1. पशुधन

Artificial Insemetion:पशु मधील वंध्यत्व आणि कृत्रिम रेतन – एक वरदान

फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी जनावरे सदृढ आणि प्रजननक्षम असणे आवश्यक आहे.विविध कारणांमुळे जनावरांमध्ये वंध्यत्व येते किंवा वांझपणा आढळून येतो. त्यामुळे गोठ्यातील प्रजनन व्यवस्थाच कोलमडून जाते. त्यामुळे वंध्यत्व निवारण यासाठी योग्य प्रजनन व्यवस्थापन यासोबतच कृत्रिम रेतन कडे लक्ष देणे आवश्यक आहे. या लेखात आपण कृत्रिम रेतनाचे फायदे जाणून घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
buffalo

buffalo

 फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी जनावरे सदृढ आणि प्रजननक्षम असणे आवश्यक आहे.विविध कारणांमुळे जनावरांमध्ये वंध्यत्व येते किंवा वांझपणा आढळून येतो. त्यामुळे गोठ्यातील प्रजनन व्यवस्थाच कोलमडून जाते. त्यामुळे वंध्यत्व निवारण यासाठी योग्य प्रजनन व्यवस्थापन यासोबतच कृत्रिम रेतन कडे लक्ष देणे आवश्यक आहे. या लेखात आपण कृत्रिम रेतनाचे फायदे जाणून घेणार आहोत.

पशूंमध्ये कृत्रिम रेतनाचे फायदे

  • वंध्यत्वावर एकमेव उपाय म्हणजे कृत्रिम रेतन होय. कृत्रिम रेतन आणि काही प्रकारच्या वंध्यत्वावर  नियंत्रण मिळवता येते.
  • जातिवंत व सिद्ध वळूचे वीर्य वापरता येते.
  • कृत्रिम रेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूची शुद्धता वीर्य साठवण्याचे अगोदरच तपासली जाते. वंश उत्पादन क्षमता यावर मुख्य लक्ष असते.
  • जनावरे विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगाला बळी पडत नाहीत व रोगांचा होणारा संसर्ग टाळता येतो.
  • बऱ्याच वेळा नैसर्गिक रेतनाचा काळ जनावराच्या माजा नुसार नसतो. त्यामुळे जनावरांमध्ये वंदत्व येते. कृत्रिम रेतन यामध्ये  माजाचे उत्तम परीक्षण करून रेतनाची क्रिया केली जाते.
  • पशुपालकाला गोठ्यात वळूचे संगोपन करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे वळूच्या संगोपनावर व देखभालीवर होणारा खर्च टळतो.
  • वंध्यत्व मध्ये बऱ्याच वेळा असे दिसून येते की,जनावरांचे शारीरिक वजन कमी असल्यास सूक्ष्म जंतूंचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. अशा परिस्थितीमध्ये जनावराला उत्तम प्रतीच्या जंतु नाशकाचा योग्य प्रमाणात वापर करून रोजच्या आहारात खनिज द्रव्याचा वापर करावा.
  • पैदाशीच्या वळूपासून एकावेळी गोळा केलेल्या वीर्यापासून किमान 200 ते 700 वीर्य कांड्या तयार होतात. त्यामुळे उच्च गुणवत्तेचे वळूची उत्पादकता वाढवता येते.
  • जनावरांच्या मूळ जाती नामशेष होण्याच्या मार्गावरआहेत. अशा जनावरांमध्ये सिद्ध वळूचे वीर्य वापरुन त्या जनावरांच्या जातींचे संवर्धन करून दूध उत्पादन क्षमता वाढवता येते.
  • नैसर्गिक फलनासाठी मादीचेवजन व शारीरिक आकारमान समान असणे गरजेचे असते. पण कृत्रिम रेतन मध्ये ही अडचण येत नाही.
  • कृत्रिम रेतन यामुळे नोंदी ठेवून प्रजननाची योग्य व्यवस्थापन साधता येते.
  • जास्त वयाचा आणि जखमी वळूंचा रेतनासाठी वापर करता येतो.
English Summary: sterility in animal and artificial insemation advantage and benifit Published on: 29 December 2021, 06:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters