जगात दिवसेंदिवस विज्ञान प्रगत होत आहे, आणि ह्याचा फायदा मानवी जीवनाला होत आहे आता विज्ञानचा फायदा हा जनावरांना देखील होणार आहे. आपल्याला माहीतच आहे की अपघातात अनेक माणसे आपला पाय किंवा हात गमवतात, आणि अशी माणसे कृत्रिम पाय तसेच हात लावून आपले जीवन सुखात जगू शकतात, कृत्रिम हाता-पायाने आधी सारखे काम होत नाही पण ह्याचा नक्कीच फायदा मिळतो. आता असेच कृत्रिम पाय जनावरांना देखील बसवण्यात येणार आहे! आहे ना कमालीची गोष्ट! आणि ह्याची सुरवात झाली ती आपल्या शेजारी राज्य मध्यप्रदेशमध्ये.
हिंदी भाषिक मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर स्थित नानाजी देशमुख वेटर्नरी विद्यापीठात जनावरांना आर्टिफिसिअल म्हणजे कृत्रिम पाय लावण्यासाठी 2 करोड 17 लाख रुपये मंजूर केले आहेत. मध्यप्रदेश मध्ये देशातील पहिले असे सेंटर बनवले जात आहे, ज्यात जनावरांसाठी कृत्रिम पाय बनवले जाणार आहेत. ही गोष्ट मुक्या प्राण्यांसाठी वरदान सिद्ध होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विद्यापीठात कार्यरत डॉ शोभा जावरे यांनी सांगितले की, 2016-17 पासून प्राण्यांसाठी कृत्रिम पाय बनवण्याचा विचार केला जात आहे.
त्यांनी सांगितले की 3-4 वर्षांपूर्वी एका गाईच्या वासराचा पाय कापला गेला कारण त्याच्या पायात गाठ होती. पाय कापला केल्यामुळे, वासराला चालण्यास चांगलाच त्रास होऊ लागला, त्यामुळे विद्यापीठाच्या डॉक्टरांनी वासराला कृत्रिम पाय बसवण्याचा विचार केला.
यानंतर, विद्यापीठातील डॉक्टर राजेश अहिरवार यांना भेटले, जे मानवांसाठी कृत्रिम पाय बनवतात. त्यांनी त्या वासरासाठी कृत्रिम पाय बनवला, जो बऱ्याच अंशी यशस्वी झाला आहे. वन्यजीव संचालिका डॉ शोभा जावरे यांच्या मते, सध्या राकेश अहिवार यांच्याकडून चार गायींचे कृत्रिम पाय बनवले जात आहेत, जे लवकरच तयार केले जातील आणि ज्या गायींचे पाय कापले गेले आहेत त्यांना ते पाय बसवले जातील.
ह्यामुळे जनावरांना मिळेल फायदा
जनावरांना ह्या कृत्रिम पायाचा खुप फायदा होणार आहे. ज्या प्राण्यांना पायात दुखापत असते व त्यामुळे त्यांचा पाय कापला जातो अशा जनावरांना ह्याचा फायदा होईल शिवाय विद्यापीठ लहान लहान प्राण्यांना देखील अशाच पद्धत्तीचा कृत्रिम पाय बनवण्याचा विचार करत आहे जे की अजूनच चांगले आहे. मुक्या प्राण्यांसाठी सुरु केलेला हा अभिनव उपक्रम खरंच खुप कौतुकास्पद आहे. आणि विद्यापीठ त्यासाठी शाबासकीच्या पात्र आहे.
Source TV9 Bharatvarsh
Share your comments