कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सध्या कुक्कुटपालनच्या व्यवसायात वाढ झालेली आहे त्यामुळे घटलेले दर आता पुन्हा वाढले आहेत. सध्या हिवाळा सुरू असल्याने ब्रॉयलर कोंबडीला संतुलित आहार देणे सर्वात महत्त्वाचे आहे. खाद्य पदार्थातील सर्वात जास्त ऊर्जा देणारा घटक म्हणजे तेल तसेच स्निग्ध पदार्थ होय.
बदलत्या वातावरणाचा कोंबड्यांच्या आरोग्यावर परिणाम :-
मांसल कोंडी पालन केले तर शेतकऱ्यांना ४०-४५ दिवसात उत्पन्न मिळते त्यामुळे भांडवल ही राहते आणि शेतीला लागणारे खत सुद्धा उपलब्ध राहते. हिवाळा ऋतू सुरू झाला की मांसल कोंबड्याना मोठी मागणी असते. कोंबड्यांची उत्पादकता ही वातावरणातील तापमानावर अवलंबून असते. जर १० अंश सेल्सियस पेक्षा कमी आणि २८ अंश सेल्सियस पेक्षा जास्त तापमान असेल तर कोंबडीवर परिणाम होतो जे की कोंबड्याचामृत्यू होतो. कोंबड्याच्या वाढीसाठी १८ ते २१ अंश सेल्सियस तापमान कधीही चांगले असते.
पिलांसाठी कृत्रीम ऊर्जा व्यवस्थापन :-
लहान पिलांना तुम्ही ज्या खोलीत ठेवणार आहात त्याच्या दोन्ही बाजूला पडदे लावावे जेणे थंड हवा आतमध्ये येणार नाही. खोलीच्या आत कृत्रिम ऊर्जा ची व्यवस्था करावी ज्यामुळे पिलांना ऊब लागेल. हिवाळ्यात पहिले ३ आठवडे ऊर्जा देणे गरजेचे आहे मात्र जास्त ऊर्जा झाली तर पडदे उचलून घ्यावे म्हणजे ऊर्जा बाहेर पडेल आणि बाहेरची ताजी हवा आतमध्ये येईल त्यामुळे पिलांचे आरोग्य पण चांगले राहील.
हिवाळ्यातील व्यवस्थापन :-
१. जर शेड चे छत फुटले असेल तर ते व्यवस्थित करावे तसेच दोन्ही बाजूने पडदे लावावे म्हणजे बाहेरची थंड हवा आत येणार नाही व पिल्ले आजारी पडणार नाहीत. पडदे चालू बंद करावेत व आतमध्ये कृत्रिम ऊर्जा तयार करावी.
२. लाईट प्रॉब्लेम आला तर पिलांना ऊर्जा पुरवण्यासाठी दुसऱ्या पर्याय शोधावा. खोली नुसार कोंबड्याची वाढ करावी व ज्यावेळी पडदे बंद असतील तेव्हा एक्झॉस्ट फॅन सुरु करावे.
३. पिलांच्या खाद्यामध्ये तेल तसेच स्निग्ध पदार्थाचे प्रमाण असावे त्यामुळे पिलांना ऊर्जा भेटते. तसेच थंडीत पिलांना कोमट पाणी पिण्यास ठेवावे. पिलांना शुद्ध तसेच जंतूविरहित पाणी पुरवठा करावा.
Share your comments