1. पशुधन

RIP 'सुल्तान' भारतातील प्रसिद्ध रेडा सुल्तान मेला; लाखों रुपयात विकले जात होते त्यांचे सीमन

पशुपालन करणारे असे क्वचितच लोक असतील ज्यांना सुल्तान रेडा माहित नाही. राजस्थानच्या पुष्करच्या पशुच्या बाजारात चर्चेचा भाग बनलेल्या सुलतान रेड्याला कोण ओळखत नाही, त्यावेळी पासुन तो एक लोकप्रिय रेडा बनला आहे. त्याच वेळी, सुलतानला खरेदी करण्यासाठी 21 कोटी रुपयांची किंमत लावली गेली होती. हो तुमचा विश्वास बसणार नाही पण ही एक खरी घटना आहे. पण आता सुलतान या जगात नाही. होय, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सुल्तानच्या मृत्यूने पशुपालन करणारे हरियाणातील अनेक लोक आज नाराज असतील कारण, सुलतानाने केवळ कैथलच्या बुडाखेडा गावाचे नाव नाही तर संपूर्ण हरियाणाचे नाव जगात रोशन केले होते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
sultaan bull

2013 मध्ये झालेल्या राष्ट्रीय पशु सौंदर्य स्पर्धेत सुल्तान रेडा झज्जर, कर्नाल आणि हिसार येथे राष्ट्रीय विजेता देखील राहिला आहे.  राजस्थानच्या पुष्करच्या पासुबाजारात एका प्राणीप्रेमीने सुलतानला खरेदी करण्यासाठी तब्बल 21 कोटी रुपयाची बोलणी लावली होती, पण नरेशने (सुलतान चे मालक) सांगितले की सुलतान हा त्याचा मुलगा आहे आणि मुलांची किंमत कोणी करत नाही आणि मुलाला कोणीही विकत नसत. नरेश आणि त्याचा भाऊ सुलतानची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेत असत.

सुलतानचा मालक नरेश म्हणतो की, सुलतानसारखा कोणी दुसरा न तयार झाला आहे आणि न कोणी दुसरा भविष्यात तयार होईल. आज, सुलतानमुळे, संपूर्ण उत्तर हरियाणामधील लोक आम्हाला ओळखतात.  आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, नरेशने सुलतानला लहानपणापासून वाढवले ​​आहे आणि त्याला त्याच्या स्वतःच्या मुलासारखे लाड केले आहेत. पण सुलतानच्या मृत्यूनंतर त्याची कमतरता कुटुंबात जाणवत आहे. रिकामा खुटा नरेशला दुःखी करतो. तो सतत त्याच्या चित्राकडे पाहत राहतो आणि त्याचे पुरस्कार बघत बसतो.

सुलतानचे वीर्य लाखात विकले जात असे

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सुलतानच्या वीर्यापासून लाखो रुपये कमावले जात होते.  एका वर्षात, सुलतान 30 हजार वीर्य डोस देत असे, जे लाखो रुपयांना विकले जात. सुलतानच्या मृत्यूबद्दल दु: ख व्यक्त करण्यासाठी पशुपालन करणारे, आणि पशुप्रेमी हजारो किलोमीटर दूरवरून पोहोचत आहेत.

English Summary: sultaan bull male buffalo died his sperm sell in lakh rupees Published on: 30 September 2021, 12:47 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters