Poultry Farming : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेती समवेत शेती पूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागले आहेत. शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. कुक्कुटपालन हा देखील एक प्रमुख शेती पूरक व्यवसाय आहे. आजकाल ग्रामीण भारतात कुक्कुटपालनाची क्रेझ वाढत आहे.
मांसाच्या मागणीत सातत्याने होणारी वाढ हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्याचप्रमाणे कुक्कुटपालन हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त नफा मिळतो. शेतकरी त्यांच्या घरामागील अंगणात म्हणजे परसदारात देशी कोंबडी पालन करून चांगला नफा कमवू शकतात. खरं पाहता, ब्रॉयलर कोंबड्यांपेक्षा देशी कोंबडीची मागणी जास्त आहे.
त्याचे मांस देखील अधिक चवदार आणि आरोग्यदायी असते. यामुळे गावरान कोंबडी पालन अलीकडे मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागले आहे. वनराजा कोंबडी ही भारतातील प्रमुख देशी किंवा गावरान जात आहे. हीं कोंबडी मांसासाठी पाळले जाते. त्याची अंडी पौष्टिक असल्याने महाग विकली जातात. हे ग्रामीण भागात अगदी सहजपणे पाळले जाऊ शकते. या जातींचे कोंबडी पालन व्यावसायिकरित्या करून केवळ 500 कोंबड्यांपासून 1 लाखांपर्यंत कमाई होऊ शकते.
वनराज कोंबडीची वैशिष्ट्ये
वनराजाची कोंबडीची जात तपकिरी रंगाची अतिशय आकर्षक आहे.
यात रोगांचा प्रतिकार जास्त असतो.
त्याचे मांस अतिशय चवदार मानले जाते.
वनराजाच्या कोंबडीच्या मांसात फारशी चरबी नसते.
वनराजा कोंबडीची जात थोडी भांडखोर आहे.
ही कोंबडी खुल्या पद्धतीने पालनासाठी उत्तम मानली जाते.
एका पिलाचे वजन सुमारे 34 ते 40 ग्रॅम असते.
त्याचे वजन 6 आठवड्यांत 700 ते 850 ग्रॅम पर्यंत बनते.
वनराजाची कोंबडी 175 ते 180 दिवसांत अंडी घालू लागते.
त्याच्या अंड्यांतून 80 टक्के पिल्ले बाहेर येतात.
वनराजा कोंबडी एका वर्षात 90 ते 100 अंडी घालू शकते.
वनराजा चिकनची किंमत
वनराजाच्या कोंबड्यांना बाजारात चांगला भाव मिळतो. एक किलो वनराजा कोंबडीची किंमत 500 ते 600 रुपयांपर्यंत असते.
Share your comments