1. पशुधन

लवकर वयात येते पंढरपुरी म्हैस; दुधासाठी आहे उपयुक्त

पंढरपुरी ही एक म्हशीची जात असून या जातीच्या म्हशी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव येथे आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम, पण अतिशय काटक असतात.

KJ Staff
KJ Staff


पंढरपुरी ही एक म्हशीची जात असून  या जातीच्या म्हशी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव येथे आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम, पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे. लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताच्या वेळी कमी वय, उत्तम प्रजनन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. दूध व्यवसायासाठी सोलापूरमध्ये पाळल्या जाणाऱ्या पंढरपुरी म्हैशीविषयी माहिती घेणार आहोत. फक्त सोलापूरच नाहीतर कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव येथेही आढळतात.

या म्हैशीच्या जातीविषयी अनेक वैशिष्ट्ये आपण आज जाणून घेणार आहोत. आकाराने मध्यम, पण अतिशय काटक शरीर, लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्य. दुग्धव्यवसायासाठी या जातीच्या म्हैशी उत्तम समजल्या जातात. या जातीच्या म्हैशीला धारवाडीही म्हटले जाते. कमी पावसाच्या प्रदेशात या म्हैशींचे पालन चांगले होत असते.  पंढरपूरवरुन या म्हैशीचे नाव पंढरपुरी असे पडल्याचे म्हटले जाते.  या  म्हैशींचे शिंग हे खूप लांब असतात,  ४५ - ५० सेंटीमीटर पर्यंत याची लांबी असते.  त्यांच्या शरीराच्या ठेवणीमुळे आणि शिंगांमुळे या म्हैशी देशभरात प्रसिद्ध आहेत.

दूध व्यवसायासाठी उपयुक्त - पंढरपुरी म्हैस ही हलक्‍या आणि निकृष्ट चाऱ्यावर तग धरून राहणारी काटक जात आहे. अत्यंत प्रतिकूल वातावरणात ही जात चांगले दूध देते.  दुग्धोत्पादनक्षमता आणि सातत्य या गुणांमुळे ही जात दुधासाठी चांगली आहे.  या म्हैशीचे वजन साधरण ४५० ते ४७० किलो असतं. या म्हैशी ६ ते ७ लिटर दूध देत असते पण जर आपण व्यवस्थित निगा राखली तर या जातीच्या म्हैशी १५ लिटरपर्यंत दूध देतात.  एका वेतात या म्हैशी १५०० ते १८०० लिटर दूध देतात.
प्रजनन क्षमतेसाठी प्रसिद्ध  - या म्हैशीच्या  पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यांत गाभण राहतात. ३५ ते ४० महिन्यांत पहिल्यांदा वितात. दर १२ ते १३ महिन्यात या जातीच्या म्हैशी एका पारड्याला जन्म देत असतात.  त्यानंतर साधरण ३०५ दिवसापर्यंत दूध देण्याची क्षमता या म्हैशींमध्ये आहे.

English Summary: pandharpuri buffalo good for milk production Published on: 07 May 2020, 12:27 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters