1. पशुधन

Small Pox: शेळ्यांमधील देवी आजार व प्रतिबंधात्मक उपचार

देवी आजार हा पॉक्स नावाच्या विषाणू पासून शेळ्या व मेंढ्यांच्या होणारा आती संसर्गजन्य साथीचा आजार आहे. बेबी आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात दिसून येतो.या आजाराचे विषाणू सूर्यकिरणांना जास्त संवेदनाक्षम असतात

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
goat rearing

goat rearing

 देवी आजार हा पॉक्स नावाच्या विषाणू पासून शेळ्या व मेंढ्यांच्या होणारा आती संसर्गजन्य साथीचा आजार आहे. बेबी आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात दिसून येतो.या आजाराचे विषाणू सूर्यकिरणांना जास्त संवेदनाक्षम असतात

परंतु शेळ्यांना आणि मेंढ्यांच्या शरीरावरील लोकरकिंवा केस, बाधित जनावरांच्या शरीरावरील कोरड्या झालेल्या खपल्या मध्येतीन महिन्यांपर्यंत या आजाराचे विषाणू जिवंत राहू शकतात. या लेखात आपण देवी आजाराची लक्षणे आणि उपाय जाणून घेऊ.

 शेळ्या-मेंढ्या मधील देवी आजार

लक्षणे

  • या आजाराच्या विषाणूचा शेळ्या व मेंढ्यांच्या शरीरामध्ये प्रवेश झाल्यापासूनसाधारणपणे 8 ते 13 दिवसांमध्येलक्षणे दिसतात.
  • एकशे चार अंश फॅरनहाइट पेक्षा जास्त शरीराचे तापमान वाढते.
  • लागण झालेल्या जनावरांची भूक मंदावते व ते सुस्त व मलूलदिसतात.
  • सुरुवातीला शरीरावरील लोकर नसलेल्या भागावर पुरळ येतात व त्यामध्ये पु तयार होऊन त्याचे रूपांतर गाठीमध्येहोते.
  • नाक, डोळ्यांमधील आतील त्वचा लालसर तसेच मानेवरील लसिका गाठी वर सूज येते.
  • डोळ्यांच्या पापण्या तसेच नाका मधील आतील त्वचा यावर पुरळ आल्यामुळे तेथे दाह निर्माण होऊन नाकातून व डोळ्यातून चिकट स्राव स्रवतो.
  • शेळ्या-मेंढ्यांना श्वास घेताना त्रास होतो.
  • गाभण जनावरांना मध्ये गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते.
  • करडे व कोकरामध्ये तीव्रता अधिक असून मरतुकीचे प्रमाण जास्त असते.

 या आजारावरील उपाय

  • आजार विषाणुजन्य असल्यामुळे यावर प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही.
  • लक्षणे आढळून आल्यास प्रथम आजारी जनावर कळपासून वेगळे करावे.
  • इतर जिवाणूचे संक्रमण राहण्याकरता पाच दिवस प्रतिजैविके व वेदनाशमकऔषध उपचार करावा.
  • शरीरावरील जखमा पोटॅशियम परमॅग्नेट च्या द्रावणाने स्वच्छ व निर्जंतुक करूनत्यावर जंतुनाशक मलम लावावे.
  • एक वर्षे वयापर्यंत जनावरांच्या शरीरामध्ये लसीची रोगप्रतिकारशक्ती राहते.त्याकरिता तीन महिने वयाच्या वरील सर्व शेळ्या व मेंढ्या नाडिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षी न चुकतापशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण करावे.
English Summary: pox disease in goat and sheep resstrictive tratment on that disease Published on: 10 December 2021, 05:49 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters