कुक्कुटपालन व्यवसाय हा सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक आशेचा किरण असून व्यवस्थित नियोजन आणि करण्याची तयारी असली तर पोल्ट्री व्यवसाय खूप आर्थिक समृद्धी देऊ शकतो. पोल्ट्री व्यवसायामध्ये कोंबड्यांच्या जातीची निवड,खाद्य व्यवस्थापन तसेच त्यांचे पाण्याचे व्यवस्थापन व वातावरणानुसार त्यांची देखभाल या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. परंतु कोंबड्यांची निवड ही देखील तेवढीच महत्वाची ठरते.
तसे पाहायला गेले तर कोंबड्यांच्या खूप जाती असून जातीपरत्वे त्यांची उत्पादनक्षमता व अंडी देण्याची क्षमता देखील वेगवेगळे आहे. या लेखामध्ये आपण अशाच कोंबडीच्या एका उपयुक्त जाती बद्दल माहिती घेणार आहोत. पोल्ट्री व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
'प्रतापधन कोंबडी' एक फायदेशीर जात
पोल्ट्री व्यवसाय मधले शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी महाराणा प्रताप कृषी आणि प्रोद्योगिकि विश्वविद्यालय उदयपूर यांनी कोंबडीची एक जात विकसित केली असून तिचे नाव प्रतापधन असे आहे.
आपल्याकडे पोल्ट्री व्यवसाय हा भूमिहीन मजूर किंवा कमीत कमी शेती असणारे शेतकरी करतात. अगदी कमी जागा, कमीत कमी भांडवलात असेल अगदी सहजतेने हा व्यवसाय करून कमीत कमी वेळेत अधिक नफा या व्यवसायात मिळणे शक्य आहे.
नक्की वाचा:भरपूर मांसासाठी कोंबड्यांना आहार कोणता द्यावा?
जर आपण देशी कोंबड्या चा विचार केला तर एका वर्षात 83 अंडी देतात परंतु ही कोंबडीची जात एका वर्षाने 161 अंडी देते. ग्रामीण भागामध्ये अगदी सहजतेने या कोंबडीचे पालन करता येते. जर आपण अंडी देण्याच्या बाबतीत गावरान जातीच्या कोंबड्या चा विचार केला तर त्या फक्त 38 दिवसात अंडी देतात.
एका वर्षाला 50 ते 60अंडी देऊ शकतात व हे प्रमाण एकूण उत्पादनाच्या फक्त 21 टक्के आहे. परंतु प्रतापधन ही जात गावरान कोंबड्यांच्या तुलनेमध्ये तीन पट अधिक अंडी देते व 75 टक्क्यांपर्यंत तिचे वजन जास्त असते.
Share your comments