केवळ शेतीच नाही तर पशुपालनाचा ट्रेंडही खूप वेगाने वाढताना आपल्याला दिसत आहे आणि वाढायलाही का नको वाढायलाच पाहिजे बरोबर ना? जर पशुपालक शेतकऱ्यांनी पशुपालणंच केले नाही, तर कदाचित आपल्याला ताजे दूध आणि त्यापासून बनवलेले चविष्ट आणि पौष्टिक पदार्थही खायला मिळणार नाहीत. दूध आपल्या शरीरासाठी खुप गरजेचे आहे जेणेकरून आपले शरीर हे सदृढ राहील आणि आपल्याला होणाऱ्या रोगांपासून आपण संरक्षित राहू.
आता विषय असा आहे की, कशाचे दुध पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, म्हणून अलीकडे लोक गाय आणि म्हशीचे दूध जास्त पितात. परंतु शेळीचे दूध पिणे अधिक फायदेशीर असल्याचे सांगितले जातं आहे. हे आम्ही नाही, तर असं डॉक्टर सांगत आहेत, त्यामुळे शेळीच्या दुधाची मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे आणि म्हणुनच शेळीचे दूधही खूप महाग झाले आहे, म्हणून शेळीच्या दुधाला डॉक्टर आणि विशेषज्ञ का पसंती देत आहेत तेच आपण आज जाणुन घेणार आहोत.
शेळीचे दुध आरोग्यासाठी ठरतेय फायदेशीर
अलीकडे, अनेक प्रकारचे आजार वाढत आहेत
आणि अशातच प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे देखील अनेक लोक आजारी पडत आहेत त्यामुळे लोक खूप घाबरली आहेत. आणि अशा परिस्थितीत डॉक्टर शेळीचे दूध पिण्याचा सल्ला माणसांना देत आहेत.
प्लेटलेट्स कमी झालेले असल्यास शेळीचे दूध पिणे फायदेशीर ठरत आहे. बकरीच्या दुधाच्या सेवणाने आपल्या शरीरातील प्लेटलेट्स खुप जलद गतीने वाढतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे आणि जे लोक स्वस्थ आहेत त्यांनी जर बकरीचे दुध सेवन केले तर त्या व्यक्तीतील प्लेटलेट्स कमी होत नाहीत.म्हणुन बकरीचे दुध ही लोकांसाठी संजीवनी समान काम करत आहे.
बकरीचे दुध का झाले महाग
सध्या शेळीच्या दुधाची मागणी खूप वाढली आहे. त्यामुळे शेळीच्या दुधाची उपलब्धता कमी झाली आहे, मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे परिस्थिती अशी आहे की लोक बकरीचे दूध विकत घेण्यासाठी गावा-गावात जात आहेत, तर काही लोक गावातून शेळ्या आणून त्यांचे पालन करत आहेत आणि शहरात दूध विकत आहेत. शेळीच्या दुधाची मागणी ही सध्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे नेहमी 30 रुपयाला विकल्या जाणाऱ्या शेळीचे दूध सध्या चक्क 60 ते 70 रुपये प्रति लिटर मिळत आहे. आणि जर म्हशीच्या तुलनेचा जर विचार केला तर शेळीचे दुध हे
त्यापेक्षा देखील 10-15 रुपये प्रति लिटर महाग झाल्याचे आपल्याला दिसत आहे, म्हशीचे दूध बाजारात सुमारे 55 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी बकरीच्या दुधाचे सेवन खूपच वाढले
जास्त करून लोक गाय किंवा म्हशीचे दूध पिणे पसंत करतात. पण आता, सध्या ह्या रोगांच्या काळात, लोक शेळीचे दूध पिणे पसंत करत आहेत आणि ते सहजासहजी मिळत नाही म्हणुन बकरीचे दुध शोधत आहेत, कारण बकरीचे दूध अनेक रुग्णांसाठी औषध म्हणून काम करत आहे. डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की प्लेटलेट वाढवण्यासाठी रुग्णांना बकरीचे दूध द्यावे. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शेळीच्या दुधाची मागणी इतकी वाढली आहे की ती अक्षरशः पूर्ण केली जाऊ शकत नाही.
तथापि, लोक गावाकडच्या लोकांकडून दुध मागवून त्याचे सेवन करत आहेत. बकरीचे दुध हे डेंगु झालेल्या रुग्णांना पण एक रामबाण औषधसारखे काम करते त्यामुळे त्याच्या मागणीत अपेक्षापेक्षा अधिक वाढ झाली आहे, ह्या कारणामुळेच बकरीचे दुध हे दुपटीने वाढलेले आहे.
Share your comments