आरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे पाहिले 24 तास आणि नंतरचे उर्वरित जीवन अशा दोन भागात विभागले आहे. पहिले 24 तास खूप जोखमीचे असतात, जर वासराची पहिल्या 24 तासामध्ये पुरेशी काळजी घेतली गेली नाही, तर वासराला आजार होण्याची शक्यता असते.
अशी वासरे अशक्त होतात. जरी वासरांमध्ये अनुवंशिक गुणधर्म चांगले असले आणि चांगले व्यवस्थापन असले तरी त्यांची वाढ खुंटते. त्यांना हगवण होते
नवजात वासरांचे संगोपन
- नवजात वासराच्या जन्मानंतरच्या पहिलातास खूप महत्वाचा आहे.
- वासराचे तोंड व नाक खूप स्वच्छ करावे. त्यामुळे वासराची श्वसन क्रिया व्यवस्थित चालू होईल.
- गाईला वासरास चाटू द्यावे. त्यामुळे वासराच्या शरीरातील रक्ताभिसरण होण्यास मदत होईल त्यामुळे वासरू उठून उभे राहून चालू लागते.
- वासराची नाळ बेंबीपासून दोन इंच अंतरावर कापून ती स्वच्छ दोर्याने बांधून घ्यावी. जेणेकरून नाळेचे तोंड बंद होईल. नंतर टीचर आयोडीन द्रावणामध्ये कमीत कमी तीन सेकंद बुडवावी. जर नाळेचा तोंड चुकून उघडे राहिले तर जंतूंचा संसर्ग होऊ शकतो.
नवजात वासरास पहिल्या दोन तासात दोन लिटर चिक पाजावा आणि नंतर 12 तासात एक ते दोन लिटर चीक पाजावा.चिका द्वारे वासरांना रोग प्रतिकार शक्ती मिळते.
- वासरांना पहिल्या एक दोन तासात पुरेशा प्रमाणात चीक पाजला नाही,तर अशी बासरी अशक्त बनतात.आजारी पडतात.
- सुरुवातीला पुरेशा प्रमाणात वासरांना चिक मिळाला तर त्यांची तीन महिन्यापर्यंतरोग प्रतिकारशक्ती तयार होते.
वासरांना जंतनाशकाचा वापर
- पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दहा ते चौदा दिवसात पहिले जंतनाशक द्यावे.नंतर प्रत्येक महिन्याला वयाच्या सहा महिन्यापर्यंत जंतनाशक द्यावे.
वासरांमध्ये हगवण /अतिसार
- वासरांमध्ये अतिसाराची विविध कारणे आहेत. त्यामुळे वासराच्या शरीरातील पाणी तसेच सोडियम पोटॅशियम कमी होते. त्यामुळे दगावू शकते.
उपाय योजना
हगवण / अतिसार असणाऱ्या वासरांना पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार इलेक्ट्रोलाईट द्यावे. घरगुती इलेक्ट्रोलाईट बनवण्यासाठी एक लिटर कोमट पाणी घ्यावे. त्यामध्ये पाच चमचे ग्लूकोज एक चमचा खाण्याचा सोडा आणि एक चमचे मीठ मिसळावे हे द्रावण वासराला पाजावे.
- हगवण / अतिसाराचे कारण ओळखून पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन औषध उपचार करावेत, वासरांना साखर पचत नाही, त्यामुळे आणखी हगवन अतिसार होऊ शकतो म्हणून वासरांना ग्लूकोज द्यावे.
- वासरांना पुरेशा प्रमाणात चीक पाजावा.
- गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी.जागा कोरडी असावी.
- वासरू पाजण्याच्या साधी व पाजल्यानंतर गाईची कास स्वच्छठेवावी
Share your comments