1. पशुधन

कोंबड्यांना लसीकरण करताना 'ही' घ्या काळजी

शेतकरी पूरक व्यवसाय करताना कुक्कुटपालनाकडे वळतात. मात्र, बहुतांश लोकांचा सूर गावठी कोंबडी पालनाकडे असतो. मात्र, जर जादा फायदा मिळवायचा असेल तर सुधारित जातीचे कोंबडीपालन ही बाब आवश्यक आहे.

KJ Staff
KJ Staff


शेतकरी पूरक व्यवसाय करताना कुक्कुटपालनाकडे वळतात. मात्र, बहुतांश लोकांचा सूर गावठी कोंबडी पालनाकडे असतो. मात्र, जर जादा फायदा मिळवायचा असेल तर सुधारित जातीचे कोंबडीपालन ही बाब आवश्यक आहे. गावठी कोंबडीपालन व्यवसायात देशी जातीच्या कोंबड्यांचा अधिक वापर होतो. त्यांचे अंडी उत्पादन कमी असते. याचबरोबर व्यावसायिक पद्धतीने कोंबडीपालन करताना अधिक सजग राहण्याची गरज आहे. कोंबड्यांचे लसीकरण योग्य काळात करणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण जाणून घेऊ लसीकरणाची प्रक्रिया.

लसीकरण करताना  

पक्ष्यांत संसर्गजन्य रोगप्रतिबंधक लसीकरण यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. याबाबत कुक्कुटपालक जागृत असला पाहिजे. त्याचप्रमाणे रोगाचा प्रसार कसा होतो, हेदेखील माहीत असणे गरजेचे आहे. रोगप्रतिबंधक लस नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी. वापरून उरलेली लस पुन्हा वापरू नये. अशा लसीची रोगप्रतिकारशक्ती नष्ट झालेली असते. लसीच्या उत्पादक कंपनीचे नाव, लसीचा प्रकार, बॅच नंबर, लस तयार केलेली तारीख, लस उपयोगात आणण्याची अंतिम तारीख याचा तपशील नोंद करून लस वापरावी.

 

कोंबड्यांमध्ये निरनिराळ्या वयोगटांत निरनिराळ्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. वातावरणात सदैव विषाणू, जिवाणूंचे अस्तित्व असते. पोषक वातावरण मिळाल्यास त्यांचा प्रादुर्भाव सुरू होतो. कोंबड्यांमध्ये प्रामुख्याने मानमोडी, इन्फेक्शियस ब्राँकायटीस, गंबारो, इन्फेक्शियस लँरिगो ट्रॅकायटिस, न्युमोनिया, रक्ती हगवण, पुलोरम, अफलाटॉक्सिन, टायफॉईड, पॅराटायफॉईड, कॉलरा, सीआरडी, देवी या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो.

असा होतो रोगाचा प्रसार

  • दूषित खाद्य खाल्ल्यास त्या रोगाचा प्रादुर्भाव इतर पक्ष्यांना होतो.
  • शेड अस्वच्छ असल्यास, अशा वातावरणात रोगकारक जंतूंची वाढ झपाट्याने होते.
  • शेडमधील रोगबाधित पक्ष्यांच्या विष्ठेतून, नैसर्गिक स्राव यातून रोगकारक जंतू पक्ष्याचे खाद्य, पाणी दूषित करतात. असे पाणी इतर पक्ष्यांनी प्यायल्यास, त्यांना त्या रोगाची लागण होऊ शकते.
  •  त्याचप्रमाणे शेड निर्जतुक करूनच पक्षी शेडमध्ये सोडावेत.
  • सर्व खाद्यभांडी, पिण्याची भांडी निर्जंतुक करून वापरावीत.
  • निकृष्ट प्रतीचे खाद्य, कमी रोगप्रतिकारशक्ती हे लक्षात घ्यावे.
  • शेडमधील लिटर ओले झाल्यास अशा वातावरणात रोगकारक जंतूंची वाढ झपाट्याने होते.
  • आजारी पक्षी आणि निरोगी पक्षी एकाच घरात असतील, तर रोगांचा प्रसार त्वरित होतो.
  • रोगाचा प्रसार झालेल्या शेडमधील भांडी, उपकरणे, काम करणारे कामगार, त्यांच्या अंगावरील कपडे,  त्याच्या वाहनाबरोबर बाहेरील जंतू दुसऱ्या शेडमध्ये येऊन रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
  • रोगाने मेलेले पक्षी जाळून टाकावेत.

लसीकरण करताना या गोष्टी लक्षात ठेवा    

  • रोगप्रतिबंधक लस नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी.
  •  लसीकरण करण्यासाठी नेताना रोगप्रतिबंधक लस बर्फ ठेवलेल्या भांड्यातूनच न्यावी.
  • परून उरलेली लस पुन्हा वापरू नये. त्या लशीची रोगप्रतिकारशक्ती नष्ट झालेली असते.
  • वापरून उरलेली लस, बाटल्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.
  • लसीकरणासाठी वापरलेली सिरिंज, सुया, भांडी स्वच्छ धुऊन निर्जंतुक करून घ्यावी.
  • लसीच्या उत्पादक कंपनीचे नाव, लसीचा प्रकार, बॅच नंबर, लस तयार केलेली तारीख, लस उपयोगात आणण्याची अंतिम तारीख याचा तपशील नोंद करून लस वापरावी.

 


लसीकरणानंतरची काळजी

लस टोचल्यानंतर पक्ष्यांना थकवा येऊ शकतो. याकरता लस टोचण्यापूर्वी तीन दिवस अगोदर आणि लसटोचणीनंतर पाच ते सहा दिवस सर्व पक्ष्यांना पाण्यातून अँटिबायोटिक्स दयावीत. उन्हाळ्यात लसटोचणीचा कार्यक्रम असेल, तर रोगप्रतिबंधक लस सकाळी किंवा रात्री टोचावी म्हणजे पक्ष्यांवर ताण येणार नाही.

रोगप्रतिबंधक लसीकरण फक्त सशक्त पक्ष्यांना करावे.

एकावेळी एकच लस टोचावी. एकाच वेळी दोन किंवा तीन लस दिल्यास रोगप्रतिकारशक्ती तयार

होणार नाही. उलट पक्ष्यात रिअॅक्शन येऊन नुकसान होईल.

(स्रोत – दीनदयाल शोध संस्थान, कृषी विज्ञान केंद्र, डिघोळअंबा, अंबाजोगाई)

English Summary: Take care when vaccinating chickens Published on: 22 September 2020, 02:14 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters