1. पशुधन

गाई खरेदी करतांना "या" गोष्टींची खबरदारी बाळगा, नाहीतर होणार नुकसान

देशात मोठ्या प्रमाणात पशु पालन केले जाते राज्यात देखील अनेक अल्पभूधारक व भूमिहीन शेतकरी पशुपालन क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. पशुपालन करुन अनेक शेतकरी चांगली मोठी कमाई करताना दिसत आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी बांधव पशुपालन करत असतो. देशात सर्वात जास्त गाईंचे पालन केले जाते. अनेक शेतकरी गाईचे पालन करण्यासाठी गाई विकत घेत असतात.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
precautions for buying cow

precautions for buying cow

देशात मोठ्या प्रमाणात पशु पालन केले जाते राज्यात देखील अनेक अल्पभूधारक व भूमिहीन शेतकरी पशुपालन क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. पशुपालन करुन अनेक शेतकरी चांगली मोठी कमाई करताना दिसत आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी बांधव पशुपालन करत असतो. देशात सर्वात जास्त गाईंचे पालन केले जाते. अनेक शेतकरी गाईचे पालन करण्यासाठी गाई विकत घेत असतात.

म्हशीचे संगोपन करण्याऐवजी आता पशुपालक शेतकरी गाईचे संगोपन करण्याकडे जास्त वळू लागले आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गाईचे संगोपन करणे हे तुलनेने खूपच सोपे असते शिवाय यासाठी खर्च देखील नगण्य असतो. मात्र अनेकदा पशुपालक शेतकऱ्यांना गाई खरेदी करताना नुकसानीला सामोरे जावे लागते. अनेकदा खरेदी केलेली गाय दूध देत नाही, अथवा त्या गाईला कुठला तरी विकार जडलेला असतो त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांसाठी आज आम्ही एक महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण गाय खरेदी करताना कुठल्या गोष्टींची खबरदारी बाळगली पाहिजे. तसेच कुठल्या गोष्टींची खातरजमा करून गाईची खरेदी केली पाहिजे याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत, चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या विषयी.

  • शेतकरी मित्रांनो गाय खरेदी करताना गायीची वंशावळ बघणे अतिशय महत्त्वाचे ठरते. कारण की गाय मध्ये असलेली रंगसूत्र व गुणसूत्र यावरून तिची दूध उत्पादनक्षमता ठरत असते. आणि हे गुणसूत्र गाईला तिच्या माते पासून प्राप्त होत असतात. त्यामुळे नेहमी वंशावळ बघणे गरजेचे असते.
  • गाय खरेदी करताना अजून एका गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे गायचे दुध काढतांना पान्हा सोडण्यास किती वेळ लागतो हे देखील जाणणे गरजेचे असते. कारण की गाईचा स्वभाव हा खूप हट्टी असतो, तसेच अनेक गाईंना पान्हा सोडताना काही वाईट सवयी जडलेल्या असतात.
  • शेतकरी मित्रांनो गाय नेहमी शांत स्वभावाची खरेदी करावी, कारण की तापट स्वभावाची अथवा मारणारी गाय जास्त दूध देत नाही शांत स्वभावाची गाय मात्र भरपूर दूध देते म्हणून गाय खरेदी करताना नेहमी शांत स्वभावाची काय खरेदी करावी. सर्व जातींच्या गाईच्या तुलनेत खिल्लार जातीची गाय सर्वात जास्त तापट समजले जाते आणि या जातीची गाय खूपच कमी दूध देते त्यामुळे तापट जातींची गाईची खरेदी करू नये यामुळे दूध उत्पादनक्षमतेत कमालीची घट बघायला मिळते.
  • अनेकदा गाडी खरेदी करण्यासाठी गेले असता गाईचे मालक आपल्यासमोर दूध काढून दाखवतात, मात्र अनेकदा असे लोक दूध तुंबवून ठेवतात त्यामुळे जेव्हा आपल्या समजदूत काढले जाते तेव्हा ते जास्त निघते. म्हणून गाय खरेदी करण्यासाठी गेले असता कमीत कमी दोन वेळा आपल्या समोर दूध काढण्यास सांगावे.
English Summary: take these precautions when buying cow Published on: 08 January 2022, 06:28 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters