आपण शेतामध्ये गुरांसाठी चाऱ्याची लागवड करतो. त्या लागवड केलेल्या चाऱ्याची काही कालावधीमध्ये कापणी करून पशु आहारात वापर करणे आवश्यक असते. जरा या चाऱ्याची लवकर कापणी केली तर त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त राहते.
अशा चाऱ्यात पोषणतत्वांची प्रमाण कमी राहते. त्यामुळे आशा चारा जनावरांना खायला दिल्यास जनावरांमध्ये दूध उत्पादनात थोडीशी वाढ दिसते परंतु फॅटचे प्रमाण कमी होते. जनावरांना चारा खाऊ घालताना देखील योग्य ती काळजी घ्यावी लागते. या गोष्टी दिसायला फार छोट्या दिसतात परंतु त्याचा परिणाम हा फार मोठा होत असतो. या लेखात आपण जनावरांना चारा खाऊ घालताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबद्दल माहिती घेऊ.
जनावरांना चारा खाऊ घालताना घ्या अशा प्रकारची काळजी…
- जनावरांनाजो चारा आपण खाऊ घालतो रुचकर असावा.त्याची एकदम लहानकिंवा बारीक कुट्टी करू नये. कुट्टी जर बारीक आकाराचे राहिली तर जनावरांचे रवंथ उत्तम होते व चारा व्यवस्थित पचतो.
- चारा जशास तसा न टाकता कुट्टी करूनहिरवा व वाळलेला चारा एकत्र मिसळून द्यावा.यामुळे चार याचा अपव्यय टळूनपचनीयता वाढते.
- जनावरांच्या शरीराचे वजन,शरीर वाढ किंवा कार्यशीलता लक्षात घेऊनचारा योग्य प्रमाणात द्यावा.
- सर्व जनावरांना सरसकट चारा दनये. जनावरांची वर्गवारी करून चारा दिल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहते जास्तीचे उत्पादनही मिळते.अपव्यय टाळला जातो.
- चारा खाण्यासाठी सर्व जनावरांना योग्य प्रमाणात जागा व चारा उपलब्ध करून द्यावा.
- जनावरांना हिरवा चारा किंवा वाळलेला चारा खायला न देता दोन्हीचे योग्य प्रमाणात मिश्रण घ्यावे. जनावरांच्या आहारात द्विदल आणि एकदल चाऱ्याचा एकत्रित वापर करावा.
- जनावरांना सतत चारा खायला न देता दिवसातून दोन ते तीन वेळा योग्य प्रमाणात द्यावा. यामुळे जनावरांचे रवंथ क्षमता वाढते व चाऱ्याची पचनीयता देखील वाढते.
- चारा देण्याच्या वेळा ठरवून घ्यावे त्यामध्ये अचानक बदल करू नये.
- प्रत्येक वेळी एकाच प्रकारचा चारा खायला देऊ नये. चारा देताना दोन ते तीन चारापिकांची मिश्रण द्यावे.त्यामुळे आवश्यक सर्व पोषणतत्वे मिळण्याची शक्यता वाढते.
- शेण,चिखल वगैरेपडलेला चारा खायला वापरू नये.त्यामुळे जनावरांना अंतर परोपजीवीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.
- तारा गवाणी मध्ये टाकत असताना सर्व जनावरांना योग्य प्रमाणात चारा मिळतो का हे पाहावे.
- भिजलेला चारा तसेच पानांवर दव असणारा चारा जनावरांच्या आहारात वापरू नये. अशा चाऱ्यावरील पाणी निघून गेल्यावर नंतर जनावरांना तू खायला द्यावा.
- ओला, शिजलेल्या चाऱ्याची कुट्टी करून साठा करू नये. यास कुबट वास येऊन हा चारा जनावर खात नाही.त्याचबरोबर अशा चाऱ्यामध्ये बुरशींची वाढ होऊ शकते.
Share your comments