बऱ्याचदा सदोष चारा व्यवस्थापनामुळे जनावरांमध्ये चयापचयाचे आजार उद्भवतात. त्यामुळे जनावरांच्या उत्पादकतेवर वाईट परिणाम होतो.व मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होऊ शकते. योग्य चारा व्यवस्थापन ठेवल्यास हे हजार आपण टाळू शकतो.या लेखात आपण जनावरांना होणारी नायट्रेटची विषबाधा आणि युरियाची विषबाधा याबद्दल माहिती घेणार आहोत.
जनावरांना होणारी नायट्रेट्सची विषबाधा
ज्या चारा पिकांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर नत्रयुक्त खतांचा वापर केला जातो अशा चाऱ्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. ज्या ठिकाणी चारा पिकाच्या वाढीस पाण्याची कमतरता किंवा दुष्काळी परिस्थिती आहे, अशा चारा पिकांना नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. असा अतिरिक्त नायट्रेट युक्त चारा जनावरांच्या खाण्यात आल्यास कोठी पोटातील जिवाणू नायट्रेटचे रूपांतर नायट्राईटमध्ये करतात व पुढे याचे रूपांतर अमोनिया वायूतहोऊन जनावरांना विषबाधा होते.नाइट्राईटव अमोनिया वायू रक्तात शोषला जाऊन रक्तातील हिमोग्लोबिन सोबत संयोग पावतो व मेटहिमोग्लोबिन तयार होते. लाल रंगाचे रक्त गडद तपकिरी रंगाचे होते व ऑक्सिजन वाहण्याचे क्षमता गमावून बसते. रक्तातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक हिमोग्लोबिनचे रूपांतर मेट हिमोग्लोबिन मध्ये झाल्यास जनावर दगावते. गाईंमध्ये पुरेशा प्रमाणात खुराक दिल्यास नायट्रेट विषबाधा सहन करण्याची क्षमता चांगल्या प्रमाणात असते.
विषबाधेची लक्षणे
जनावरांमध्ये नायट्रेट विषबाधा झाल्यास नाडीचा वेग वाढतो. श्वासोश्वास वेगाने होण्यास सुरुवात होते तसेच वारंवार मूत्रविसर्जन,अतिसार, अंग थरथर कापणे आणि चक्कर आल्यासारखे जनावर चालते व तोंडातून फेस येतो.
उपचार
जास्त प्रमाणात धान्याचा भरडा आणि जीवनसत्व खाऊ घातल्यास नायट्रेटची विषबाधा टाळता येते.
किंवा एक टक्के मिथिलीन ब्लु शुद्ध पाण्यात मिसळून शिरेवाटे सावकाश शरीरात सोडल्यास नायट्रेट विषबाधेची तीव्रता कमी होते.
चारा व्यवस्थापन
जास्त नायट्रेट असलेल्या चारा पिका पासून मुरघास बनवल्यास नायट्रेटचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.
टीप- जनावरांवर कुठलाही प्रकारचा औषध उपचार करण्या अगोदर पशुवैद्यकीय तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा व त्याद्वारे उपचार करावे.
Share your comments