तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे. उद्योग क्षेत्र असो की शेती क्षेत्र यामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करून कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करता येत आहे.पशुपालन क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जात आहे. पशुपालन क्षेत्रांमध्ये असलेले सेक्स सोर्टेड सीमेन असेच एक तंत्रज्ञान आहे,जेपशुपालकांसाठी फारच फायदेशीर आहे. या लेखात आपण या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेऊ.
सेक्स सोर्टेडतंत्रज्ञान नेमके काय आहे
बरेच पशुपालक बहुतांशी दूध उत्पादनासाठी गाईंपासून कालवडी चा जन्म व्हावा अशी अपेक्षा करतात. यासाठी गाय विताना कालवडींचा जन्म व्हावा यासाठी लिंग निर्धारित किंवा सेक्स सोर्टेडसीमेनचा अत्यंत फायदेशीर उपयोग होऊ शकतो. यामध्ये लिंग निर्धारित रेतमात्रांचा कृत्रिम रेतनासाठी वापर करून अधिक प्रमाणात कालवडीचाजन्म होऊ शकतो.
जाणून घेऊया तंत्रज्ञानाबद्दल
- वळूचे वीर्यामध्ये एक्स आणि वाय या दोनप्रकारचे गुणसूत्र असणारे शुक्राणू आढळतात. याउलट मादी पशूमध्ये स्त्री बीजात एक्स एक्स प्रकारच्या गुणसूत्रांचे प्रमाण असते.
- जेव्हा गर्भधारणेच्या कालावधीत वळूच्या विर्या मधील एक्स गुणसूत्र स्त्रीबीजातील एक्स गुणसूत्रासोबतजुळते तेव्हा वासरी जन्मास येते.
- उच्च अनुवंशिकता असलेल्या वळूपासून प्राप्त झालेल्या वीर्यातील एक्स आणि वाय गुणसूत्र असलेले शुक्राणू वेगळे करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
सेक्स सोर्टेड सीमेन तंत्रज्ञानाचे फायदे
उच्च गुणवत्ता, अनुवंशिकता आणि उत्पादन क्षमता असलेल्या कालवडी जन्मास आणणे या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायात दूध उत्पादन वाढविण्यात मदत झाली आहे. गाय किंवा म्हैस विताना प्रसूतीच्या वेळेस वेदना होतात त्याला कष्ट प्रसूती म्हणता येईल, नर वासरांचा बांधा हा मादी वासरांच्या बांध्यापेक्षा तुलनेने जास्त असतो. त्यामुळे प्रसूती अधिक कष्ट दायक होते. नर वळूंच्या तुलनेत मादी वासरांच्या आकार छोटा असतो म्हणून कष्ट प्रसूतीची शक्यता कमीत कमी असते. सेक्स सोर्टेडसिमेनचा वापर केल्यानंतर मादी वासरांचा जन्म जास्त प्रमाणात होतो त्यामुळे मादी वासरांची संख्या वाढून दुधाळ पिढी गोठ्यातच तयार होते. पशुपालकांना दूध देणाऱ्या गाई मिळाल्यामुळे वाढीव दुध उत्पादन मिळते व आर्थिक प्रगतीत कमालीची सुधारणा होते.
या तंत्रज्ञानाचा वापर करून जर नर वासरे जन्माला आणली तर त्यांची विक्री आपण नर वळू संगोपन केंद्र किंवा रेत प्रयोगशाळा यांना करू शकतो. कारण ते या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उच्च गुणवत्ता व अनुवंशिकता असलेले वासरू असतात. त्यामुळे पशुपालकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपल्याला नर वासरू जन्माला आणायचे किंवा मादी वासरू जन्माला आणायचे हे आपल्यावर अवलंबून असते.जर पशुपालकांनी या तंत्रज्ञानाचा वापर केला तर अधिक फायदा होऊ शकतो.
Share your comments