पशुपालन तसेच दुग्धव्यवसाय असेल तर त्यासाठी हिरवा चारा मोठ्या प्रमाणात लागतो जे की या व्यवसायात जनावरांच्या चाऱ्यावर ६०-६५ टक्के खर्च जातो. पावसाळा तसेच हिवाळा मध्ये चाऱ्याची लागवड केली की हिरवा चारा मोठ्या प्रमाणात साठवता येतो. परंतु आजही काही शेतकऱ्यांना याबद्धल माहिती नाही. १२ महिने जनावरांना हिरवा चारा देणे शक्य नसते त्यामुळे चारा साठवणे गरजेचे असते आणि त्यात दूध व्यवसाय असेल आणि नियमित दुधामध्ये घट न होता दूध पाहिजे असेल तर हिरव्या चाऱ्याची आवश्यकता असते आणि यासाठी साधा उपाय म्हणजे मुरघास तयार करणे.
मुरघास कशाला म्हणतात
हिरवा चारा योग्य त्या वेळी कापणे आणि तो दोन महिन्यापर्यंत बंदिस्त खड्यामध्ये ठेवणे. या साठवून ठेवलेल्या चाऱ्यामध्ये पोषक अशी रासायनिक घटक तयार होतात. तसेच चारा चांगल्या प्रमाणत आंबल्याने तो चवीला स्वादिष्ट लागतो. मुरघास यालाच म्हणतात.
मुरघासाठी खड्डा कसा असावा
खड्याचा रचना, आकार आणि बांधणी ही तेथील हवामान तसेच तेथील परिस्थिती आणि जनावरांच्या संख्येवर अवलंबून असते. पाण्याचा कचरा होणारा खड्डा त्यासाठी उंचावरील जागेवर खड्डा काढावा लागणार आहे. खड्याची आतून जर शक्य असेल तर सिमेंट चे प्लास्टर लावावे त्यामुळे खड्डा मजबूत होतो. खड्याची उंची नेहमी रुंदी पेक्षा जास्त असावी.
मुरघास बनवण्याची प्रक्रिया
मुरघास करण्यासाठी चारा फुलोऱ्यात असेल त्यावेळी कापणी करावी. कापणी केली की चारा शेतात दिवसभर सुकत ठेवावा कारण मुरघासासाठी जो चारा लागतो त्यामध्ये ६० टाकले ओलावा असावा. चारा सुकला की अर्धा ते एक इंचापर्यंत कटरच्या साहाय्याने त्याचे बारीक तुकडे करावे. मुरघासमध्ये पौष्टिकता यावी म्हणून त्याच्या प्रत्येक थरावर २ टक्के युरियाचे द्रावण पसरावे. खड्यामध्ये पूर्ण चारा भरल्यानंतर तो हवाबंद करणे आवश्यक आहे त्यासाठी तो चांगला दाबून त्यावर पालापाचोळा चा थर देऊन त्यावर शेणमातीचा लेप द्यावा.
मुरघासचे फायदे
ज्यावेळी हिरवा चारा उपलब्ध नसेल त्यावेळी मुरघास उपयोगी पडतो त्यामुळे जास्त प्रमाणात मुरघास करणे कधीही चांगले असते. उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची दुधाची क्षमता टिकवून ठेवायची असेल तर मुरघास उपयोगी पडतो तसेच यामुळे जनावरांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते.
Share your comments