जर आपण शेळीच्या दुधाचा विचार केला तर ते पचायला हलके असून आरोग्यासाठी उपयुक्त आहे. एक परिपूर्ण सकस आहार म्हणून शेळीचे दूध महत्त्वाचे आहे. भारतामध्ये 27 प्रकारच्या शेळ्यांच्या जाती आहेत
यामध्ये देशी शेळी एका वेतात 60 लिटर दूध देते. तसेच विदेशी जातींपासून संकर केलेल्या सानेन सारख्या जाती एका वेतात 300 लिटरपर्यंत दूध देतात. जगाच्या एकूण दूध उत्पादनामध्ये शेळीचे दूध हे दोन टक्के आहे. शेळी पालन व्यवसाय हा वेगाने वाढणार असून कृषिपूरक व पर्यावरण पूरक दुग्ध व्यवसायासाठी महत्त्वाचा आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने शेळीच्या दुधापासून बिस्किटे, श्रीखंड, पनीर तसेच आईस्क्रीम तयार केले आहे. तसेच विदेशात देखील शेळीच्या दुधापासून तयार केलेले पेटा आणि पीकोरिना हे पदार्थ लोकप्रिय आहेत.
शेळीच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे
- शेळीचे दूध पचण्यास हलके आसण्याचे प्रमुख कारण म्हणजे यातील स्निग्ध पदार्थांच्या कणांचा सूक्ष्म आकार हे होय.
- शेळीच्या दुधामध्ये शरीराला नुकसान दायक सूक्ष्मजंतूंचा नाश करणारे घटक अधिक असतात.
- शेळीच्या दुधात नऊ ते दहा प्रकारचे खनिज आहेत.परिणामी शरीराला असणारे आवश्यक खनिजांची कमतरता कमी होण्यास चांगल्या प्रकारे मदत होते.
- जर रोज एक ग्लास भर शेळीचे दुध पिले तर ते आरोग्यासाठीलाभदायक आहे. तसेच शेळीचे दूध प्यायल्याने आतड्यांना असलेली सूज कमी होण्यास मदत होते.
- शरीरामध्ये असलेली कॅल्शिअमची कमतरता भरून निघण्यास मदत होते व हाडे मजबूत होतात.
- शेळीच्या दुधामध्ये सेलेनियम मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यास मदत होते.
- शेळीच्या दुधात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शेळीच्या दुधाच्या सेवनामुळे शरीराचा विकास होण्यास मदत होते. लक्षात घेऊन लहान मुलांना शेळीचे दूध द्यावे.
- हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील शेळीचे दुध फायदेशीर आहे. शेळीच्या दुधामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. हार्ट अटॅक, स्ट्रोक्स या समस्यांचा त्रास रोखण्यासाठी शेळीचे दूध फायदेशीर ठरते.
- शेळीच्या दुधात पोटॅशियम घटकही मुबलक असल्याने रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.
Share your comments