सध्या जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजारांचा प्रादुर्भाव दिसत आहेत. त्यात कासदाह, लंपी स्कीन डिसीज, धनुर्वात, जनावरातील डेंगू अशा विविध प्रकारांच्या आजारांनी पशुपालकांना मध्ये चिंतेचे वातावरण पसरत असते. परंतु जनावरांची व्यवस्थित काळजी घेतली व स्वच्छता ठेवून व्यवस्थित निगा ठेवली तर बऱ्याचशा प्रमाणात आजारांच्या होणारे प्रमाणे कमी होते. आणि पशुपालकांना होणारा आर्थिक फटका हा वाचतो. जनावरांमध्ये होणारा धनुर्वात हा कोणत्या कारणामुळे होतो त्याची लक्षणे व त्यावरील उपाय याविषयीची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
बहुतांशी जनावरांच्या शरीरावर होणाऱ्या जखमांमधून धनुर्वात आजाराची जिवाणू जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत हे जिवाणू रुजल्याने मोठ्या संख्येने क्लोस्ट्रिडियम टिटॅनी जिवाणू तयार होऊन चेतासंस्थेस घातक असलेले विष तयार करण्याचे काम करतात. मज्जातंतू द्वारे हे जिवाणू जनावरांच्या मेंदूत प्रवेश करतात व या जनावरांना बाधित करतात. जनावरांमध्ये कमीत कमी दोन ते तीन दिवस व जास्तीत जास्त चार आठवड्यात धनुर्वाताची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.
धनुर्वाताच्या प्रादुर्भावाची कारणे
- बऱ्याचदा जनावरांना नांगर, एखादा प्राणी चावल्याने, किंवा एखाद्या टोकदार वस्तू लागल्याने जनावरांच्या पायाला, पोटाला जखमा होतात, अशा जखमा मातीच्या सानिध्यात आल्या तर धनुर्वाताची लागण होऊ शकते.
- नवजात वासरे, करडे यांच्या नाळेला जर जंतुसंसर्ग झाला तर जखम तयार होऊन किंवा जनावरांमध्ये विविध आजारांत करिता केलेल्या शस्त्रक्रिया यामुळे होणाऱ्या जखमांना संसर्ग होऊन मातीसोबत संपर्क येतो.
- जनावरांच्या शरीरावरील जखमांचे वेळीच योग्य उपचार न केल्याने त्या जखमेतून रक्तमिश्रित पू बाहेर येण्यास सुरुवात होते. त्यामुळे जखम आतील पेशी कमकुवत किंवा कार्यक्षम होतात. या जखमी पेशी क्लोस्त्रिदियम टिटॅनी जीवाणूच्या बीजाणूशी संपर्क आल्याने लगेच या जिवाणूंचा शरीरात शिरकाव होतो. प्रथम जखमी पेशींमध्ये हे बीजाणू रुजतात आणि जिवाणूंची संख्या वाढून विष तयार होण्यास सुरुवात होते. हे विशेष शारीरिक हालचाल व इतर कार्य नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतू द्वारे मेंदू आणि तेथून शरीरात पोहोचते.
- मज्जातंतू व मांस पेशी यांचे जोड अ कार्यक्षम होऊन स्नायूंचे कार्य अनियंत्रित होते आणि बाधित जनावराला अर्धांग वायूचे झटके येण्यास सुरुवात होते. तोंड व शोषण संस्थेसंबंधित स्नायू ताठर व बद्ध होण्याने अखेरीस जनावराचा तडफडून मृत्यू होतो.
धनुर्वाताची लक्षणे
- धनुर्वाताच्या सुरुवातीला जनावरांचे शारीरिक तापमान सामान्य असते. चारा खाण्याकडे अंशतः दुर्लक्ष करतात.
- अर्धांगवायूचा झटका येण्याच्या अखेरीस शारीरिक तापमान 42 43 अंश सेल्सिअसपर्यंत वाढते.
- तीव्र शारीरिक हालचाल होते, शरीर ताठ होऊन झटके येतात. जनावरे उजेड, आवाज किंवा स्पर्शाला अतिवेगाने प्रतिसाद देतात.
- प्रथम तोंडाच्या स्नायूंना अर्धांगवायूचा झटका येतो दातखिळी बसते त्यामुळेच जनावर तोंड उघडू शकत नाही. त्यानंतर मान, पाठ व पायाच्या भागातील स्नायू ताठर होतात. शरीर लाकडासारखे कडक होते.
- शरीरातील श्वसन व रक्ताभिसरण संस्थांच्या स्नायूंची हालचाल अनियंत्रित झाल्याने या दोन्ही संस्थांचे कार्य बिघडून जनावरांना श्वास घेताना त्रास होतो.
- रक्तदाब कमी जास्त होऊन श्वसन संस्थांच्या अवयवांना अर्धांगवायूचा झटका येऊन साधारणपणे एक आठवड्याच्या आत जनावराचा मृत्यू होतो.
जनावरांमधील धनुर्वाताचे निदान
- जनावरांना जखमा असतील किंवा जखमा झाल्याचा पूर्वइतिहास असल्यास धनुर्वात रोगाचे लक्षण वरून लवकर निदान करता येते.
- योग्य उपचाराकरिता धनुर्वाताचे प्रयोगशाळेत अचूक निदान करता येते. यामध्ये रक्तद्रव्य मध्ये विषाची ओळख आणि त्याची पातळी यांची तपासणी करावी लागते.
- जखमेच्या नमुन्यात मधून जिवाणू प्रयोगशाळेत वेगळे करून क्लोस्त्रिदियम टिटॅनीची ओळख पटवता येते.
जनावरांमधील धनुर्वातावरील उपचार आणि नियंत्रण
- जनावरांना धनुर्वात झाल्यास मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु योग्य निदान केले गेल्यास पशु वैद्यकीय सल्ल्याने जनावरांच्या शरीरावरील जखमा प्रतिजैविकांच्या द्रावणाने स्वच्छ कराव्यात. पशुतज्ज्ञांकडून प्रतिजैविके टोचून घ्यावी. जनावरांच्या स्नायूंना आराम मिळणारी औषधे वेदनाशमक औषधे दिल्यास आजारातून बरे होण्यास मदत होते.
- जनावरांना लसीकरण आज प्रभावी उपाय आहे. टिटॅनस टॉस कॉइड लस जनावरांना पशुवैद्य का मार्फत एकदाच दिल्याने धनुर्वात विरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढते. नवजात वासरांना व करडांना स्वच्छ जागेत ठेवावे. शाळेला जंतुसंसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी.
वरीलप्रमाणे आपण जनावरांची काळजी घेऊन धनुर्वात त्यामुळे होणारे नुकसान टळू शकते.
स्त्रोत- स्मार्ट डेरी डिजिटल मॅगझीन
Share your comments