सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडत चालली आहे. थंडीत आपल्या गुरांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच वाढती थंडी जनावरांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरत असते.तसेच थंडीचा सर्वात मोठा परिणाम हा दुधाळ गुरांवर होत आहे. या ऋतुत जनावरांची पचनशक्ती मंदावते म्हणून उर्जायुक्त आहार जनावरांना देणे गरजेचे असते.
हिवाळ्यात थंडीमुळे जनावरांना फुफ्फुसाचे आणि श्वसनाचे विकार होतात. त्यामुळे जनावरांच्या आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवावे. गोठ्यामध्ये उबदारपणा राहण्यासाठी गोठ्याच्या जाळीला पोते बांधावे. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जनावरांना बांधावे. जनावरांना पुरेसे स्वच्छ पाणी पाजावे. जनावरांकडे लक्ष ठेवूनही त्यांचा माज लक्षात न आल्यास अशा गाई, म्हशींची पशू वैद्यकाकडून आरोग्य तपासणी करावी. हिवाळ्यात जनावरांना थंडीपासून बचाव करण्यासाठी जनावरांना जास्तीचा खुराक द्यावा. याशिवाय योग्य प्रमाणात हिरवा चारा द्यावा. आणि वासरांना हिवाळ्यात उबदार ठिकाणी ठेवावे.
हिवाळ्यामध्ये गोचिड, पिसवा, खरजेचे किडे यांसारख्या बाह्य परजीवींचा जास्त प्रादुर्भाव होतो. हे बाह्य परजीवी जनावरांचे रक्त शोषतात. यामुळे रक्ताची कमतरता होवून जनावरे अशक्त होतात. बाह्य परजीवींपासून बचाव करण्यासाठी जनावरांना खरारा करावा. यामुळे शरीरावरील बाह्य परजीवी गळून पडतात. गोठ्याच्या फटीत हे परजीवी लपून बसतात त्यामुळे गोठ्याच्या कानाकोपऱ्यामध्ये लपलेले असतात त्यामुळे गोठ्यात गोचिडनाशकांची फवारणी करावी. हिवाळ्यात पशू वैद्यकाकडून योग्य सल्ला घेवून जनावरांना लसी द्याव्यात.
Share your comments