ग्रामीण भागातील ९० टक्के लोक हे शेती व दुग्धव्यवसायावर अवलंबून आहेत. सध्या वाढती महागाई, लॉकडाऊन आणि नोकरीचा प्रश्न ऐरणीवर असताना तरुण पिढी नोकरीच्या मागे न लागता दुग्धव्यवसाया सारख्या एका शाश्वत आणि हमखास पैसा मिळवून देणाऱ्या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसून येत आहे. तरुण पिढी सुशिक्षित असल्याने स्वतःमधील ज्ञान व कौशल्य वापरून किंवा विकसित करून एखादा व्यवसाय सुरु करण्यापूर्वीचं त्या व्यवसायातले बारकावे काय आहेत, हा व्यवसाय केला तर भविष्यात काय अडथळे येतील तसेच त्या व्यवसायासाठी एकूण पैसा किती लागेल, तो व्यवसाय यशस्वी करण्यासाठी किती संयम बाळगावा लागेल या गोष्टीचा देखील विचार करत असतात.
तरुण पिढीकडे ज्ञान आणि कौशल्य असल्यामुळे अशक्य असणारी गोष्ट देखील ते सहज शक्य करून दाखवू शकतात तसेच ते आपल्या जुन्या व्यवसायाला देखील नवरूप चांगल्या पद्धतीने आणू शकतात आणि त्याच्यातून देखील ते चांगली क्रांती करु शकतात जर त्यांनी दुग्धव्यवसाय सुरू करतानाचं धेनू अँप सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दुग्धव्यवसायातील यश ते खेचून आणू शकतात हे नक्कीच!
याचा अर्थ मुळीच असा नव्हे की तरुण पिढीचं फक्त दुग्धव्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकते. ज्यांच्याकडे लिहण्या वाचण्याचे कौशल्य, कष्ट करण्याची तयारी आणि आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची जिज्ञासा ज्या शेतकऱ्याकडे, ज्या पशुपालकांकडे असेल त्यांच्यासाठी धेनू अँप खरंच वरदान ठरणार आहे.
काय आहे? दुग्धव्यवसायात धेनू अँप्लिकेशनचे महत्व-
धेनू अँप्लिकेशनच्या माध्यमातून पशुपालकांना दुग्धव्यवसायातील आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञानाची घरबसल्या मोफत माहिती मिळते.
दुग्धव्यवसायात नियमितपणे धेनू अँप्लिकेशनचा वापर केल्याने पशुपालकांना अचूक माहिती तर मिळतेच परंतु त्यामुळे जनावरांसंबंधित होणारी फसवणूक टळते.
धेनू अँप्लिकेशनच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या जनावरांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून खरेदी व विक्री करता येते.
या अँप्लिकेशन द्वारे शेतकऱ्यांना पशुपालन व दुग्धव्यवसाय संबंधित निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे तंज्ञानाकडून निराकारण करून घेता येते.
पशुपालक धेनू अँप च्या माध्यमातून जनावरांच्या खरेदी-विक्री शिवाय डेअरी विषयक यंत्रे, अवजारे, हिरवा व वाळलेला चारा तसेच चारा बियाणे, शेणखत इत्यादी गोष्टींची देखील खरेदी विक्री करू शकतात.
पशुपालक बांधव आपणाला विश्वासू ग्राहक मिळवण्यासाठी धेनू अँपच्या माध्यमातून आपल्या शेती व पशुधन विषयक उत्पादनाची किंवा ब्रँडची सशुल्क जाहिरात हि करू शकतात.
धेनू अँप्लिकेशनमध्ये आपणाला जनावरांसाठी सकस चारा कोणता लावावा? जनावरांचे आरोग्य कसे राखावे? गोठ्यातील स्वच्छतेचे महत्व काय आहे? जनावरांना वेळेवर लसीकरण केल्याने काय फायदे होतात? तसेच दुग्धव्यवसायामध्ये मशिनरीचे महत्व काय असते? या गोष्टी अचूक समजतात.
या अँप्लिकेशनमध्ये आपल्याला प्रत्येक जनावरांच्या जन्मापासून ते विक्रीपर्यंतच्या सर्व नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवता येतात.
धेनू अँप्लिकेशन मधल्या नोंदींचा आधार घेऊन आपण अधिक उत्पादनक्षम व चांगल्या वंशावळीच्या गाई-म्हशी व शेळ्या-मेंढ्या तयार करू शकता.
अँप्लिकेशनच्या माध्यमातून जनावरांचे आहार नियोजन कसे करावे? तसेच हिरवा चारा, वाळला चारा, मुरघास व पशुखाद्याचे प्रमाण किती प्रमाणात द्यावे हे अचूक समजते.
धेनू अँप्लिकेशनमध्ये जनावरांची नोंदणी केल्यास जनावरांचे दूध काढणे कधी बंद करावे किंवा वासरांना दूध केंव्हा चालू व बंद करावे तसेच किती मिल्क रिप्लेसर पाजावे हे समजते.
धेनू अँप्लिकेशनमधील नोटिफिकेशनमध्ये आपले जनावर माजावर कधी येऊ शकते? त्याला कृत्रिम रेतन कधी करावे? गर्भधारणा तपासणी कधी करावी? जनावराची प्रजनन स्थिती काय आहे? जंतनाशकाचा डोस कधी द्यावा? तसेच गाई व म्हशी, शेळ्या-मेंढ्या विण्याची अपेक्षित तारीख काय आहे हे समजते.
दर शनिवारी संध्याकाळी १ तास घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक वेबिनार मधून प्रयोगशील शेतकरी व पशुवैधकीय तज्ञांकडून दुग्धव्यवसायातील आधुनिक माहिती व तंत्रज्ञान धेनू इंडिया या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून मोफत ऐकायला मिळते.
धेनू अँप च्या माध्यमातून वेळोवेळी पशुपालकांना गोठा व्यवस्थापनातील बदल विषयक पशु सल्ला दिला जातो.
पशुपालन व दुग्धव्यवसायात धेनू अँप्लिकेशनचा पुरेपूर वापर केल्याने पशुपालक नेहमी हुशार, अपडेट आणि उत्पादनक्षम बनतो त्यामुळे कोणत्याही माध्यमातून होणारा फसवणुकीचा धोका तर टळतोच परंतु जनावरांचे योग्य व्यवस्थापन झाल्याने वैद्यकीय खर्च टळून एकूणच उत्पादनात चांगली वाढ होते.
टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=XXPBY3
लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल-nitinpisal94@gmail.com
महत्वाच्या बातम्या;
काळजावर दगड ठेवून शेतकऱ्याने केले 'ते' कृत्य, कारखान्याने काही वेळातच टाकली उसाला तोड..
काय सांगता! या आंब्याची किंमत आहे तब्बल 2.7 लाख रुपये, सुरक्षेसाठी आहेत 9 श्वान आणि 3 सुरक्षा रक्षक
Share your comments