शेतकरी आता कुक्कुटपालन व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता त्याला एका व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात असून त्यातून शेतकरी चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती देखील करीत आहे. तसे पाहायला गेले तर योग्य व्यवस्थापन तेही विविध ऋतूनुसार ठेवणे खूप गरजेचे आहे. या लेखात आपण उन्हाळ्यामध्ये पोल्ट्री व्यवसाय करत असताना कोणती काळजी घ्यावी ज्यामुळे नुकसान होणार नाही, त्याची माहिती घेऊ.
उन्हाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन
उन्हाळ्याच्या कालावधीत कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण खूप प्रमाणात वाढते. तसेच यामध्ये कमी खाद्य खात असल्यामुळे अंडी देण्याची क्षमता देखील कमी होते. तसेच अंड्यांचा आकार देखील खूपच लहान असतो आणि आवरण कमकुवत व पातळ असते. एवढे कुकुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.
नक्की वाचा:पाळा 1 हजार कडकनाथ कोंबड्या अन कमवा 10 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या
त्या अनुषंगाने कोंबड्यांच्या आहाराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आहार व्यवस्थापन करताना कोंबडीच्या खाद्यात प्रथिने,जीवनसत्वे आणि खनिजे यांचे प्रमाण अधिक असावे. जेणेकरून कोंबड्यांना सर्व पोषक घटक मिळतील.
अंडीपातळ आणि कमकुवत होऊ नये यासाठी कोंबड्यांच्या आहारामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण पूर्वीपेक्षा उन्हाळ्यामध्ये वाढवावे लागते. यासाठी ओस्टो कॅल्शियम द्रव्य कोंबडीच्या खाद्यात पाण्यासोबत द्यावे.
उन्हाळ्याच्या हंगामात तापमान 32 अंश ते 39 अंशांच्या दरम्यान ठेवणे गरजेचे असते. तापमानामध्ये कोंबड्यांचे पोषण उत्तम प्रकारे करता येते.
नक्की वाचा:Kadaknaath:कडकनाथ कोंबडीपालन सुरु करा अन कमवा कडक नफा,वाचा यामागील प्रमुख कारणे
कोंबड्यांचे पाणीव्यवस्थापन
उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा करणे खूप महत्त्वाचे असते. उन्हाळ्याच्या हंगामात पोल्ट्री व्यवसायातून अधिक नफा मिळवायचा असेल तर कोंबड्यांसाठी योग्य प्रमाणात पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते त्यासाठी योग्य जागेची निवड देखील महत्त्वाचे आहे.
कोंबड्यांना पाणी असणाऱ्या टाक्यांना बाहेरून सुती पोते बाहेरून बांधून त्याला दिवसभर ओलसर ठेवणे खूप गरजेचे असते. तसेच परसबागेतील किंवा गावरान कोंबडी पालन असेल तर प्लास्टिकच्या भांड्यामध्ये पाणी न ठेवता मातीच्या भांड्यात पाणी ठेवले तर खूप फायदा होतो व कोंबड्यांमध्ये संसर्ग पसरत नाही आणि ते निरोगी राहतात.
उष्माघाताची समस्या
उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचे समस्या कोंबड्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
त्यामुळे उष्माघाताने कोंबड्या फार लवकर मरतात. हे टाळण्यासाठी खालील उपाय करावेत…
1- उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबडी पालन केले असेल तर बाहेरील भिंतींना पांढरा रंग लावावा आणि पोल्ट्री शेड असेल तर बाहेरील जाळीला पोते बांधून त्यावर पाण्याचा शिडकावा थोडा थोडा वेळाने करत राहणे उत्तम ठरते.
त्यामुळे सूर्याच्या किरणांचा प्रभाव शेडमध्ये किंवा कोंबड्यांसाठी बनवलेला खुराड्यात पोहोचत नाही. जर तुम्हाला शेडमध्ये फॉगर्स, पंखे आणि कुलर बसवणे शक्य झाले तर खूपच उत्तम राहते.
Share your comments