देशातील हरियाणा राज्यात (Hariyana State) मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते या राज्यातील अनेक पशुप्रेमी विशेष चर्चेत असतात त्याचे मुख्य कारण म्हणजे ते ज्या पशुचे संगोपन करतात त्याची किंमत ही लाखोंत नव्हे तर करोडो रुपयात असते. याच राज्यातील सुलतान रेड्याला तब्बल 21 कोटी रुपयांची बोली लागली होती, जो की देशातला सर्वात महागडा रेडा ठरला होता, नुकत्याच काही दिवसापूर्वी सुलतान रेडा हे जग सोडून गेला मात्र असं असले तरी त्यांच्या नावावर असलेला विक्रम अद्यापपर्यंत कायम आहे. आज आपण हरियाणातील अशाच चर्चेत असलेल्या विवीआयपी रेड्याविषयीं जाणुन घेणार आहोत, हा विविआयपी रेडा देखील त्याच्या किंमतीमुळे देशात विशेष प्रसिद्ध आहे. याची किंमत जरी ही सुलतान पेक्षा कमी असली तरी यांच्या किंमतीत 100 एकर जमीन खरेदी केली जाऊ शकते, हो बरोबर ऐकताय तुम्ही, कारण की याची किंमत ही तब्बल 11 कोटी रुपये आहे. आम्ही ज्या रेड्याविषयीं बोलत आहोत त्याचे नाव आहे रुस्तम. रुस्तमच्या मालकाचे नाव दलेल जांगडा असं आहे.
रुस्तम हा रेडा हरियाणा जिल्ह्यातील जिंद जिल्ह्यातील आहे, यांच्या मालकाच्या मते, आज या रुस्तम रेड्याची मार्केट प्राईस ही जवळपास 11 कोटी रुपये आहे (Rustam Buffalo Market Price is about 11 crores). मात्र असं असले तरी या रेड्याला त्यांचे मालक विकणार नाहीये, रुस्तमचे मालक यांनी बोलतांना सांगितलं की, रुस्तम त्यांच्या परिवाराचा एक सदस्य आहे तसेच तो परिवाराचा अभेद्य अंग आहे आणि म्हणून याचे मालक त्याचे आधार कार्ड देखील बनवणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो रुस्तम चे खाणे पिणे हे इतर रेड्यासारखे सामान्य नाहीये. रुस्तमला सकाळी नाश्त्यासाठी बदाम मिक्स केलेले दूध दिले जाते, तसेच त्याला फळआहार देखील दिला जातो. रुस्तम रेड्याला रोज 300 ग्रॅम गावरान तूप पाजले जाते, रुस्तम रेड्याला जमिनीवर बसणे पसंत नाही त्यामुळे त्याच्यासाठी गादी टाकावी लागते,अहो ते तर सोडाच रुस्तम रेड्याला उन्हाळ्यात चक्क एसीची हवा खाने पसंत आहे.
एकंदरीत रुस्तम रेड्याचे लाड एखाद्या युवराज प्रमाणे पुरविले जातात. आणि पुरवले देखील पाहिजे कारण की, रुस्तम हा काही साधारण रेडा नाही याचे नामकरण चक्क राष्ट्रीय डेरी संशोधन संस्था या सरकारी संस्थेने केले आहे. यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की रुस्तम हा कोणी साधारण रेडा नसून एक व्हीआयपी रेडा आहे.
Share your comments