1. पशुधन

जनावरांतील माज ओळख व कृत्रिम रेतन

जनावरांतील माज लक्षणे व तो कसा ओळखावा आणि कृत्रिम रेतन कधी व कसे करावे या विषयी विस्तृत माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

KJ Staff
KJ Staff
  1. निरणातून सोट/स्त्राव दिसून येणे किंवा माजाची बाह्य लक्षणे आणि लैंगिक वर्तणूक दिसून येणे म्हणजे माजाची अवस्था नव्हे.
  2. बीजाची वाढ परिपक्वता होऊन सुटण्याची स्थिती म्हणजे माज होय.
  3. माजाची खात्री प्रत्येक वेळी पशुवैद्यकाकडून होणार्‍या प्रजनन तपासणीद्वारेच करून घेता येते.
  4. माजाची लक्षणे आणि अवस्था असणार्‍या जनावरात कृत्रिम रेतन करायचे किंवा टाळायचे याचे निदान केवळ पशुवैद्यक करू शकतो.
  5. फक्त सामान्य, नियमित माजात गर्भधारणेची खात्री असते. म्हणूनच विकृत, सदोष, अनियमित माजास कृत्रिम रेतनाचा आग्रह करून नये.
  6. माजाच्या काळात कृत्रिम रेतनाची अचूक वेळ त्या जनावराची तपासणी केलेला पशुवैद्यक करू शकतो. म्हणून योग्य वेळीच रेतनाचा आग्रह असावा.
  7. एकाच जनावरातील कोणत्याही दोन माजाच्या काळात रेतनासाठी ठराविक एक वेळ/निश्‍चित वेळ असू शकत नाही.
  8. माजाचा कालावधी स्त्रीबीज/अंडे सुटण्याच्या विलंबामुळे लांबू शकतो. मात्र, माजाचा काळ संपल्यानंतर बारा तासात अंडे सुटते.
  9. सामान्यत: माज संपण्यापुर्वी बारा तास आगोदर कृत्रिम रेतन करणे अपेक्षित असते.
  10. माजाचा काळ सुरू होण्याची अथवा संपण्याची अवस्था निश्‍चित घड्याळ वेळ मांडता येत नाही. त्यामुळे पहिले माजाचे लक्षण निदर्शनास येणे हीच माज सुरू झाल्याची वेळ असे गृहीत धरणे अपेक्षित असते.
  11. दूषित/धुसर/पूमिश्रीत माजाचा स्त्रव असणार्‍या जनावरात कृत्रिम रेतन करून घेणे टाळून उपचाराचा पुरावा करावा.
  12. माज ओळखण्यासाठी दररोज सकाळी आणि सायंकाळी गोठ्यातील प्रत्येक जनावराचे बारकाईने निरिक्षण करावे, ही पशुपालकाची जबाबदारी असते.
  13. कृत्रिम रेतनाचे तंत्र पशुपालकांसाठी उपलब्ध जैवतंत्रज्ञान असून, त्याचा अवलंब करणे सर्वच जनावरात अपेक्षित असते.
  14. प्रजननाचे व्यवस्थापन आणि प्रजनन आहार हा आधुनिक मंत्र कृत्रिम रेतनासह स्विकारल्यास दूध व्यवसाय शाश्‍वत फायदेशीर ठरतो.
  15. स्वच्छता निर्जंतुकीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीचा सहयोग पशुवैद्यकास दिल्यासच यशस्वी फलनाद्वारे खात्रीशीर गर्भधारणा मिळू शकते.


लेखक:
डॉ. नितीन मार्कंडेय
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)

English Summary: Symptoms of Livestock on Heat and Artificial Insemination Published on: 16 October 2019, 02:32 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters