MFOI 2024 Road Show
  1. पशुधन

भारतातील राज्यनिहाय माशांची यादी व त्यांचे महत्व

राज्यनिहाय माशांची यादी (state fish list):- मानवासाठी मासा हे एक महत्त्वाचे अन्न आहे. मासे हे एक प्रथिन युक्त व शरीरास पोषक असे आहार आहे. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यासारखे खनिजेही माशांपासून मिळतात. कॉड, हॅलिबट, मुशी या माशांच्या यकृतापासून अ व ड जीवनसत्व तसेच औषधी तेल निघते. माशांच्या आतड्यापासून ब जीवनसत्व मिळते.

State wise list of fishes in India

State wise list of fishes in India

राज्यनिहाय माशांची यादी (state fish list):- मानवासाठी मासा हे एक महत्त्वाचे अन्न आहे. मासे हे एक प्रथिन युक्त व शरीरास पोषक असे आहार आहे. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यासारखे खनिजेही माशांपासून मिळतात. कॉड, हॅलिबट, मुशी या माशांच्या यकृतापासून अ व ड जीवनसत्व तसेच औषधी तेल निघते. माशांच्या आतड्यापासून ब जीवनसत्व मिळते.

मासे हे पचनास हार हलके असतात त्यांच्या चरबीपासून रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉल वाढत नाही व रक्तदाब कमी होतो. काही माशांच्या शरीरातील वातशयांचा (Gas bladder) (हवेच्या पिशव्यांचा) विविध कामासाठी उपयोग केला जातो. पाळीव जनावरांच्या आहारासाठी मत्स्यपीठ व झाडांसाठी उत्तम खतही मासळी पासून मिळते. जे मासे आकाराने लहान पण रंगदार व दिसण्यास आकर्षक असतात असे गोड्या पाण्यातील मासे काचेच्या जलजीव पात्रात ठेवून घराची शोभा वाढविण्यास मदत होते. पाण्यात गळ टाकून मासे पकडणे हा प्रकारही जगात सर्वत्र आढळतो.

माश्यांपासून होणारे फायदे (benefits of fishes):-

१) मासे हा एक पौष्टिक प्रथिनियुक्त पचायला हलका आहार आहे.
२) माशांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व अ,ब, ड समूह असतो.
४) मानवी शरीरास लागणारा अमिनो आम्ले माशात मोठ्या प्रमाणात असतात.
५) हाडे आणि दात मजबूत होण्याकरिता लागणारे कॅल्शियम फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते.
६) सर्वात महत्त्वाचे म्हणजे माशांमध्ये प्रथिनांचे प्रमाण तब्बल १८% ते २४% असते.
७) माशांच्या चरबीमध्ये पॉली अनसॅच्युएटेड चे प्रमाण अधिक असते त्यामुळे रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही.

राज्य मासा संकल्पना (State fish concept):-

हे मासे पूर्वी या राज्यामध्ये भरपूर व मुबलक प्रमाणात सापडत होते. परंतु आता या राज्यामध्ये या माशांच्या प्रमाणात खूप मोठी घट झाली आहे. मानवाच्या मोठ्या प्रमाणात मासेमारी, प्रदूषण व इतर अशा कारणांमुळे पूर्वी आढळणाऱ्या या माशांच्या प्रमाणात घट झाली आहे. या विविध राज्यांमधील मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या माशांच्या संख्येची माहिती घेणारा ही एक राज्य मासा संकल्पना आहे.
राज्यनिहाय मासे:-

१) पश्चिम बंगाल (West Bengal):-

हिल्सा (Tenualosa ilisha) हा पश्चिम बंगालचा राज्यमासा आहे. ही एक निमखऱ्या पाण्यातील माशांची प्रजाती आहे या माशांमध्ये फॅटी ऍसिड (Fatty acid) आणि ओमेगा-३ (Omega -3) मोठ्या प्रमाणात असते. आणि हे मासा कोरोनरी हार्ट इश्यूस (Coronary heart issues ) पासून वाचवण्यासाठी मदत करते. हिलसा मासा हा एक नाजूक मांस असलेला चविष्ट मास आहे. हा मासा गोवा, केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू मध्ये आढळतो. हिल्सा मासा हा प्रथिने कॅल्शियम आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड (fatty acid) मोठा स्त्रोत आहे.

२) हरियाणा (Hariyana):-

लेबिओ कॅलबासू (Labeo Calbasu) हा हरियाणा राज्याचा राज्यमासा आहे. ही एक गोड्या पाण्यातील माशांची प्रजाती आहे. त्याचप्रमाणे तीन भारतीय प्रमुख कार्प (labeo rohita), (catla catla) आणि (cirrhinus mrigala) सिरीनस मृगला यांच्या नंतरची सर्वात महत्त्वाची कार्प प्रजाती आहे. हा एक लोकप्रिय खाद्य मासा आहे. या माशांच्या प्रजातीने भारत आणि देशातील शोभेच्या मासळी बाजारातील प्रवेश केला आहे. मासेमारी व मानववंश शास्त्रीय कारणांमुळे या माशांच्या प्रजातींची नैसर्गिक लोकसंख्या कमी झाली आहे.

३) कर्नाटक (Karnataka) :-

कर्नाटकी कार्प (Hypselobarbus carnaticus) हा मासा कर्नाटक राज्याचा राज्य मासा आहे. या माशाला कर्नाटक कार्प असेही म्हणतात. ही भारतातील पश्चिम घाटातील साईप्रिनिड माशाची एक प्रजाती आहे. जिथे वेगाने वाहणाऱ्या नद्या, नाल्या आणि मोठ्या तलावांमध्ये राहतात. हे मासे बेडरॉक्स, बोल्डर्र्स आणि अंडरकटींग्जच्या खाली लपताना दिसतात. तलावामध्ये प्रजनन होत नाही परंतु पावसाळ्यात पूर आलेल्या नद्यांमध्ये अंडी उगवतात.

४) नागालँड (Nagaland) व सिक्कीम (Sikkim):-

चॉकलेट महासिर (Neolissochilus hexagonolepsis) हा नागालँड व सिक्कीम चा राज्य मासा आहे. हा थंड पाण्यात राहणार मासा आहे. त्याचप्रमाणे या माशाला खेळात सुद्धा महत्व आहे. नागालँड व सिक्कीमसह उत्तर पूर्व हिमालयीन प्रदेशातील डोंगराळ प्रवाहात आढळणारे उच्च मूल्य असलेले मासे खाद्य आहे. नागालँड व सिक्कीम मधील वेगवेगळ्या प्रमुख नद्यांमध्ये आढळून येतो. हा मासा आता धोक्यात आला आहे आणि तसेच लुप्त प्रजाती मानला जातो. चॉकलेट महासिर हा एक सर्व भक्षी मासा आहे. जो सामान्यतः नद्या आणि त्यांच्या उपनद्यांच्या खालच्या भागात राहतो.

Disease Fish : माशांमध्ये रोग उद्भवू नये यासाठी घ्यावयाची काळजी..!

५) बिहार (Bihar):-

मागुर (Clarius magur) हा बिहार राज्याचा राज्यमासा मासा आहे. भारतीय मागुरच्या विशिष्ट चवी व औषधी गुणधर्मामुळे बाजारामध्ये मोठी मागणी आहे. मागुरमध्ये मुबलक प्रथिने २१ % जीवनसत्व ब,ड योग्य प्रमाणात आढळतात. व दुसऱ्या माशांच्या तुलनेत चरबीचे प्रमाण खूप कमी असते. मानवी शरीर मागुर मधील प्रथिने सहज पचवू शकते. या माशाच्या सेवनाने मनुष्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. अशा विविध कारणामुळे सर्व राज्यांमध्ये देसी मागुरला चांगली मागणी आहे. माशाच्या मागणीनुसार मागुर संवर्धनास नगदी उत्पन्न देणारे पीक मानले जाते.

६) मनिपुर (Manipur) :-

पेनेग्रा (Pengra) (Osteobrama belangeri) हा मणिपूर राज्याचा राज्यमासा आहे. हा मासा भारताच्या मणिपूर राज्यात सापडतो. हा मासा प्रथिनियुक्त व पौष्टिक आहे. मणिपूरमध्ये या माशाला मोठी मागणी आहे. हा माझा आता लुप्त होत चालला आहे.

७) ओडिसा (Odisha) :-

महानदी महासिर (Tor Mahanadicus) हा ओडीसा राज्याचा राज्य मासा आहे. हा थंड पाण्यात राहणार मासा आहे. त्याचप्रमाणे या माशाला खेळात व खाद्य मासे म्हणून प्रख्यात आहेत. याला नद्यांमधील वाघ म्हणून ओळखले जाते, कारण ते झेलताना हुक सरकवण्यास भाग पाडतात. भूतकाळात महासिरणे भारतातील प्रमुख नदी परिसंस्थेमध्ये लक्षणीय नैसर्गिक मत्स्यपालन केले आहे. खाण्यायोग्य मासा म्हणून अत्यंत प्रतिष्ठित आहे, आणि उच्च बाजारभाव मिळतो. हे मासे सर्वभक्षी असल्याचे दर्शवितात.

