उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांचे व्यवस्थित व्यवस्थापन केले नाही तर जनावरे हे बऱ्याच आजारांना बळी पडतात. यामागचे प्रमुख कारण असे की उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते. त्यामुळे जनावरांना मिळेल ते खाद्य देऊन त्यांची आहाराची गरज भागवण्या कडे सर्वसामान्य कल दिसून येतो.
त्यामुळे असा निकृष्ट दर्जाचा चारा किंवा खाद्य मिळाल्याने जनावरे खाताना व्यवस्थित रवंथ करत नाही. त्यामुळे अपचन यासारखे आजार होतात. जनावरांची प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम होऊन वजन घटते. उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान देखील वाढते. त्यामुळे हे वाढलेले तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातील उष्णता व शरीरक्रिया चा वेग वाढवून शरीराबाहेर टाकावे लागते. त्यामुळे जनावरांच्या शरीर क्रियांवर ताण पडून त्याचा परिणाम म्हणून जनावरे अधिक पाणी पितात वचारा, खाद्य कमी खातात.उन्हाळ्यामध्ये जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. उष्माघाताची लक्षणे थोडक्यात जाणून घेऊ.
उष्माघाताची लक्षणे
1-उष्माघात झाल्याने जनावर अस्वस्थ होते व जनावरांची तहान आणि भूक मंदावते.
2- उष्माघात त्यामध्ये जनावराचे शरीराचे तापमान 104 ते 106 अंश फॅ.इतके वाढून कातडी कोरडी पडते.
जनावरांचा श्वासोच्छ्वासाचा दर वाढून धाप लागल्यासारखे होते.
4- जनावरांची डोळे लालसर होतात व त्यातून पाणी गळते.
5- जनावरांना आठ तासानंतर अतिसार होतो तसेच त्यांचे लघवीचे प्रमाण कमी होते.
6- जनावरे बसून घेतात व गाभण गाई गाभडण्याचे प्रमाण वाढते.
उष्माघातावर उपचार
उष्माघात झाल्यावर जनावरांना थंड पाण्याने स्वच्छ धुवावे व झाडाच्या सावलीत अथवा इतर थंड ठिकाणी बांधावे. हलके पाचक गुळ मिश्रित खाद्य द्यावे तसेच जनावरांच्या दोन्ही शिंगांच्या मध्ये पाण्याने ओले कपडे ठेवून त्यावर वारंवार थंड पाणी टाकावे. जनावरास नियमित व वारंवार म्हणजेच कमीत कमी तीन चार वेळेस थंड पाणी पाजावे.
संकरित गाईंची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी?
- विशेषता जनावरांना गोठ्यामध्ये थंड जागी किंवा झाडाखाली बांधावी.
- तसेच गोठ्याच्या छपरावर गवत, पालापाचोळा टाकून पाणी शिंपडावे त्यामुळे गोठा थंडे राहतो.
- जनावरांना तीन-चार वेळेस थंड पाणी पाजावे.
- आहारामध्ये क्षार मिश्रणाचा योग्य वापर करावा.
- जनावरांना उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस चरण्यासाठी पाठवू नये.
- गोठ्यामध्ये अधून मधून हलकेसे पाणी फवारावे.रात्री व पहाटेच्या वेळी वाळलेली वैरण भरपूर प्रमाणात द्यावी.
- दुपारच्या वेळेस हिरवी मका,चवळी,कडवळ यासारखे पोषक वैरण द्यावी. त्यामुळे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमता सुधारते.
तसेच खाद्यातून अ जीवनसत्वाचा पुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त हिरवा चारा देण्याचा प्रयत्न करा. उन्हाळ्यात जनावरांना लाळ खुरकत व फऱ्या सारख्या रोगाची प्रतिबंधक लस योग्य वेळी टोचून घेणे गरजेचे आहे.दुभत्या जनावरांना प्रमाणेच लहान वासरे, कालवडी,पारड्या, भाकड जनावरे व गाभण जनावरे यांची योग्य ती काळजी घ्यावी.तसेच पाण्यामधून इलेक्ट्रोलाईट पावडर, ग्लुकोज पावडर किंवा गूळ मिश्रीत पाणी प्यायला द्यावे.
Share your comments