दुधातील फॅट प्रतवारी च्या त्यादृष्टीने एक महत्वाचा घटक आहे. दुधाचाशोधा बऱ्याच प्रमाणात दुधातील स्निग्धांश यावर अवलंबून असतो. तसेच दुधाची किंमत देखील या फॅट वरुन ठरवली जाते. गाईच्या दुधाचा किमान फॅट हा 3.8 तर म्हशीच्या दुधाचा फॅटहा6 असणे आवश्यक आहे
त्यापेक्षा कमी फॅट असल्यास ते दूध अप्रमाणित समजले जाते. दुधातील फॅट कमी लागल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या लेखात आपण दुधातील फॅट वाढवण्यासाठी च्या काही उपाय योजना जाणून घेऊ.
या उपाययोजना केल्याने दुधातील फॅट वाढू शकतो
- गाई म्हशींना खाद्य म्हणून खाद्य तेलाच्या पेंडी,मका भरडा,तुर, हरभरा, मुगाची चुनी, भात,गव्हाचा कोंडा इत्यादी योग्य प्रमाणात द्यावा. बारीक दळलेले धान्य किंवा तेल देऊ नये.
- जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश करावा. उसाच्या वाड्यांचा वापर टाळावा. भाताचा पेंढा, गव्हाचे काड असा निकृष्ट चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.
- एखाद्या वेळेस आपल्याकडे जास्त दूध देणाऱ्या गाई असतात परंतु त्यांचा फॅटकमी असतो. अशा गाई जर तुमच्याकडे असतील व अधिक दूध उत्पादनामुळे आपण त्यांचा सांभाळ करत असाल तर त्यांच्या पुढील पिढ्या जर्सी जातीचे रेतन करून तयार कराव्यात.त्यामुळे दूध उत्पादना बरोबर दुधातील फॅटचे प्रमाण देखील वाढते.
- दूध काढण्याच्या वेळा या समान असाव्यात. जर सकाळी सहा वाजता दूध काढले तर सायंकाळी सहा वाजता दूध काढले गेले पाहिजे.दोन वेळच्या दुधातील अंतर वाढले तर फॅट कमी होतात.
- दूध काढताना जनावरांची खास अगोदर स्वच्छ धुवावी म्हणजे कासेतील रक्ताभिसरण वाढते.दुधातील फॅटचे प्रमाणात देखील वाढ होईल. दूध सात मिनिटांमध्ये पूर्णपणे काढावे.
- दूध काढताना पुरेशी स्वच्छता बाळगावी म्हणजे कासदाह सारखे आजार दुधाळ जनावरांना होणार नाहीत.कासदाह झाल्यास पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
- दुधाळ जनावरांना शक्य असल्यास मोकळे सोडावे. पुढे जनावरांचा व्यायाम होतो व त्यामुळे दूध उत्पादनात व दुधातील फॅटचे प्रमाणात वाढ होते.
- जास्त वयाची जनावरे व सातव्या वेताच्या पुढील दुधाळ जनावरे गोठ्यात ठेवू नये.
Share your comments