देशात अनेक पशू प्रेमी महागड्या पशुचे संगोपन करत असतात, यात प्रामुख्याने महागड्या रेड्यांचा सामावेश असतो. नुकत्याच काही दिवसापूर्वी हरियाणातील सुलतान नावाचा रेडा मृत्यू पावला ज्याची किंमत 21 कोटी रुपये असल्याचा दावा केला गेला होता. मात्र, आज आपण कुठल्या रेड्याविषयीं नाही तर बैलाच्या जोडीविषयी जाणुन घेणार आहोत, आणि विशेष म्हणजे ही बैलाची जोड महाराष्ट्रातील मराठमोळी जोडी आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ या तालुक्यातील बबन भगत यांच्याकडे ही महागडी बैल जोडी आहे.
बबन भगत हे औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे पिंपळदर येथे वास्तव्यास आहेत आणि यांना महागड्या बैलांना जोपासण्याचा छंद आहे, त्यांच्याजवळ आता हल्ली आठ महागड्या बैलजोड्या आहेत. मात्र प्रेम चोपडा आणि हातोडा ही बैलजोडी या आठ बैलजोडी पेक्षा विशेष आहे. कारण की ही बैलजोडी कोणी व्हीव्हीआयपी पेक्षा कमी नाही या बैलजोडीची किंमत किती तब्बल पंधरा लाख रुपये असल्याचे बबन भगत यांनी सांगितले, तसेच या बैलजोडीसाठी अनेक खरेदीदार लोकांनी मागणी केली असता देखील बबन भगत यांनी प्रेम चोपडा आणि हातोडा यांना विकण्यास साफ नकार दर्शवला आहे.
बबन भगत हे आपल्या आठही बैलजोडीना पोटच्या पोरासारखा जीव लावतात. मात्र प्रेम चोपडा आणि हातोडा या बैलजोडी वर बबन भगत यांची विशेष माय आहे. बबन प्रेम चोपडा आणि हातोडा या बैलांना खुराक मध्ये काजू, बदाम, अंडी, दूध इत्यादी प्रथिने युक्त पदार्थ खाऊ घालतात. प्रेम चोपडा आणि हातोडा या बैलांना दोन्ही टाईम हा आहार पिठात कालवून दिला जातो. प्रेम चोपडा आणि हातोडा यांना जीव लावण्याचे बबन यांच्याकडे विशेष कारण देखील आहे प्रेम चोपडा आणि हातोडा हे दोघं बैल परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरले आहेत, राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक शंकर पटाच्या शर्यतीत प्रेम चोप्रा आणि हातोडा यांनी आपला परचम प्रस्थापित केला आहे. या कामगिरीमुळे प्रेम चोपडा आणि हातोडा यांना संपूर्ण मराठवाड्यात नव्हे नव्हे तर संपूर्ण राज्यात विशेष नावलौकिक मिळाला आहे.
प्रेम चोपडा व हातोडा यांना हजारो रुपयांचा खुराक वर्षाकाठी लागतो मात्र ते याची परतफेड व्याजासकट वसूल करून देतात बबन भगत या जोडीच्या माध्यमातून हजारो रुपयांची कमाई करत असतात. असं असले तरी भगत या बैलजोडी पासून होणारी कमाई सर्वस्व त्यांच्या आहारासाठी त्यांच्या राहण्यासाठी व वर्षभराच्या इतर व्यवस्थेसाठी खर्च करून टाकतात. सध्या बबन आपल्या प्रेम चोपडा व हातोडा या नाद खुळा जोडीच्या माध्यमातून इतर जोडीना प्रशिक्षण देखील देत आहेत व आगामी बैलजोडी शर्यतीसाठी इतर बैलजोडयांना सज्ज करत आहेत.
Share your comments