सध्या माणसांप्रमाणे जनावरांना देखील अनेक रोग येत आहेत. लम्पी त्वचा रोगाने राजस्थानमध्ये हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत ४ हजार जनावरे दगावली आहेत. हा विषाणू प्रथम गुजरातला लागून असलेल्या जिल्ह्यांतील गुरांमध्ये आढळून आला होता, हा रोगाचा केंद्रबिंदू होता, परंतु त्यानंतर तो त्वरीत उत्तर राजस्थानमध्येही सरकला आहे. जवळपास 70,000 संक्रमित गुरांवर उपचार करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
असे असताना आता लंम्पी त्वचेच्या रोगावर लस तयार करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री, कैलाश चौधरी यांनी नवी दिल्लीतील कृषी भवन येथे राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र हिस्सार आणि भारतीय पशुवैद्यकीय संस्था इज्जतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या लुम्पी प्रो लसचे प्रकाशन केले.
गेल्या काही दिवसांपासून राजस्थानसह विविध राज्यांमध्ये गायींच्या वंशामध्ये पसरत असलेल्या त्वचेच्या आजाराची समस्या शेतकरी आणि पशुपालकांसह सर्व देशवासीयांसाठी अत्यंत दुःखद आहे. दररोज शेकडो गायींच्या मृत्यूने आपल्या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. संशोधनानंतर शास्त्रज्ञांच्या चमूने यापासून मुक्ती मिळवण्यासाठी एक लस तयार केली आहे.
मुख्यमंत्रीपद शिंदे गटाला देऊन फडणवीसांनी केली शाळा, महत्वाची खाती भाजपकडेच; वाचा खातेवाटप
निश्चितच लवकरच ही लस बाधित भागात आणि पशुधन मालकांपर्यंत पोहोचवली जाईल आणि आम्ही या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होऊ, असे यावेळी कैलाश चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, यामुळे दूध उत्पादनात लक्षणीय घट होते, आहार घेणे कठीण होणे आणि कधीकधी जनावराचा मृत्यू होणे ही या रोगाची लक्षणे आहेत. संसर्गाचा मृत्यू दर 1.5% आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी घेणे गरजेचे.
कोण आहेत बिहारचे न होऊ शकलेले एकनाथ शिंदे? नितीशकुमारांनी उद्धव ठाकरे होण्याआधीच ओळखली गेम, आणि...
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, संसदीय मतदारसंघातील शेतकरी आणि पशुपालक शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर, त्यांनी ICAR च्या भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचे वैज्ञानिक पथक पश्चिम राजस्थानच्या विविध भागात पसरलेल्या रोगाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी पाठवले आहे. यामुळे आता लवकरच याची लस उपलब्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
तुम्ही फक्त 'येस सर' म्हणायचं आणि ... ! गडकरींनी अधिकाऱ्यांना झाप झाप झापलं
शेतकऱ्यांनो आता पीव्हीसी पाईपसाठी मिळणार ३० हजार रुपये, असा घ्या लाभ..
डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी FBI चा छापा, इतिहासात पहिल्यांदाच कारवाई केल्याने जगभरात खळबळ
Share your comments