी पाहण्यास मिळतील. त्यानुसार आपल्या गोठ्यातील व्यवस्थापन करणे सोईचे होईल.
१५) पशुधनाची योग्य खरेदीही अतिशय महत्वाची बाब असून ९०% पशुपालक लक्षात घेत नाहीत आणि त्यामुळे आहार व्यवस्थापनातील खर्च वाढून योग्य ते व्यवस्थापन न झाल्याने आवश्यक दूधउत्पादन मिळत नाही.
जाहिरात-
1) पशुधन मिल्किंग मशीन
पशुधन मिल्किंग मशीन ऑर्डर करण्यासाठी कॉल करा.
मो. नं. - ८२०८५२०९४१
2) दिपकार
देशी गाईच्या शेणापासून दिवे बनवण्याची मशीन
दिपकार मशीन ऑर्डर करण्यासाठी आजच या नंबरवर कॉल करा. मो. नं. 9130233557, 7499944628
टीप- पशुपालकांनो !! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्लेस्टोर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
लिंक -https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=XXPBY3
लेखक-
नितीन रा. पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा. लि. भोसरी,पुणे.
मो. नंबर - 9766678285.
ई-मेल- nitinpisal94@gmail.com
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो कोरडवाहू शेतीतील खर्च करा कमी, तुमचं बजेट करा तयार..
शेतकऱ्यांचा वाली आहे का कोणी? अधिवेशनात बघताय ना कसा राडा सुरूय..
पीकविमा नेमका कोणाच्या फायद्याचा, त्याचा फायदा काय?
Share your comments