८) मध्यप्रदेश (Madhya Pradesh) :-

टोर महासिर (Tor tor) हा मध्यप्रदेश राज्याचा राज्यमासा आहे. हा थंड पाण्यात राहणार मासा आहे, त्याचप्रमाणे या माशाला खेळात सुद्धा महत्व आहे. महासिर हा एक मोठा सायप्रिनिड (कार्प कुटुंबातला) आणि दोन जुडया मिश्या सह पार्श्वरेषेसह त्यांच्या मोठ्या खवल्याद्वारे ओळखला जातो. नर त्यांच्या लांब पेक्टोरेल पंखाद्वारे ओळखले जातात व ते २.७ मीटर लांबी पर्यंत पोहोचतात. ही एक स्थलांतरित प्रजाती आहे. पावसाळ्यात वरच्या बाजूला सरकत असते, हे स्वच्छ जलद वाहणारे आणि चांगले ऑक्सिजन युक्त पाणी पसंत करते.

) आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) व तेलंगणा (Telangana):-

पट्टेदार मुरेल (Channa striatus) हा आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याचा राज्यमासा आहे. हे प्रामुख्याने उथळ गोड्या पाण्याच्या अधिवासात आढळतो विशेषता १-२ मीटर खोलीवर क्वचितच दहा मीटर पेक्षा कमी ठिकाणी ही प्रजाती नद्या, तलाव, कालवे, खाड्या, सिंचन, जलाशय आणि दलदलीत भागात बहुतेक प्रकारच्या मंदगती गोड्या पाण्याच्या अधिवासात आढळून येतात. बहुतेक गोड्या पाण्यातील माशांच्या तुलनेत ते गढूळ परिस्थिती आणि कमी ऑक्सिजन पातळी सहन करते, हा मासा सापासारखा लांब दिसतो.

१०) केरळ (Kerala):-

पर्ल स्पॉट (Etroplus suratensis) हा मासा केरळ राज्याचा राज्यमासा म्हणून ओळखला जातो. केरळ मध्ये करीमिन म्हणूनही ओळखला जातो. हा एक देशी मास आहे, जो द्वीपकल्पीय भारताच्या पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर आढळतो. खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्याच्या वातावरणात तलावामध्ये मत्स्य पालनासाठी ही एक महत्त्वाची उमेदवार प्रजाती आहे. हे केरळमधील पारंपारिक तलावामध्ये संवर्धन केले जाते.

११) त्रिपुरा (Tripura):-

ओमपोक पाबदा (Ompok pabda) हा त्रिपुरा या राज्याचा राज्यमासा आहे, पाबदा मासा हा गोड्या पाण्यातील कॅट फिश असून आशियाई देशांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो. पाबदा हा ओमेगा -३ ओमेगा -६ फॅटी ऍसिड, जीवनसत्वे आणि खनिजांचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. हा अत्यंत चवदार, मऊ आणि निसरडा मांस असलेला गोड पाण्याचा मासा आहे. हाडांच्या माशा मधील एक प्रजाती आहे, हा मासा सर्वभक्षी आहे.

१२) उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीर:

गोल्डन महासिर (Tor putitora) हा हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड व जम्मू-काश्मीर या राज्याचे राज्यमासा आहे. या माशाला हिमालयीन मासा म्हणूनही ओळखला जातो. ही सायप्रिनिड माशांची एक लुप्तप्राय प्रजाती आहे, जी हिमालयीन प्रदेशातील जलप्रवाह नदीचे तलाव आणि तलावामध्ये आढळतो. त्याची मूळ श्रेणी सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खोऱ्यात आहे. हा एक गोड्या पाण्यातील व त्याचप्रमाणे या माशाला खेळात सुद्धा महत्व आहे. गोल्डन महासिरच्या शरीराचा रंग पृष्टीय बाजूने सोनेरी असतो आणि पंख लाल पिवळे असतात. हा एक सर्व भक्षी मासा आहे.

उमेश बिराप्पा जकुणे, विद्यार्थी, मो. न.९०४९८२७३३१.
जयंता टिपले, सहाय्यक प्राध्यापक (अतिथी व्याख्याता), जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मो. न. ८७९३४७२९९४. मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर. महाराष्ट्र.

English Summary: State wise list of fishes in India and their importance Published on: 08 January 2023, 01:45 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters