शेतकरी मित्रांनो शेतीला पूरक व्यवसाय असणे हि काळाची गरज बनली आहे. फक्त शेती करून शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुप्पट होऊ शकत नाही त्यासाठी जोडधंदा हा केलाच पाहिजे. शेती समवेतच मत्स्यपालन, कुक्कुटपालन इत्यादी केले जाऊ शकते. मित्रांनो आज आपण अशाच एका पूरक व्यवसायाविषयी जाणुन घेणार आहोत, आणि तो व्यवसाय आहे शेळीपालनचा (Goat Rearing).
शेतकरी मित्रांनो आपण शेळीपालन करून जवळपास महिन्याकाठी 2 लाख रुपयापर्यंत कमाई करू शकता. शेळीपालन एक फायदेशीर व्यवसाय आहे आणि भारतात हा व्यवसाय करून लाखो शेतकरी तसेच भूमिहीन लाखो रुपये कमवीत आहेत. मित्रांनो शेळीपालन कमी भांडवलात सुरु होणारा व्यवसाय आहे. शेळीपालन हे आपण जिथे राहता त्या ठिकाणी देखील सहजरीत्या केले जाऊ शकते. शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तसेच शेळीपालन देखील आपल्या अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मदत करते. शेळीपालनला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जाते. शेळीपालन करून शेतकरी लाखो रुपये कमवू शकतात, शेळीपालनमधून दुध, मांस, खत इत्यादी उत्पाद मिळतात व ह्याच्या विक्रीतून पशुपालक शेतकरी लाखो रुपये कामवितात.
केंद्र सरकार देते सबसिडी
पशुपालन हा शेतीचा एक पूरक व्यवसाय म्हणुन ओळखला जातो, पशुपालन अंतर्गत वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्षीचे पालन केले जाते. असेच एक आहे शेळींचे पालन. शेळीपालन सुरू करणे हे इतर पशुपालनच्या तुलनेने खूप सोपे आहे. जर आपल्यालाही हा व्यवसाय करायचा असेल तर आपण सरकारी मदत देखील घेऊ शकता. हो, मित्रांनो शेळीपालन करण्यासाठी सरकारकडून मदत मिळते. तुम्ही याचा लाभ घेऊन शेळीपालन सुरु करू शकता. शेतकरी मित्रांनो अनेक राज्य सरकारे शेळीपालन करण्यासाठी अनुदान देतात.
आपण याचा लाभ घेऊन शेळीपालन करू शकतात. मित्रांनो राज्य सरकार सबसिडी देते शिवाय भारत सरकार (Indian Government) पशुसंवर्धनासाठी 35% पर्यंत अनुदान देते. तुम्ही केंद्र सरकार कडून शेळीपालनसाठी मिळणाऱ्या अनुदानचा लाभ घेऊ शकता. जर आपल्याकडे शेळीपालन सुरू करण्यासाठी पैसे नसतील तर चिंता करू नका, मित्रांनो शेळीपालन करण्यासाठी अनेक बँकां (bank) ह्या कर्ज (Loan)देतात तुम्ही कर्ज घेऊन देखील हा व्यवसाय (business) सुरु करू शकता. तसेच सरकारी एजेंसी नाबार्ड देखील शेळीपालनासाठी कर्ज देते तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.
Share your comments