जगात अगदी शेती व्यवसायाच्या (Farming) सुरवातीपासून पशुपालन (Animal Husbandry) केले जातं आहे. आपल्या देशातील शेतकरी बांधव देखील अतिरिक्त उत्पन्न (Farmers Income) मिळवण्यासाठी पशुपालन करत आहेत. पशुपालनात शेतकरी बांधव मेंढीपालन (Sheep Farming) देखील आता व्यावसायिक स्तरावर करू लागले आहेत.
इतर पशूंचे पालन करण्यासाठी शेतकरी बांधवांना अधिक खर्च करावा लागतो मात्र मेंढीपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिशय कमी खर्च करावा लागतं असल्याने शेतकरी बांधव मेंढीपालन करण्यास अधिक पसंती दर्शवीत आहेत. मेंढीपालनमध्ये मांस व्यापाराव्यतिरिक्त, लोकर, खत, दूध, चामडे अशा अनेक उत्पादन मिळवले जातात, ज्यातून पशुपालक शेतकरी चांगले पैसे कमवू शकतात.
देशात या मेंढ्यांच्या जातींचे केले जाते पालन
मित्रांनो भारत शेतीप्रधान देश असल्याने देशातील विविध राज्यांमध्ये मेंढीपालन या शेतीपूरक व्यवसायसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. याचा लाभ घेऊन पशुपालक शेतकरी बांधव निश्चितचं आपले उत्पन्न दुपटीने वाढवू शकतात.
सध्या मालपुरा, जैसलमेरी, मंडिया, मारवाडी, बिकानेरी, मारिनो, कोरिडियल रामबुटू, छोटा नागपुरी शहााबादी या प्रजातींच्या मेंढ्याचे मोठ्या प्रमाणात पालन केले जात आहे.
मेंढीची किंमत किती आहे?
खरं पाहता एका मेंढीची ऍव्हरेज किंमत 3 हजार ते 8 हजार रुपये असू शकते. म्हणजेच पशुपालक शेतकरी बांधव सुमारे 1 लाख रुपयांमध्ये मेंढीपालन व्यवसाय सहज करू शकतात. 20 मेंढ्यांसाठी 500 स्क्वेअर फूट एवढी जागा पुरेशी असल्याचे सांगितले जाते. तीस ते चाळीस हजार रुपयांत मेंढ्यांसाठी फार्म बनवता येते.
मेंढीपालन व्यवसायाचे आर्थिक गणित
मेंढीपालन हे तुलनेने सोपे असल्याने आणि कमी गुंतवणूक करावी लागतं असल्याने ग्रामीण भागात मेंढीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. यामुळे याला उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणुन ओळखले जाते. त्यांच्याकडून लोकर, मांस आणि दूध जास्त प्रमाणात मिळू शकते.
याशिवाय मेंढीच्या लेंड्या देखील खत म्हणून उपयोगात आणले जाते. या खताचा उपयोग शेताची उत्पादकता वाढवण्यासाठी होऊ शकतो. मेंढ्यांच्या शरीरावर खूप मऊ आणि लांब फर असतात, ज्यापासून लोकर मिळते. त्याच्या लोकरीपासून अनेक प्रकारचे कपडे बनवले जातात. यामुळे याला मोठी मागणी असते. म्हणुन मेंढीपालन व्यवसायातून दुहेरी फायदा मिळतं असल्याचे सांगितलं जाते.
Share your comments