जर गाईंचा विचार केला तर गाय सुमारे 21 दिवसांच्या अंतराने माजावर येते. गाई मध्ये माजाची लक्षणे दिसल्या पासून सुमारे 10 ते 18 तास भरल्यानंतर 20 ते 21 दिवसांनी माज दाखवत नाही. काही गायी दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात माजावर येतात.अशा गाईंची पशुवैद्यकाकडून तपासणी करून औषधोपचार करावा.
गाभण गाईंचे संगोपन
गाभण गाईंना शेवटच्या अडीच महिन्यांच्या काळात दीड किलो समतोल खाद्याचा जादा पुरवठा करावा. गाय विण्याच्या अगोदर मोकळी फिरायला द्यावे. गाई विण्याच्या वेळी दुरूनच तिच्यावर लक्ष ठेवावे. गोठ्यात टोकदार दगड व खिळे असू नयेत.
जनावरांचे प्रसूतिपूर्व व्यवस्थापन
जनावरांचे उत्पादन क्षमता ही त्यांच्या अनुवंशिक गुणांवर त्याचप्रमाणे त्यांच्या वयात येण्यापूर्वीच त्यांच्या शारीरिक वाढीवर अवलंबून असते. वयात येण्यापूर्वी ची शारीरिक वाढ प्रामुख्याने गर्भात असतानाच या वाढीवर अवलंबून असते. म्हणून गाभण काळात जनावरांची योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. गाभण जनावरांची प्रसुतीपूर्व काळजी घेतल्यास पुढे येणाऱ्या अडचणींवर मात करता येते. दुभत्या जनावरांना बरोबर असणाऱ्या म्हशी ची काळजी घेणे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. म्हशींचा गाभण काळ दहा महिने 10 दिवस कालावधीचा तर गाईंचा गाभण काळ नऊ महिने नऊ दिवसांचा असतो. गाभण जनावरांचा खुराक समतोल असावा. त्या आहारात प्रामुख्याने प्रथिने, कर्बोदके, खनिज द्रव्ये हे सर्व घटक समतोल प्रमाणात असावे..
खाद्य व्यवस्थापन
- ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध आहे अशा हिरव्या कुरणात गाभण जनावरांना चरण्यासाठी सोडण्याच्या सोय असल्यास ते निश्चित जनावरांच्या फायद्याचे ठरते, त्यामुळे गाभण जनावरांना ताजी वैरण खायला मिळते. बरोबरच मोकळ्या जागेत फिरायला वेळ मिळत असल्याने मोकळी हवा, काश आणि आवश्यक तो शारीरिक व्यायाम होतो.
- हिरव्या चाऱ्याची सोय नसेल तर जनावरांना गोठ्यातच भरपूर प्रमाणात हिरवा चारा खाण्यास देता येईल, अशी व्यवस्था करावी.
- शेवटच्या दोन महिन्यात गर्भाची वाढ झपाट्याने होते, त्यामुळे या काळात चाऱ्यात वाढ करावी. कारण गर्भावस्थेच्या अंतिम काळात गाभण जनावर ला स्वतःच्या पोषणाकरिता किमान एक ते दीड किलो पशुखाद्य द्यावे.
- गर्भाच्या वाढीसाठी आणखी एक ते दीड किलो जास्तीचे पशुखाद्य देण्याची गरज असते. अशा वेळी जास्त खाद्य दिल्याने गर्भाची वाढ चांगल्या प्रकारे होते.
जनावरांचा भाकड काळाचे नियोजन
- कृत्रिम रेतन केलेल्या तारखेची नोंद महत्त्वाची असते. कारण त्या नोंदीनुसार तिचे दूध काढणे बंद करावे. प्रसूतीच्या अडीच ते तीन महिने अगोदर दूध काढणे बंद करावे.
- दूध काढणे बंद केल्यामुळे दुखतो उत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गाईची झालेली शारीरिक झीज भरून काढण्यासाठी व गर्भाच्या वासराच्या वाढीसाठी उपयोगात आणले जाते. पुढील वेतातील दुधासाठी कासेची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे होईलव विण्यापूर्वी गाईचे व गर्भातील वासराचे आरोग्य चांगले राहील.
- विन्या पूर्वी प्रत्येक गाया अडीच ते तीन महिने भाकड असावी.देसी गाईच्या दोन वेतात दीड ते दोन वर्ष आंतर राहते. त्या जमतम सहा ते सात महिने दूध देतात. म्हणजेच विण्यापूर्वी 12 ते 17 महिने ही भाकड राहतात.
- त्या तुलनेने मात्र संकरित गाई आणि त्यामध्ये पहिल्या वेतातील गाई वेत संपत आले तरी बरे दूध देतात. अशा गाई आटवणे खूप आवश्यक असते.
- विण्यापूर्वी किमान अडीच महिने गाय भाकड असावी.
Share your comments