1. पशुधन

Business Idea : मेंढीपालन करून आपणही कमवू शकता लाखों जाणून घ्या सविस्तर

भारतात शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी फार पूर्वीपासून शेती समवेत पशुपालन करत आले आहेत आणि ह्यातून शेतकरी बांधव आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चांगल्या रीत्या चालवीत आहेत. भारतात शेतकरी आधीपासूनच कृषी कार्यासाठी बैल, गाय, तसेच बकरीपालन करत आला आहे. आणि अलीकडे पशुपालन हा काही शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय बनू पाहत आहे. जर आपणासही पशुपालन करायचे असेल तर तुम्ही केवळ मेंढीपालन करून चांगली मोठी कमाई करू शकता. मेंढीपालन करण्यासाठी जर आपणही इच्छुक असाल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया मेंढीपालन विषयी.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
sheep

sheep

भारतात शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी फार पूर्वीपासून शेती समवेत पशुपालन करत आले आहेत आणि ह्यातून शेतकरी बांधव आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चांगल्या रीत्या चालवीत आहेत. भारतात शेतकरी आधीपासूनच कृषी कार्यासाठी बैल, गाय, तसेच बकरीपालन करत आला आहे. आणि अलीकडे पशुपालन हा काही शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय बनू पाहत आहे. जर आपणासही पशुपालन करायचे असेल तर तुम्ही केवळ मेंढीपालन करून चांगली मोठी कमाई करू शकता. मेंढीपालन करण्यासाठी जर आपणही इच्छुक असाल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया मेंढीपालन विषयी.

मेंढीपालन हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा सौदा ठरू शकतो त्याचे कारण असे की ह्या व्यवसायात येणारा खर्च हा नगण्य आहे आणि कमाई चांगली आहे. मेंढीपालन गेल्या काही दशकात चांगल्या मोठ्या प्रमाणात वाढलाय त्याचे महत्वाचे कारण म्हणजे अलीकडे मेंढीच्या मांसाला मागणी वाढली आहे तसेच मेंधीपासून मिळणारे लोकरची देखील मागणी झापाट्याने वाढली आहे त्यामुळे शेतकरी बांधव मेंढीपालन करून आपले उत्पन्न अनेक पटीने वाढवू शकतात.

 मेंढीची वाढ खुप लवकर होते..

संपूर्ण जगात थोड्या मोठ्या प्रमाणात का होईना मेंढीपालन केले जाते. मेंढीपालन हे प्रामुख्याने लोकर, मांस आणि दुधासाठी केले जाते. मेंढीचे मांस अतिशय पौष्टिक मानले जाते त्यामुळे त्याला खुप मोठी मागणी असते आणि मेंढीला खुप मोठा बाजार उपलब्ध आहे. मेंढीच्या मांसाला मागणी ही चांगली असते असे असले तरी लोकरसाठी मेंढीपालन केले तर त्यापासून होणारी कमाई ही लक्षणीय असते शिवाय त्यापासुन दरवर्षी कमाई ही होतच असते. आणि लोकरला बाजार देखील चांगला आहे, ह्या दोन कारणांसाठी मेंढ्यांचे पालन केले जाते.

मेंढी ही बकरीच्या तुलनेने जास्त वाढते म्हणजे मेंढीचा शारीरिक विकास खूप वेगाने होतो. तसेच मेंढीपालनचा खर्च हा देखील खुप नगण्य आहे आणि मेंढी पाळण्यास सोपी आहे आणि तिला खाण्यासाठी खर्च खूप कमी लागतो. आपल्या भारत देशातील 20 व्या पशुगणनेनुसार देशात 10 दशलक्षाहून अधिक मेंढ्या आहेत. तसे बघायला गेले तर मेंढी पालणाचे अनेक फायदे आहेत, तसेच मेंढीपालन हे इतर पशुपालनाच्या तुलनेत सोपे आहे, कारण मेंढीचा आकार हा खुप लहान असतो. ह्यामुळे मेंढीपालन हे कमी जागेत देखील सहजरीत्या करता येते. याशिवाय सर्व्यात महत्वाचा फायदा म्हणजे मेंढीपालन कोणत्याही हवामानात करता येऊ शकते.

कसं करणार मेंढीपालन

जगातील जवळजवळ सर्वच देशांत मेंढी पालन केले जाते. तसेच शेकडो वर्षांपासून भारतात देखील मेंढीपालन चालू आहे अनेक लहान शेतकरी मेंढीपालन करत आहेत. मेंढीपालन करण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात मेंढीपालन व्यवसाय सातत्याने वाढत आहे. म्हणूनच, जर तुम्हालाही मेंढीपालन करायचे असेल तर खालील गोष्टी अवश्य वाचा

 

»मोठ्या प्रमाणात म्हणजे व्यावसायिक मेंढीपालनासाठी, किमान 20 मादी मेंढ्या आणि एक नर मेंढापासून सुरुवात करा.

»मेंढीची किंमत ही तिच्या जातीवर ठरवली जात असते आणि त्याच्या वयावर अवलंबून असते. म्हणुन किंमत ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते.

»एका मेंढीची किंमत तीन ते आठ हजार रुपयांपर्यंत असते, जर ह्या किमतीत आपल्यालाही मेंढी मिळाली तर हा व्यवसाय एक लाख रुपयांमध्ये सुरू करता येतो.

»

20 मेंढ्यांसाठी 500 चौरस फुटांचे शेड पुरेसे मानले जाते, परंतु शेड हे मोकळे आणि हवेशीर असावे. शेड हे जवळपास 40 हजार रुपयांमध्ये तयार केले जाऊ शकते. किमतीत तफावत असू शकते.

»नर मेंढा हा मादी मेंढ्यांपासून वेगळा ठेवावा  जेणेकरून त्यांच्या खाणपाण्यावर विशेष लक्ष ठेवता येऊ शकते. याशिवाय, नर हे हिंसक असतात त्यामुळे मेंढीला नुकसान होऊ शकते.

»गरोदर मेंढ्या देखील बाकीच्या मेंढ्यांपासून वेगळ्या ठेवल्या पाहिजेत, पण तीन ते चार गरोदर मेंढ्या एकत्र ठेवल्या जाऊ शकतात.

»मेंढ्या उघड्यावर चरतात, ते प्रामुख्याने जंगली गवत आणि झाडांची पाने खातात. पण मेंढया ह्या फक्त सकाळी आणि संध्याकाळी चारायला हव्यात.

English Summary: sheep keeping business you can earn more money Published on: 12 October 2021, 02:51 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters