भारतात फार पूर्वीपासून शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जात आहे, राज्यात देखील अनेक अल्पभूधारक व भूमिहीन शेतकरी पशुपालन व्यवसाय करत असतात. राज्यात गाई म्हशीचे पालन करून शेतकरी बांधव चांगली कमाई करत असतात. पशुपालक शेतकरी गाईंच्या सर्वोत्कृष्ट जातींचे पालन करून पशुपालन व्यवसायातून चांगली कमाई अर्जित करत असतात. देशात जवळपास 26 जातीच्या गाईंचे पालन केले जाते. यापैकी साहिवाल, गीर, डांगी, लाल सिंधी, राठी, थारपारकर इत्यादी गाईंच्या जाती मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. आज आपण देशात पाळल्या जाणार्या प्रमुख गाईंच्या जाती विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून पशुपालक शेतकऱ्यांना देशातील सर्वोत्कृष्ट गाईंची माहिती होईल, आणि त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना फायदा मिळेल.
भारतात ह्या जातींचे केले जाते मोठ्या प्रमाणात पालन
देवणी:- मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात देवणी जातीच्या गाईंचे पालन केले जाते, या जातीला मराठवाड्याचे भूषण म्हणून ओळखले जाते. देवणी गाय डांगी व गीर या स्वदेशी गोवंशाच्या संक्रमणातून तयार केली गेली आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड,उस्मानाबाद,बीड,परभणी या जिल्ह्यात ही गाय मोठ्या प्रमाणात आढळून येते. देवणी गाईचे पालन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केले जाते. या जातीच्या गाई दिवसाला सहा ते सात लिटर दूध देण्यासाठी सक्षम असतात. एका वेतात 600 ते 1200 लिटरपर्यंत दूध या जातीच्या गाई पासून प्राप्त केले जाते.
खिल्लार:- या जातीच्या गाईंचे पालन महाराष्ट्रातील पश्चिम भागात विशेषता सोलापूर सातारा पुणे कोल्हापूर या जिल्ह्यात केले जाते. खिल्लार गाय खूप मजबूत, काटक, व दिसायला अतिशय सुंदर असते. या गोवंशाचे पालन पशुपालक शेतकरी मोठ्या प्रमाणात करत असतात. या जातीच्या गाई पासून प्रति वेत नऊशे ते हजार लिटरपर्यंत दूध सहजरीत्या मिळवले जाऊ शकते.
गवळावू :- गवळाऊ गाईचे पालन विदर्भात मोठ्या प्रमाणात केले जाते. या जातीच्या गाई चे उगमस्थान देखील विदर्भच आहे. विदर्भातील नागपूर व वर्धा या दोन जिल्ह्यातया जातीच्या गाई मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
पशुपालक शेतकरी दूध उत्पादन क्षमता चांगली असल्याने या गाईचे मोठ्या प्रमाणात पालन करतात. या गोवंशाचे खोंड हे विशेष असतात, या जातींचे खोंड शेतकामासाठी उत्कृष्ट असल्याचे सांगितले जाते. ही गाय एका वेतात 800 लिटरपर्यंत दूध देते. इतर जातींच्या तुलनेत या जातीची गाय जरी कमी दूध देत असली तरी या गोवंशापासून प्राप्त होणारे खोंड शेतकामासाठी उत्कृष्ट असल्याने याचे मोठ्या प्रमाणात पालन होताना दिसत आहे.
Share your comments