भारत हा कृषिप्रधान देश असुन अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. यामाध्यमातून देखील शेतकरी चांगला नफा मिळवतात. तुम्हाला जर कमी खर्चात नवा व्यवसाय करायचा असेल तर मेंढीपालनाचा व्यवसाय करुन तुम्ही अधिक नफा मिळवु शकता.
देशातील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायासाठी गाय, म्हशी, शेळी, उंट या प्राण्यांचे संगोपन करतात. त्याचबरोबर अनेक युवक देखिल या व्यवसायामध्ये उतरत आहेत. पण मेंढी हा असा प्राणी आहे जो दुप्पटीने फायदा मिळवुन देवु शकतो. मेंढी फक्त दुधासाठी नाही तर लोकर आणि मांस मिळवण्यासाठीही पाळली जाते. मेंढीच्या लोकर पासुन गरम कपडे, टोप्या आणि शोभेच्या वस्तु बनवल्या जातात, त्यामुळे मेंढीच्या लोकराला बाजारात मोठी मागणी असते .मेंढीपालन व्यवसायासाठी मेंढ्यांच्या सुधारित प्रजाती निवडाव्यात, जसे की मालपुरा, जैसलमेरी, मंडिया, मारवाडी, बिकानेरी, मारिनो, कॉर्डिलेरा माबुटू, छोटा नागपुरी आणि शहााबाद या प्रजातींमुळे तुम्हाला अधिक दूध आणि लोकर मिळू शकेल.
अशी घ्या मेंढ्यांची काळजी -
मेंढीपालनातून चांगले पैसे कमवायचे असतील तर त्यांच्या स्वच्छतेकडे आणि आरोग्याकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे.मेंढ्यांचे आयुष्य साधारणतः 7 ते 8 वर्षाचे असते. मेंढ्यांमध्ये थंडीत आजार लवकर पसरतात कारण जिवाणू व विषाणू थंड आणि ओलसर जागेत झपाट्याने वाढतात व जास्त वेळ टिकून राहतात, त्यामुळे जंतुनाशकाने आठवड्यातून एक वेळा तरी गोठा धुवावा.तसेच जंत हे आतड्यातील अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या ग्रंथीना इजा पोहोचवतात यामुळे मेंढ्यांना अनेमिया होण्याचे प्रमाण वाढते.लहान पिलांना वेळोवेळी रोगप्रतिबंधक लस आणि जंतुनाशक औषधे द्यावीत. हिवाळ्यात पीलांवरील पिसू, गोचिड यांचे योग्य वेळेस नियंत्रण करणे आवश्यक आहे त्यासाठी पशुतज्ज्ञांचा सल्ला घेवुन गोचिडनाशकाचा वापर करावा.
मेंढीपालन सुरु करण्यासाठी खर्च किती?
एका मेंढीची किंमत तीन हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत असू शकते, जातींनुसार मेंढीची किंमत कमी जास्त असु शकते . 20 मेंढ्या खरेदी करण्यासाठी सुमारे 1 लाख ते 1.5 लाखांपर्यंत येवु शकतो. 20 मेंढ्यांसाठी 500 स्क्वेअर फूट पुरेसे ठरू शकते. जे 30,000 ते 40,000 रुपये खर्च येवु शकते. मेंढ्यांना फार खर्चिक गोठ्याची आवश्यकता नसते. त्याचबरोबर गोठ्यांमध्ये हवा खेळती असावी. हिवाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे गोठ्यामध्ये ओलावा तसाच टिकून राहतो त्यामुळे गोठ्यात सूर्यकिरणे पडुन गोठ्यातील ओलसरपणा कमी होईल असे बांधकाम करावे.
Share your comments