शेतीसोबत मोठ्या प्रमाणात केला जाणारा व्यवसाय म्हणजे पशुपालन. पशुपालन हा अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी मुख्य आधार असतो. जनावरांची प्रजननक्षमता आर्थिक उत्पादनाचा मुख्य आधार असतो. पण जर प्रजननास संबंधित आजारामुळे वेतामध्ये अंतर वाढले तर पशुपालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कमीत कमी एका वर्षातून प्रत्येक जनावरांपासून आठ ते नऊ महिन्यांपर्यंत दूध आणि निरोगी वासरू मिळायला हवे त्यामुळे आपल्याला कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळू शकते.
साधारणता गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर 50 ते 70 दिवसांमध्ये नियमितपणे ऋतुचक्र यायला हवे. तसेच 90 ते 120 दिवसांमध्ये पुन्हा जनावर गाभण राहायला हवे. जनावर गाभण न राहिल्यास, जेव्हा गाय किंवा म्हैस तीन होऊन अधिक वेळा 20 ते 21 दिवसांच्या अंतराने पुन्हा माजाची लक्षणे दाखवते आणि प्रत्येक वेळी वळू किंवा कृत्रिम रेतनाद्वारे भरण करून सुद्धा गाबन होऊ शकत नाही. अशा जनावरांना पुन्हा गर्भधानच्या आवश्यकतेच्या जनावर असे म्हणतात. पुनः गर्भधान जनावरांमध्ये कोणतेही स्पष्ट किंवा विशेष आजाराचे लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु एक समस्या असते, ती म्हणजे जनावर प्रत्येक वेळी वीस ते बावीस दिवसांच्या अंतराने माजावर येते आणि रेतन करून देखील गाभण राहत नाही.
जनावरांमधील गाभण न राहण्याची कारणे
जनावरांच्या गाभन न राहण्यामागे बरीचशी कारणे आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे.
जनावरांच्या जननेंद्रियांमध्ये विशिष्ट जिवाणूंच्या संक्रमणामुळे जसे की ब्रुसेला, लिस्टरिया इत्यादीमुळे जनावरांमध्ये गर्भ राहत नाही. तसेच 20 ते 21 दिवसांच्या अंतराने जनावरांमध्ये माजाची लक्षणे दिसत असतात. यामुळे जनावरांमध्ये पुनः गर्भधारणा ही समस्या उद्भवते.
खनिजे तसेच विटामिनच्या कमतरतेमुळे देखील जनावरे नियमितपणे गर्भधारित राहू शकत नाही.
गाभण जनावरांना योग्य व संतुलित आहार न देणे किंवा योग्य देखभाल न करणे हे पुनः गर्भधारणाचे महत्वाचे कारण आहे.
काहीवेळा जनावरांच्या अंडाशयातील कमतरतेमुळे किंवा काही आवश्यक संप्रेरकाच्या कमतरतेमुळे ही जनावरे गाभण राहू शकत नाहीत.
सामान्यतः उष्णतेमुळे किंवा उन्हाळ्यात मशीनमध्ये माजाची सौम्य किंवा शांत लक्षणे दिसून येतात. अशावेळी म्हशींचा माज ओळखून जनावर भरवले नाही तर पुनः गर्भधारणा समस्या उद्भवत राहते. म्हणून पशुपालकांनी जनावरांमधील माजा ची लक्षणांवर नियमितपणे बारकाईने लक्ष ठेवावे.
जर योनिमार्गाची वाढ अपूर्णराहिली असेल तर त्याच्यामुळे ही जनावर गाभण राहण्यात अडथळे निर्माण होतात.
गर्भाशयाच्या अपूर्ण वाढीमुळे देखील जनावरे गाभण राहत नाही.
अंडाशय किंवा थंड कशाची झालेली अपूर्ण वाढदेखील जनावरे गाभण राहण्यास मागील कारण आहे.
जनावरांमधील अनुवंशिकता देखील म्हणजे गर्भाशयाच्या आजाराबाबत असेल तर गर्भधारणा होऊ शकत नाही.
गर्भाशयातील दाह मुळे गर्भ राहण्यात अडथळे तयार होतात.
Share your comments