मित्रांनो जर आपणास व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची बातमी आपल्या साठी विशेष आहे. जर आपण शेती क्षेत्राला व्यवसाय म्हणून निवडण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी देखील आजची बातमी खूपच विशेष आहे. मित्रांनो शेतीला जोडधंदा म्हणून देखील हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो आणि यातून चांगली मोठी कमाई केली जाऊ शकते. या व्यवसायाची एक विशेष बाब म्हणजे या व्यवसायाला सरकार द्वारे देखील प्रोत्साहन दिले जाते तसेच या व्यवसायासाठी सरकार अनुदान देखील देत असते. मित्रांनो आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे पोल्ट्री फार्मिंगचा. मित्रांनो जर आपण छोट्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर आपणास अवघे 50 हजार रुपयापासून ते 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असतो. सुमारे दीड लाख रुपये इन्वेस्ट करून आपण 1500 कोंबड्यांचे संगोपन करू शकता.
किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल
मित्रांनो छोट्या स्तरावर पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आपणास 50 हजार रुपयापासून दीड लाख रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो. तसेच जर आपणास हा व्यवसाय मोठ्या स्तरावर करायचा असेल तर आपल्याला सुमारे चार लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असतो. मित्रांनो जर आपल्याकडे एवढी मोठी रक्कम उपलब्ध नसेल तर आपल्याला या व्यवसायासाठी अनेक बॅंका लोन देखील प्रोव्हाइड करत असतात..
सरकार देणार 35 टक्केपर्यंत सबसिडी
पोल्ट्री फार्म व्यवसाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार दरबारी अनेक योजना राबविल्या जात असतात. या योजनेसाठी शासन 25 टक्क्यांपर्यंत अनुदान देखील देते. तसेच जर आपण SC अथवा ST कॅटेगरी मध्ये येत असाल तर आपणास या व्यवसायासाठी 35 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते.तसेच पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी अनेक बँका लोन देत असतात.
त्यामुळे जरी आपल्याकडे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल नसेल तरीदेखील आपण बँक द्वारे लोन घेऊन हा व्यवसाय सहजरीत्या सुरू करू शकता आणि यातून चांगली मोठी कमाई करू शकता. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की पोल्ट्री फार्म सुरू करणे जरी सोपे वाटत असेल तरी ते दिसते तेवढे सोपे नाही. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही आपणास ट्रेनिंग घेण्याची शिफारस करू इच्छितो.
ट्रेनिंग घेऊन हा व्यवसाय केला असता त्यातून चांगली कमाई केली जाऊ शकते. जर आपणास 1500 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म उभारायचा असेल तर यासाठी आपणास दहा टक्के एक्सट्रा कोंबडीचे पिल्ले खरेदी करावी लागणार आहेत, कारण की कोंबड्यांवर रोग आले असता पशुधनाची मोठी हानी होण्याची शक्यता असते. मित्रांनो कोंबडी ची पिल्ले खरेदी केल्यापासून तर ते अंडे देण्यास सक्षम होईपर्यंत म्हणजे सुमारे एक वर्षासाठी 1500 कोंबड्यांच्या आहारासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असतो. आणि यातून एका वर्षातून सुमारे सोळा लाख रुपयाची फक्त अंडीच विकली जातात.
Share your comments