शेतीकरी जोडव्यवसाय (attachment business) म्हणून अनेक व्यवसाय करत उत्पन्न घेत असतात. या व्यवसायांपैकी कुक्कुटपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. यातून शेतकरी वर्ग कमी खर्चात अधिक उत्पन्न काढू शकतो.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरोघरी केला जाणारा व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry business). कुक्कुटपालन करून शेतकरी अंडी, पिसे तयार करण्याचा व्यवसाय करून चांगले उत्पन्न घेऊ शकतात. कुक्कुटपालन व्यवसाय अगदी कमी पैशातही सुरू करू शकणारा व्यवसाय आहे.
बऱ्याचदा कुक्कुटपालकांना समजत नाही की त्यांनी कोणत्या जातीची कोंबडी पाळावी. आज आपण अशाच एका कोंबडीच्या जातीबद्दल माहिती घेऊया, ज्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल.
एका वर्षात 250 अंडी घालण्याची क्षमता
प्लायमाउथ रॉक कोंबडी (Plymouth Rock Chicken) शेतकऱ्यांना बंपर नफा देऊ शकतात. ही कोंबडी एका वर्षात 250 पर्यंत अंडी घालू शकतात. या कोंबडीच्या एका अंड्याचे सरासरी वजन 60 ग्रॅम पर्यंत असते. या कोंबडीचे वजन 3 किलोपर्यंत आहे.
या कोंबडीचे कान लाल असतात, तर चोच पिवळी असते. ही कोंबडीची अमेरिकन जात मानली जाते. तरीही भारतातील अनेक राज्यांमध्ये ते मुबलक प्रमाणात आढळते. व्यवसायाच्या दृष्टीने, कोंबडीची ही जात भारतात खूप चांगली मानली जाते.
Soybean Market Price : सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाची बातमी; सोयाबीन विकला जातोय 'या' दराने
कमी वेळात श्रीमंत होऊ शकता
प्लायमाउथ रॉक चिकन भारतातील प्रत्येक राज्यात दिसेल. त्याला रॉक बॅरेड रॉक असेही म्हंटले जाते. त्याचे चिकन मांस देखील अतिशय चवदार आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर मानले जाते.
त्यामुळेच त्याच्या मांसाची किंमत (Price of meat) बाजारात जास्त असते. अशा परिस्थितीत प्लायमाउथ रॉक जातीची कोंबडी तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
Maize Rate: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; मक्याचे दर तेजीत, मिळतोय 'इतका' दर
Kisan Vikas Patra: किसान विकास पत्र योजनेतून शेतकऱ्यांचा पैसा होणार डबल; वाचा सविस्तर
Red Kandhari: पशूपालकांचे दूध उत्पन्न वाढणार; 'लाल कंधारी' गाय 275 दिवस देते दूध
Share your comments