1. पशुधन

Nepear Grass: जनावरांच्या आहारात नेपियर गवत आहे खूप आरोग्यदायी, जाणून घेऊ नेपिअर गवताची लागवड पद्धत

सध्या शिक्षक वर्ग तसेच तरुणदुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत.दुग्ध व्यवसायामध्ये तसेचशेळीपालनामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे.दुग्ध व्यवसायामध्ये उच्च तंत्रज्ञानाचा सोबतदुसरा मार्ग दिला जाणारा चारा व त्याचे योग्य व्यवस्थापन हा एक महत्वाचा कणा आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
nepear grass

nepear grass

सध्या शिक्षक वर्ग तसेच तरुण दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत.दुग्ध व्यवसायामध्ये तसेचशेळीपालनामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे.दुग्ध व्यवसायामध्ये उच्च तंत्रज्ञानाचा सोबतदुसरा मार्ग दिला जाणारा चारा व त्याचे योग्य व्यवस्थापन हा एक महत्वाचा कणाआहे.

जनावरांच्या चारा उत्पादनामध्ये दिवसेंदिवस बदल होत असून पोषक चारा पिके उत्पादन व पशु आहारात याच्या वापरास अधिक महत्त्व येत आहे. या सध्याच्या पोषक चाऱ्यांमध्येएक दलिय  वर्गातील सुपर नेपियर गवत, डी एच एन 6, बीएचएन 10 इत्यादी चाऱ्याच्या पोषक जाती  आहेत.त्याच बरोबर द्विदल चारा पिकांमध्ये मेथी घास,दशरथ गास, शेवरी आणि बरसीम इत्यादी पोषक चाऱ्याच्या जाती विकसित आहेत. गेले का तापमान सुपर नेपियर गवत लागवडीविषयी माहिती घेणार आहोत.

 सुपर नेपिअर गवताची लागवड पद्धत

  • पूर्वमशागत- सुपर नेपियर गवत लागवडीसाठी एक खोलवर नांगरट करावी आणि दोन-तीन वेळा वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी.
  • लागवड पद्धत- सुपर नेपियर गवताची कांडी 4×2फूटअंतरावर लागवड केल्यास चारा उत्पादन मुबलक मिळते.चार फुटांची सरी केल्यामुळे आंतरमशागत करणे सोपे  होते. तसेच चारा पिकास पाणी व्यवस्थित देता येते. चार फुटांची सरी व सरी च्या बाजूला दोन फुटावर एक डोळा पद्धतीने लागवड करणे फायद्याचे ठरते.
  • 4×2फूट अंतरावर लागवड केल्यास एका गुंठ्याला जवळ जवळ 136 डोळे लागतात.. म्हणजेच एका एकरात पाच हजार 440 ते 5500 ठोंबे लागतात. म्हणजेच हेक्‍टरी जवळजवळ 13000 ठोंबे लागतात. यामध्ये दोन डोळ्यांची कांडी करून लागवड केल्यास उगवण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
  • उभी कांडी पद्धतीने लागवड करताना डोळ्यांची दिशा वरच्या दिशेने राहील याची काळजी घ्यावी.
  • लागवडीसाठी साधारणपणे तीन महिने वाढ झालेल्या गवताच्या खोडाचा जमिनी कडील 2/3 भागाचा वापर करावा. दोन डोळ्यांची कांडी या पद्धतीने लागवड करताना एक डोळा जमिनीत व एक डोळा वरती राहील अशा पद्धतीने लागवड करावी.

नेपियर गवतासाठी खत व्यवस्थापन..

 जमिनीची तयारी करताना पाच ते दहा टन शेणखत किंवा कंपोस्ट खतमातीत पूर्णपणे मिसळून घ्यावे. नेपिअर गवताची लागवड केल्यानंतर 14:14:14चा5 गोण्या हेक्‍टरी या प्रमाणात मात्रा द्यावी.नंतर चाऱ्याच्या प्रत्येक कापणीनंतर युरियाची एकरी एक बॅग द्यावी.

नेपिअर गवताची आंतरमशागत

 अगदी सुरुवातीला गवताची पूर्णपणे वाढ होईपर्यंत दोनदा खुरपणी करावी.त्यानंतर शक्यतो या गवताच्या वाढीमुळे दुसरे तणजोमाने वाढत नाही.तसेच गरजेनुसार आंतरमशागत करणे फायदेशीर ठरते.

 नेपियर गवताचे पाणी व्यवस्थापन..

  • उन्हाळ्यामध्ये लागवड केली तर गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरुवातीस दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्यानंतर प्रत्येक दहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
  • पावसाळ्यामध्ये गरज असल्यास 12 ते 15 दिवसांनी पाणी द्यावे तसेच हिवाळ्यात 10 ते 12 दिवसांनी पाणी दिले तरी चालते.

 नेपिअर गवताची कापणी

  • नेपियर गवताची पहिली कापणी अडीच ते तीन महिन्यांनी करता येते.परंतु पुढील कापण्यात 50 ते 70 दिवसांच्या दरम्यान केल्यास सकस, शोषणमुक्त व पचनास हलका चारा मिळतो.कापणी शक्यतो जमिनीच्या जवळ करावी.
  • कापणीचा उशिरा केली तर चार्‍यांमधील रस व प्रथिनांचे प्रमाण कमी होते. तसेच तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढून चारा चवदारराहत नाही.त्यामुळे जनावरे असा चारा आवडीने खात नाहीत. तसेच हा चारा पचनास जड असतो.त्यामुळे कापणी वेळेवर करावी.

 सुपर नेपिअर गवताची वैशिष्ट्ये

  • मुबलकफुटवे, पाने हिरवीगार,रसाळ, गोड रस व पानांची संख्या जास्त असते.
  • वाढ ही जोमाने होते.
  • एका वर्षात पाच ते सहा कापणे होतात.
  • सुपर नेपियर गवत यामध्ये प्रथिनांचे प्रमाण एच 14 ते 18 टक्क्यांपर्यंत असते.
  • मुरघास बनवण्यासाठी देखील उपयोगी पडते.
  • पाच वर्षापर्यंत चारा उत्पादन देणारी जात असते.
  • प्रथीन जास्त असल्यामुळे खुराकात बचत होते.

( संदर्भ- बळीराजा मासिक)

English Summary: super nepear grass is useful for animal fodder and more milk production Published on: 20 December 2021, 01:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters