शेतकऱ्याचा दूधधंदा प्रमुख जोडधंदा आहे. शेरतकऱ्याचे अर्थकारण दूधधंदा व्यवसायावर अवलंबून आहे. हा व्यवसाय करत असताना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. दूधधंदा मध्ये दुधामध्ये असणारी फॅट (Fat in milk) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते.फॅटवरच दुधाचा दर ठरवला जातो.
गाईच्या दुधाची किमान फॅट 3.8 आणि म्हशीच्या दुधाची फॅट 6 असणे आवश्यक असते. अनेक कारणांमुळे दुधातील फॅट कमी होते. कमी झालेल्या फॅट मुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. बाजारभाव कमी मिळतो. आज आपण आपल्या दुधातील फॅट कमी होण्याची कारणे तसेच त्यावर काय उपाययोजना कराव्यात हे पाहणार आहोत.
दुधातील फॅट कमी होण्याची कारणे
जनावरांचा आहार
जनावरांचा आहार हा खुप महत्त्वाचा असतो. दुधातील फॅट कमी होण्यामागे सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांचा आहार आहे. शेतकरी गाई-म्हशींच्या आहारात खाद्याबरोबर तेलाचा वापर करतात. आहारात सरकीच्या तेलाचा अंश असल्यास फॅट मध्ये थोडी वाढ होते. परंतु खाद्यातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण वाढल्यास पचन क्षमतेवर वाईट परिणाम होऊन दुधाचे प्रथिनांमध्ये घट येते.
हवामानाचा परिणाम
पावसाळ्यात, हिवाळ्यात हिरवा चारा मुबलक असल्याने दूध उत्पादन वाढते परंतु फॅटचे प्रमाण कमी होते. याउलट उन्हाळ्यामध्ये कोरड्या वैरणीचा समावेश असल्याने दुधातील स्निग्धांश व वाढलेली दिसून येते. उन्हाळ्यामध्ये तापमानात जास्त वाढ झाल्यास जनावरे जास्त पाणी पितात व कमी चारा खातात. अशा वेळी त्यांच्या शरीरातील तापमान वाढल्यामुळे दूध उत्पादन आणि स्निग्धांशाचे प्रमाण कमी होते.
आजाराची लागण
संकरित गायांना कासाचा आहार जास्त होतात, यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण सरासरी पेक्षा जवळजवळ निम्म्याने कमी झाले असते.
दूध काढण्याच्या वेळा
दूध काढण्याच्या वेळात बदल झाला की, फॅट मध्ये बदल होतो. दूध काढण्याच्या दोन वेळा मध्ये जास्तीत जास्त बारा तासाचे अंतर असावे. हे अंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढते मात्र दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.
दुधातील फॅट वाढवण्यासाठी करा उपाय योजना
1. दूध काढताना जनावरांची कास स्वच्छ धुवावी. कासेतील रक्ताभिसरण वाढेल. दुधातील स्निग्धांशाचे प्रमाणात देखील वाढ होईल व दूध सात मिनिटांमध्ये पूर्णपणे काढावे.
2. जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश करावे. उसाच्या वाड्यांचा वापर टाळावा. भाताचा पेंढा, गव्हाचा काड इत्यादी प्रकार असा निकृष्ट चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील फॅट कमी होतात.
3. गाई म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी, मक्का, भरडा, तुर, हरभरा, मुगचुनी, गव्हाचा कोंडा इत्यादी योग्य प्रमाणात द्यावे. बारीक दळलेले धान्य किंवा तेल देऊ नये.
Share your comments