अल्पभूधारकांसाठी शेळीपालन खूप फायदेशीर ठरणारा व्यवसाय आहे. शेळीपालन व्यवसाय योग्य व्यवस्थापन आणि उत्तम नियोजन ठेवले तर खूप चांगला नफा कमावता येतो. तसे पाहायला गेले तर आपल्याकडे शेळ्यांच्या भरपूर जाती आहेत.
जातीपरत्वे प्रत्येकीचे वैशिष्ट्ये आणि गुणधर्म वेगळे आहेत. या लेखात आपण शेळीच्यासिरोही या जाती बद्दल जाणून घेणार आहोत.
सिरोही शेळी
शेळीची ही जात राजस्थान मध्ये जास्त प्रमाणात आढळते. ती सगळ्यांची विशेष प्रकारचे प्रजाती असून या जातीच्या नाव राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यात पडले आहे. शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या शेळ्यांचे पालन करणे फायदेशीर आहे. या शेळ्या हरणा सारख्या दिसतात आणि चमकदारपने सुंदर अशी शेळी आहे.
या जातीची शेळी राजस्थानातील अजमेर व जयपूर मध्ये पाळले जाते. तसेच उत्तर प्रदेश राज्यात देखील या शेळ्यांचे पालन केले जाते.
सिरोही शेळी चे वैशिष्ट्ये
- दुधाचे उत्पादन: ही जात मांस व्यवसाय साठी विशेष संगोपन केले जाते. ही जात वेगाने वाढणारे असून लवकर विकली जाऊ शकते. त्याचबरोबर दूध देखीलचांगल्या प्रमाणात देते. खेडे आणि शहरात सहजपणे या बकऱ्याचे पालन केले जाऊ शकते. बकरी दररोज एक ते दीड लिटर दूध देते.
- मांसासाठी उपयुक्त- शेळीची हे जात करम हवामानाचा प्रतिकार करते आणि वेगाने वाढते. त्याच वेळी सात आठ महिन्यात 30 किलो होते. एक वर्षानंतर शिरोही बकरी चे वजन 100 किलो होते. त्यामुळे या जाती पासून चांगले मांस तयार होते. शिरोही जातीच्या शेळ्या वर्षातून दोन ते तीन करडांना जन्म देतात. या शेळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे चारा नसेल तर या शेळ्या धान्य खाऊन जगू शकतात.
- कुठे खरेदी करावी- राजस्थान राज्याच्या स्थानिक बाजारपेठेतून सिरोही जाती सहज खरेदी करता येते. जर त्याच्या लहान पिल्लांची योग्य काळजी घेतली गेली तर एका वर्षात 100 किलो वजन होते. बाजारात आपण तिला सहज विकू शकतो.
Share your comments