दुधाचा व्यवसाय करत असताना दूध उत्पादन आणि गाईंच्या प्रजननांविषयी विशेष काळजी घ्यावी लागते. दुग्ध उत्पादन क्षमतेसोबतच गाई-म्हशींमध्ये नियमितपणे गर्भधारणा होण्याचे प्रमाण घटत आहे. यशस्वी गर्भधारणेविषयी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे त्यासाठी आवश्यक असते. त्याबद्दलची माहिती या लेखात आपण घेऊ. निवडक वळूंचा वापर रेतनासाठी केला जातो तसेच कृत्रिम रेतन, भ्रूण प्रत्यारोपण, एकत्रित माज पद्धतीचा उपयोग करणे व इतर प्रजनन विषयक बाबींचा सहभाग दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. अशा उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च उत्पादकता असणारी नवीन पिढी निर्माण होत आहे.
वाढत्या लोकसंख्येनुसार दुधाची गरज तसेच प्रति जनावरावरील पालन-पोषण याचा खर्च यांचा ताळेबंद घालण्यासाठी प्रति जनावर उत्पादकता वाढवणे गरजेचे आहे. वाढत्या दुग्धोत्पादन संस्थेसोबत उच्च दूध उत्पादक गाई-म्हशींमध्ये नियमितपणे गर्भधारणा होण्याचे प्रमाण घटत आहे. हे लक्षात घेऊन यशस्वी गर्भधारणेविषयी काही महत्त्वाच्या उपाय-योजना करणे आवश्यक असते. नफ्यातील दुग्ध व्यवसायासाठी पशुपालकांनी प्रजनन व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून अभ्यासपूर्ण रीतीने निर्णय घेणे खूप महत्त्वाचे असते. गाई किंवा म्हशी ऑक्टोबर ते मार्च या काळात गाभण राहिल्या पाहिजेत. कारण की, या काळात तणविरहित वातावरण आणि हिरव्या वैरणीचा उपलब्धता हे दोन सर्वात महत्त्वाचे घटक यशस्वी प्रजननासाठी या अनुकूल असतात.
तण विरहित वातावरण
आपण उष्णकटिबंधात येत असल्यामुळे वर्षातील बहुतेक काळ वातावरणाच्या तापमानात बरीच वाढ झालेली असते. त्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते. अतिरिक्त तापमान वाढीमुळे ते नियंत्रित ठेवण्यासाठी जनावराला अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे जनावरांमध्ये वातावरणाचा ताण निर्माण होतो, या ताणामुळे गाई, म्हशी माजावर न येणे, वारंवार माजावर येणे अशा समस्या उद्भवतात. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते मार्च या काळामध्ये तापमान निर्देशांक हा कमी असतो. हा निर्देशांक यशस्वी प्रजननासाठी गाई व म्हशीमध्ये प्रजननासाठी योग्य आहे. म्हणून पशुपालकांनी या काळातच सर्व पायाभूत तयारी करून गायींची व म्हशींची गर्भधारणा करून घ्यावी.
मुबलक प्रमाणात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता असावी.
आपण पाहतो तर सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यास सगळ हिरवी वैरण सहजरीत्या उपलब्ध होत असते. या वैरणीमधून जनावरांना सगळ्या प्रकारची पोषक तत्त्वे उपलब्ध होतात. उत्तम प्रजननासाठी शहरांमध्ये योग्य प्रमाणात प्रथिने, खनिजे, ऊर्जा इत्यादी उपलब्ध असल्यास संप्रेरकांची निर्मिती योग्य प्रमाणात झाल्यामुळे कार्यक्षम स्त्री बीजनिर्मिती होऊन यशस्वी गर्भधारणा होऊ शकते.
गाई व म्हशींचे व्यवस्थापन कसे करावे?
ज्या गाईंना व म्हशींना व्याल्यानंतर साठ दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असतील त्यांना जंतू निर्मूलन, गोचीड निर्मूलन पशुवैद्यकांच्या सल्ल्याने करून घ्यावे. तसेच दुधाच्या प्रमाणात सर्वसाधारणपणे १८ ते २० टक्के प्रथिने असलेले संतुलित पशुखाद्य ३०० ते ४०० ग्रॅम प्रति लिटर दुधासाठी व दीड ते दोन किलो पशुआहार शरीर पोषणासाठी द्यावा. तसेच प्रति दिन ३० ते ५० ग्रॅम खनिज मिश्रण गरजेनुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावे. जे जनावरे माजावर आलेली असतील त्यांचे बारकाईने निरीक्षण करून माज ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी कमीत-कमी प्रतिदिन २ ते ३ वेळा जनावरांचे सूक्ष्म निरीक्षण करावे.
ज्या गाई माजावर आलेल्या असतात. त्या गाईंमध्ये हंबरणे, माय अंगातून पारदर्शक स्राव येणे, मायांग सुजल्यासारखे वाटणे, हलचाल वाढणे शेपटीवर धरणे, काही गुरांचे दूध कमी होते, अशा प्रकारची लक्षणे आढळतात. माजावर आलेल्या गाई व म्हशींना कमीत कमी १२ ते १८ तासाने कृत्रिम रेतन करावे. कृत्रिम रेतन करताना आदर्श मानक कार्यप्रणालीचा वापर करण्यात यावा. कृत्रिम रेतन करताना किंवा नंतर जनावरे उत्तेजित होईल असे कोणतेही वर्तन करू नये. तसेच वातावरण उष्ण असल्यास रेतनानंतर जनावरांच्या अंगावर थंड पाणी टाकावे.
माहिती स्त्रोत- स्मार्ट डेअरी- डिजिटल मॅक्झिन
Share your comments