व्यवसायामध्ये कमी कालावधी मध्ये जास्त प्रगती करायची असेल तर त्यावर लक्ष देणे गरजेचे असते. शेतीसोबतच त्याच्या जोडव्यवसायत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. शेळीपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचा ठरत आहे. मराठवाडा, विदर्भ या भागात व्यवसाय मोठया प्रमाणात वाढत आहे. पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथील पशुप्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाने अशी किमया केली आहे फ्याची व्यवसायास मोठे स्वरूप भेटले आहे.
यशस्वीपणे संशोधन करण्यात आलेले आहे:
टेस्ट ट्यूब बेबी या तंत्रज्ञानाचा वापर करून शेळीच्या शरीराच्या बाहेर फलन आणि भ्रूण या निर्मितीबाबत यशस्वीपणे संशोधन करण्यात आलेले आहे. त्या संस्थेच्या बाहेरच्या परिसरामध्ये शेळीने ३ करडांना जन्म दिलेला आहे त्यामुळे आता याचा लाभ व्यावसायिकांना घेता येईल.जवळपास शेळ्यांची उत्पादकता सहा महिन्यांची असते पण आता व्यवसायीक वर्गाला अधिक उत्पादन वाढवून याचा फायदा कसा घेता येईल याचा अनुषंगाने संस्थेने हा पुढाकार घेतला आहे.
टेस्ट ट्यूब बेबी या माध्यमातून जी गर्भधारणा केली जाते ती तशी धोक्याची असते पण पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथील संशोधकांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. चैतन्य पावशे या संशोधकांनी असे सांगितले की पहिल्यादा आम्ही कत्तलखाना मधून शेळ्यांची बिजांडे आणली. त्या बीजांडे मधील स्त्रीबीजकोशातून स्त्रीबीजे आम्ही बाहेर काढली.
प्रयोगशाळा मध्ये परिपकव करून फलन माध्यमातून शुक्राणू सोबत त्यांना फळवले. त्यांच्या फलन माध्यमात शुक्राणू टाकण्याआधी त्यांच्या विर्यातील नको असलेले घटक काढले आणि त्यावर उपचार केला. योग्य ते शुक्राणू स्त्रीबीजासोबत सोडण्यात आले.भ्रूण प्रत्यारोपणक्षम होईपर्यंत त्यांना दोन ते तीन दिवस प्रयोगशाळेतील इन्क्यूबेटरमध्ये ठेवण्यात आले होते. जवळपास ६० ते ७२ तासात ४ ते ८ पेशी असलेले भ्रूण शस्त्रक्रिया करून प्रत्यारोपणक्षम भ्रूण दाई शेळीमध्ये प्रत्यारोपित केले गेले. प्रत्यारोपित केलेल्या शेळ्यांची गर्भ तपासणी केली गेली. यामध्ये एका शेळी ने सुमारे १५० दिवसाने ३ करडांना जन्म दिला त्यामध्ये २ नर आणि १ मादी असे होते.
Share your comments