बदलत्या काळानुसार आता लोकांची पसंत देखील बदलत चालली आहे. आता अनेक सुशिक्षित युवक नोकरी करण्याऐवजी बिझनेस करण्याचे स्वप्न बघत असतात. अनेक सुशिक्षित युवक हजारो रुपयांची नोकरी करण्यापेक्षा लाखो रुपयांचा बिझनेस करण्याचे स्वप्न बघत असतात. म्हणून आज कृषी जागरण अशाच सुशिक्षित तरुणांसाठी एक विशेष माहिती घेऊन आले आहे. आज आपण एका व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत. हा व्यवसाय विशेषता शेतकरी पुत्रांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. आम्ही ज्या व्यवसायाविषयी बोलत आहोत तो व्यवसाय आहे पोल्ट्री फार्मिंगचा. शेतकरी मित्रांनो जर आपल्याला शेती साठी एखादा पूरक व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर पोल्ट्री फार्मिंगचा व्यवसाय सुरू करून आपण महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई करू शकता.
शेतकरी मित्रांनो जर आपल्याला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल नसेल तरी देखील चिंता करण्याचे काही कारण नाही कारण की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार दरबारी अनेक योजना असतात याचा लाभ घेऊन आपणास सहजरीत्या लोन भेटू शकते. मित्रांनो पोल्ट्री फार्मिंगचा व्यवसाय हा आठ ते नऊ लाख रुपये इन्वेस्ट करून सुरू केला जाऊ शकतो. नऊ लाख रुपये इन्वेस्ट करून जर आपण हा व्यवसाय सुरू केला तर जवळपास 1500 कोंबड्यांचा फार्म आपला तयार होतो आणि यातून जवळपास आपणास महिन्याकाठी एक लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.
शेतकरी मित्रांनो आपणास पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी सर्वात आधी एका जागेचा बंदोबस्त करावा लागेल. शेतकरी मित्रांनो जागा शोधताना अशी जागा शोधा जी की रस्त्याला असेल. रस्त्याला जर आपली शेती असेल तर आपण सहजरीत्या पोल्ट्री फार्म सुरू करू शकता. त्यानंतर आपणास पोल्ट्री काम उभारण्यासाठी जवळपास सहा लाख रुपयापर्यंत खर्च अपेक्षित आहे. आपणास जर 1500 कोंबड्यांचे संगोपन करायचे असेल तर आपणास यापेक्षा दहा टक्के अधिक कोंबड्यांचे पिल्ले खरेदी करावे लागतील. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की पोल्ट्री फार्म सुरू करून आपण चांगली मोठी कमाई करू शकता. यापासून प्राप्त होणाऱ्या अंड्यांपासून देखील लाखो रुपयांची कमाई केली जाते. कोंबड्यांची खरेदी करण्यासाठी आपणास 60 हजार रुपये पर्यंत खर्च अपेक्षित असतो. पोल्ट्री फार्म व्यवसायात सर्वात जास्त काळजी ही कोंबडीच्या आरोग्याची घ्यावी लागते त्यासाठी मेडिकेशन वर हजारो रुपयांचा खर्च करावा लागतो तसेच त्यांच्या खाण्यापिण्यावर देखील हजारो रुपयांचा खर्च अपेक्षित असतो.
पोल्ट्री फार्म व्यवसायातून होणार तगडी कमाई
लगातार 20 आठवडे कोंबड्यांचे संगोपन करण्यासाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च अपेक्षित असतो. एक लेयर पॅरेण्ट बर्ड एका वर्षात जवळपास तीनशे अंडी देतात. वीस आठवड्यानंतर कोंबडी अंडे द्यायला सुरुवात करते. वीस आठवड्यानंतर कोंबडीच्या संगोपनासाठी चार लाख रुपये पर्यंत खर्च येतो. 1509 कोंबडी पासून एका वर्षात 4 लाख 35 हजार अंडे प्राप्त केले जाऊ शकतात यात 35000 अंडे खराब झाले असे समजून 4 लाख अंडे प्राप्त होतात असे गृहीत धरले तर 4 रुपये प्रमाणे अंडे विक्री केलेत तरी 16 लाख रुपयांची कमाई फक्त अंडी विकून केली जाऊ शकते.
Share your comments