अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये जनावरांच्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच गंभीर होत असते. परंतु या परिस्थितीत डगमगून न जाता पर्यायी व्यवस्था शोधून, त्याचा उपयोग करून दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करता येणे शक्य आहे. निसर्गात काही उपलब्ध वनस्पतींचा उपयोग वैरण म्हणून आपण करू शकतो. या लेखात आपण अशा वनस्पतींची माहिती घेणार आहोत जे दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला चारा म्हणून उपयोगात आणता येतील.
- आपटा:
विशेषतः गाई याची पाने खातात. पानझडी जंगलात सर्वसाधारण आढळणारा हा वृक्ष आहे. याची उंची सहा ते नऊ मीटर व झाडाचा घेर 0.9 ते 1.2 मीटर असतो. हा वृक्ष सर्व प्रकारच्या जमिनीत वाढू शकतो.
- आवळा:
याची पाने, फळे गाय व बैल जास्त करून खातात. मध्यम ते लहान आकाराच्या पानझडी जंगलात आढळणारे हे झाड आहे. याची उंची नऊ ते बारा मीटर व झाडाचा घेर 0.9 ते 1.8 मीटर असतो. याची लागवडही करतात व या फळात जीवनसत्त्व क जास्त प्रमाणात असते.
- उंबर:
या झाडाची पाने व फळे गाय, बैल व शेळ्या विशेष करून खातात. नेहमी हिरवीगार पाने असलेला, तसेच नदी व ओढ्याच्या काठी आढळणारा हा वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा आणि लावलेला आढळतो. या झाडाची उंची 15 ते 18 मीटर, तसेच घेर 1.5 ते 2.4 मीटर असतो. या झाडाच्या पानांचे रासायनिक पृथक्करण ड्राय मॅटर बेसिस टक्केवारी पुढीलप्रमाणे: मुला अवस्थेतील प्रथिने 12.36 टक्के, स्निग्ध 2.75 टक्के, मुलअवस्थेतील तंतु 13.03 टक्के, शत कर्बोदके 71.91 टक्के व राख 12.98 टक्के असते.
- अंजन:
या झाडाची पाने गाय, बैल व म्हशी आवडीने खातात. कमी पावसाच्या जंगलात सर्वत्र आढळणारा हा पानझडी वृक्ष आहे. तसेच खानदेशातील सातपुडा पर्वतात नेहमी आढळतो. याची हिरवी पाने वैरण म्हणून अतिशय उपयोगी असतात. या झाडाची उंची 16 ते 18 मीटर, तसेच घेर तीन ते साडेतीन मीटर, पानांच्या रासायनिक पृथक्करणतील ओलावा टक्केवारी:7.78 टक्के, प्रथिने 10.79, स्निग्ध 5.21, तंतू 28.21, कर्बोदके 38.87 व राख 9.14, तसेच चुना 4.10, स्फुरद 0.24
- आंबा:
पूर्ण वाढ झालेली पाने व बाठे गाई विशेष करून खातात. सर्व ठिकाणी सापडणारा तसेच नेहमी हिरवीगार पाणी असणारा हा वृक्ष आहे. या झाडाची उंची पंधरा ते वीस मीटर तसेच घेर चार ते पाच मीटर असतो. पानांचे रासायनिक पृथक्करण डायमीटर बेसिस टक्केवारी: मुलांवस्थेतील प्रथिने 7.8 टक्के, स्निग्ध 7.8 टक्के, कर्बोदके 54.0 टक्के, तंतू 21.1 टक्के, राख 13.3 टक्के तसेच स्फुरद 0.38 टक्के व चुना 2.93 टक्के असतो. फार काळ जनावरांना पाणी खाऊ घातल्यास जनावरे दगावण्याचा संभव असतो असे गुजरात मध्ये दिसून आले आहे.
- कडूनिंब:
याची फळे मुख्यत्वे शेळ्या-मेंढ्या आवडीने खातात. मध्यम व मोठ्या आकाराचा हा रुक्ष कमी पावसाच्या जंगलात तसेच रस्त्याच्या दुतर्फा लावलेला आढळतो. याच्या झाडाची उंची 15 ते 12 मीटर व घेर 1.8 मीटर असतो.
- काटेसावरी:
याची पाणी विशेषतः गाय व बैल खातात. सरळ वाढणारे 18 ते 27 मीटर उंच व 3.6 ते 4.5 मीटर त्याचा घेर असतो.हे काटेरी झाड पानझडी करण्यात तसेच कोकणात आढळते.
- सुबाभूळ:
या झाडाची पाने, शेंगा व बिया तसेच कोवळ्या फांद्या गाय, बैल, शेळ्या व मेंढ्या खातात. साधारण चार मीटर उंचीचे सरळ वाढणारे हे लहान झाड राज्यात सर्वत्र उगवू शकते व आढळून येते. हिरव्या पाण्याचे रासायनिक पृथक्करण केले असता टक्केवारी:70.4 टक्के ओलावा,5.3 टक्के प्रथिने,0.6टक्के स्निग्ध,12.2टक्के कर्बोदके,9.7 टक्के तंतू व 1.8 टक्के राख तसेच पाचक प्रथिने 3.9 टक्के, टी डी एन 17.5 टक्के वर न्यूट्रीटीव व रेशियो 3.5 टक्के असून त्याच्या पानात प्रथिने व केरोटीन असल्यामुळे लसूणघास च्या पान सोबत कोंबड्यांच्या खुराकात उपयोग म्हणून वापर करता येतो.
9-खिरणी:
गाई व म्हशी या वृक्षांची पाने खातात. नेहमी हिरवीगार पाने असलेले पंधरा ते अठरा मीटर उंच व 3.6 ते साडेचार मीटर घेराचे शोभिवंत झाड कमी पावसाच्या भागात आढळते. रासायनिक पृथक्करण केले असता टक्केवारी: मूल्य अवस्थेतील प्रथिने 9.3 टक्के, स्निग्ध 6.2 टक्के, कर्बोदके 53.9 टक्के, तंतू 23.3 टक्के व एकूण राख 7.4 टक्के तसेच अविद्राव्य राख 0.8 टक्के, स्फुरद 0.49 टक्के व चुना दोन टक्के आढळून येतो.
याशिवाय चारोळी,देवदारी,टेंभुर्णी, तीवर, तीवस,देव कापूस,पळस, पिंपळ, बाभूळ,, बेहडा, बेल, महारुख, मेडशिंगी, मुरुड शेंग, सिसवी, शिवण, शिसम, हिंगणबेट, हीवर इत्यादी वनस्पतींचा उपयोग दुष्काळात वैरणीसाठी होतो.
Share your comments